Posts

भारतीय राष्ट्र: परंपरेच्या दृष्टीकोनातून घेतलेला वेध: स्थिती स्थापकता की गतिवाद?

Image
प्रा. राम शेवाळकर यांनी मांडलेल्या 'परंपरा' संकल्पनेच्या आधारे भारतीय राष्ट्राचा वेध घेत असताना दुसऱ्या भागात ज्ञानमार्ग की राजमार्ग या प्रश्नाचा मागोवा घेत वशिष्ठ आणि विश्वामित्र परंपरांचा धांडोळा घेतला. या भागात स्थिती स्थापकता की गतिवाद म्हणजेच To be Static or Adopt Dynamism या प्रश्नाचा मागोवा घेत भार्गव आणि नारायणीय परंपरेचा धांडोळा घेणार आहोत.  भार्गव  ऋषी भृगु हेही वशिष्ठाप्रमाणेच ब्रह्माचे मानसपुत्र. भारतीय पुराणांनुसार निरनिराळ्या मन्वंतरांत हे ऋषी जन्म घेतात.  विष्णू पुराणानुसार पहिल्या मन्वंतरात भृगु ऋषींचा विवाह ख्यातीशी झाला. त्यांना आयती, नियती आणि भार्गवी म्हणजेच लक्ष्मी इत्यादी मुले होती. त्यातील लक्ष्मीचा विवाह विष्णूशी झाला होता.  शिव पुराणानुसार, दक्ष यज्ञ आणि सतीच्या कथेनंतर भृगुंना चाक्षुष मन्वंतरांत पुनर्जन्म होण्याचा वर मिळाला. त्यानुसार तो झाला आणि या मन्वंतरातील जन्मात भृगूंचा विवाह पुलोमाशी झाला.  भागवत पुराणातील त्रिमूर्ती कथा. यज्ञात वाद पेटला की ब्रह्मा-विष्णू-महेशापैकी श्रेष्ठ कोण? निर्णय होईना. तो करण्याची जबाबदारी आली भृगुंवर....

भारतीय राष्ट्र: परंपरेच्या दृष्टीकोनातून घेतलेला वेध: ज्ञानमार्ग की राजमार्ग?

Image
प्रा. राम शेवाळकर यांनी मांडलेल्या 'परंपरा' संकल्पनेच्या आधारे भारतीय राष्ट्राचा वेध घेत असताना पहिल्या भागात भारत ही संस्कृती-सभ्यता याचा थोडक्यात आढावा घेतला, आणि त्या परंपरा कोणत्या इथवर येऊन थांबलो. त्या परंपरा म्हणजे वशिष्ठ, विश्वामित्र, भार्गव आणि नारायणीय होय. वशिष्ठ आणि विश्वामित्र परंपरांच्या आधारे ज्ञानमार्ग की राजमार्ग या प्रश्नाचा वेध या भागात...  वशिष्ठ  साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असणारे ऋषी वशिष्ठ हे ब्रह्मदंड धारी आहेत. ज्ञान धारी आहेत. २१ प्रजापतींपैकी एक आहेत. श्रीरामाच्या इक्ष्वाकू वंशाचे राजपुरोहित आहेत.  दशरथाच्या आज्ञेनुसार ऋषी वशिष्ठांनी राम-लक्ष्मणाला न्याय, नीती आणि आदर्श राज्यपद्धती शिकवणारे मार्गदर्शन केले, ते म्हणजे योग वासिष्ठ. हे त्रेता युग एका बाजूला परशुरामाचा अवतार आहे, दुसऱ्या बाजूला आदर्श राज्य, कुटुंब, सामाजिक परिस्थितीची संकल्पना दृढ करणारे आहे.  ऋग्वेदात वर्णिलेले दाशराज्ञ युद्ध हे आद्य ज्ञात महायुद्ध. भरत कुलाच्या सुदास पैजवान राजाच्या विरुद्ध आर्य-अनार्य अशा दहा राजकुलांनी संघटन केले आणि युद्ध छेडले. त्या भरत कुलाचे कुलगुरू,...

भारतीय राष्ट्र: परंपरेच्या दृष्टीकोनातून घेतलेला वेध: विषय प्रवेश

Image
वक्ता दशसहस्त्रेषु प्रा. राम शेवाळकर यांनी त्यांच्या योगेश्वर श्रीकृष्णावरील व्याख्यानात 'परंपरा' ही संकल्पना मांडली आहे. ती पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये, सामाजिक चालीरीती या अर्थी नाही. भारतीय राष्ट्राचा सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक गाभा या व्यापक अर्थाने ती संकल्पना त्यांनी मांडली आहे. श्रीकृष्ण उलगडण्याचा दृष्टीने त्यांनी तिचा थोडक्यात विस्तार केला आहे. तोच धागा पकडून भारतीय राष्ट्राचा परंपरेच्या दृष्टिकोनातून वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे...  भारतीय राष्ट्र.... उच्चारल्याबरोबर माझ्या तरी डोळ्यासमोर येते ते विष्णू पुराणातील भारतीय भूमीचे आणि भारतीयाचे वर्णन,  उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम। वर्षं तद भारत नाम भारती यत्र संतति:।। समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेला असलेल्या भूमीला भारत म्हणतात आणि तिथे राहणारे ते भारतीय.  ही झाली भौगोलिक व्याख्या. पण भारतीय राष्ट्र केवळ या भूगोलापलीकडे आहे. सिंधू-सरस्वती-वेद काळापासून चालत आलेला तो सांस्कृतिक प्रवाह आहे.  राज्यकर्ते आले गेले. राजकीय व्यवस्था बदलत राहिल्या. बदलला नाही तो संस्कृतीचा गाभा. एकम सत विप्रा ...

