कोविद-१९: रिझर्व्ह बँक, सरकार आणि आयएमएफ
कोविद-19 किंवा कोरोना व्हायरस किंवा चायनीज व्हायरस यामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था जवळ जवळ ठप्प झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्ष 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था वाढीचा वेग मंदावणार आहे असे स्पष्ट केले आहे. जगातील विकसित देशांच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग उणे 6.1 टक्क्यांवर जाणार आहे तर विकसनशील बाजारपेठा-अर्थव्यवस्थांचा वाढीचा वेग उणे 1 टक्क्यांवर येणार आहे असे नाणेनिधीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नाणेनिधीचा हा अंदाज सर्व देशांचा एकूण विचार करून मांडण्यात आलेला आहे. नाणेनिधीच्या अहवालात प्रमुख देशांच्या आर्थिक वाढीचा अंदाज काय मांडण्यात आला आहे ते पाहूया. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये, अमेरिका: 2020 मध्ये उणे 5.9 टक्के तर 2021 मध्ये 4.7 टक्के 'युरो एरिया': 2020 मध्ये उणे 7.5 टक्के तर 2021मध्ये 4.7 टक्के जपान: 2020 मध्ये उणे 5.2 टक्के तर 2021 मध्ये 3 टक्के युनाईटेड किंग्डम: 2020 मध्ये उणे 6.5 ...