गांधार ते तालिबान: The Afghan Connection
अफगाणिस्तान हे कोडं आहे. सध्याच्या काळात साम्राज्यांची दफनभूमी अशी प्रमुख ओळख कायम झाली आहे. पण प्राचीन काळात याच भूभागात संस्कृतीचे मळे फुलले. पश्चिम आणि उत्तरेकडून भारतावर झालेली सर्व आक्रमणे गांधार भूमीतूनच झाली. कारण पश्चिम आणि उत्तरेकडून भारतात प्रवेश करण्यासाठी दोनच जमिनी वाटा होत्या. एक खैबर आणि दुसरी बोलन खिंड. समुद्री मार्ग खुले झाले, भूराजकीय गणिते बदलली तरी या भागाचं महत्त्व काही कमी झालं नाही. भारत आणि अफगाणिस्तान ही पूर्वापार चालत आलेली एक अतूट बंधनाची नाळ आहे. तीच डॉ. प्रमोद पाठक यांनी त्यांच्या 'द अफगाण कनेक्शन' या पुस्तकात उलगडली आहे. भारतीय उपखंड आणि त्याच्या लगत असणाऱ्या भूभागात जगातल्या प्राचीन संस्कृतींपैकी एक उदयाला आली, वाढली. काही बदल होत तीच संस्कृती आजही या उपखंडात टिकून आहे. मोठे बदल झाले ते सीमावर्ती भागात म्हणजेच, वायव्य भागात. इस्लामिक आक्रमणानंतर झालेले बदल वरवरचे आहेत हे बलोच स्वातंत्र्यकांक्षीच्या, "आम्ही पाकिस्तानी गेल्या ५०-६० वर्षांपासून आहोत, मुस्लिम १४०० वर्षांपासून पण गेल्या हजारो वर्षांपासून आम्ही बलोच आहोत" वाक्यातून स्पष्ट...