अथातो बिंब जिज्ञासा

Image
अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

जागतिक आर्थिक घुसळणीत चमचमता तारा भारत

Image
आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४: उत्तम आर्थिक विकासदर, संतुलित देशांतर्गत महागाई, स्थिर बाह्य क्षेत्र, स्थिर खासगी उपभोग, गुंतवणुकीला भक्कम मागणी या घटकांच्या आधारे दमदार आर्थिक विकास भारताने साधला आहे.  १ फेब्रुवारीला लोक कान टवकारून, सज्ज होऊन बसलेले असतात. अर्थसंकल्पात काय तरतुदी आहेत, त्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यात काय बदल होणार, काय महागणार, काय स्वस्त होणार.  मध्यमवर्गीय, नोकरदार आयकर भरणारे, सवलत मिळते की करात वाढच होते हे जाणून घेण्यासाठी  सर्वाधिक उत्सुक असतात.  ते बरोबरच आहे. पण आताशा किंबहुना मोदी सरकार मध्ये सुरुवातीचे काही अर्थसंकल्प सोडले तर फार काही उलथापालथ घडवणारे निर्णय येत नाहीत. नुकताच आलेला निवडणुकोत्तर पूर्ण अर्थसंकल्पही याला अपवाद नाही. पण या सगळ्यात एका महत्त्वाच्या गोष्टीकडे अर्थतज्ज्ञ, अभ्यासक वगळता इतरांचे फार लक्ष जात नाही, ती म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल.  देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार, सध्या डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन, हे मुख्यतः रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या माहिती-आकडेवारीच्या आधारे आर्थिक पाहणी अहवाल तयार करतात, तो केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे स...

महाराष्ट्र भारताचा आर्थिक खडगहस्त: ५०० बिलियन डॉलर आणि पुढे...

Image
  इंग्रजी मध्ये एक उक्ती आहे, "Well Begun is Half Done.." जी महाराष्ट्राला तंतोतंत लागू पडते. का? महाराष्ट्र राज्याचे सकल राष्ट्रीय उत्पादन ५०० बिलियन डॉलर ला पोचले. याचा अर्थ भारतीय अर्थव्यस्थेचा आकार ४ ट्रिलियन डॉलर घेतला तर त्यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा १२.५% आहे.  नुकत्याच आलेल्या राज्य आर्थिक पाहणी अहवालातील महाराष्ट्राची प्राथमिक आर्थिक माहिती ती अशी,  वर्ष २०२३-२४ मध्ये आर्थिक वृद्धी दर ७.६% होता. महाराष्ट्राच्या आर्थिक रचनेत कृषी क्षेत्राचा सरासरी वाटा १२% आहे, तर कृषी आणि संलग्न घटकांवर सुमारे ५०% लोकसंख्या अवलंबून आहे. उद्योग क्षेत्राचा वाटा ३०.९% तर सेवा क्षेत्राचा वाटा ५७.१% आहे. राज्याची १२-१३ कोटी लोकसंख्या आहे, यातील ४५% पेक्षा अधिक नागरी भागात राहते.  ही प्राथमिक आकडेवारी लक्षात ठेवून 'Well Begun..' मध्ये थोडीशी मुशाफिरी करत पुन्हा कथा मूळपदाकडे आणू...  महाराष्ट्र हा कायमच एक समृद्ध प्रदेश राहिलेला आहे. प्राचीन काळापासूनच. पश्चिम किनाऱ्यावरील शूर्पारक, पुरी (आताचे घारापुरी), साष्टी, ही बंदरे प्राचीन काळापासून आहेत. दक्षिणापथ त्यातील अवंती ते पै...

सीतारामन: अंडररेटेड अचिव्हर भाग २

Image
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने गेल्या दशकात 'Real GDP Growth' दिली. पहिल्या पाच वर्षात अरुण जेटली यांनी त्याचा पाया रचला गेला, गेल्या पाच वर्षांत निर्मला सीतारामन यांनी पाया अधिक भक्कम करत काही मजले चढवले आणि आता इमारत अधिक भक्कम करण्याची त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. आर्थिक शिस्त राखत वास्तव विकास देण्याचे त्यांचे कार्य काहीसे झाकोळले गेले आहे. त्या एक प्रकारे Underrated Achiever आहेत, त्यांच्या कार्याचा हा आढावा....   'सम्यक' हा भारतीय मार्ग आहे. तो जसा सरकारने आर्थिक धोरणात आचरला तसाच भारतीय रिझर्व्ह बँक, मौद्रिक धोरण समितीने आचारला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या रथाची ही दोन चाके एका सुरात चालत आहेत. म्हणूनच वर्ष २०२३-२४ मध्ये आर्थिक विकास दर ८.२ टक्के आहे. आणि,..... महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित कक्षेत म्हणजेच ४%(+-२) आला आहे.  'दृष्टांत' ही एखादा विषय समजावून देण्याची खास भारतीय पद्धत! त्याचाच आधार घेत भारतीय रिझर्व्ह बँक, गव्हर्नर शक्तिकांत दास यांची कामगिरी आणि त्याची महती गाऊ.  कोविड महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला...