Skip to main content

Posts

Showing posts from October, 2012
           मल्टीब्रान्ड रिटेल एफडीआय- हितकारक कि अहितकारक                                             १९९१!  अर्थव्यवस्थेसाठी थोडसं अपमानकारक आणि म्हणूनच क्रांतिकारी बदलांची जननी ठरलेलं वर्ष.  तेलाची आयात करण्यासाठी करण्यासाठी थेट सोन्याचा साठा  टाकण्याची परिस्थती आली होती. १९९१ च्या आर्थिक उदारीकरण-जागतिकीकरण  ह्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था   महत्वाची भूमिका बजावली. १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर  आणि परदेशी गुंतवणूक भारतात आल्यानंतर आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था निश्चितपणे प्रगतीपथावर आली. १९४८ ते १९९० पर्यंत केवळ ४%-५% एवादीच वाढणारी  अर्थव्यवस्था ५%-८% नि वाढू लागली. परकीय गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत केवळ २१% वाटा असणारं तृतीयक क्षेत्र (बँकिंग,  विमा, सेवा, इ.) आज अर्थव्यवस्थेतला ५८% वाटा उचलत आहे. कोकणातला आंबा अमेरिकेत जातो आहे, टाटा-रिलायंस-इन्फोसिस सारखे उद्योगसमूह दिमाखात परकीय कंपन्या गिळंकृत(TAKE OVER) करत आहेत.(परकीय उद्योगसमूहही भारतीय गिळंकृत करत आहेत हि गोष्ट निराळी.)  भारतीय अभियंते आणि उद्योजक दिमाखात  जगभरातल्या कंपन्यांवर राज्य करत आहेत ते केवळ ह