Skip to main content

Posts

Showing posts with the label संगीत (Music)

How poets personified Shivaji Maharaj

  साजि चतुरंग सैन अंग में उमंग धरी  सरजा शिवाजी जंग जीतन चलत हैं  भूषण भनत नाद बिहद नगारन के  नदी-नद मद गैबरन के रलत हैं  ऐल-फैल खैल-भैल खलक में गैल गैल  गजन की ठैल-पैल सैल उसलत हैं  तारा सों तरनि धूरि-धारा में लगत जिमि  थारा पर पारा पारावार यों हलत हैं  This is how Kavi Bhooshan describes how Chhatrapati Shivaji Maharaj looks like when he begins his march for a war. He says, the sounds of kettle-drums are deafening and the young bull-elephants are secreting so much that, there are rivers of them flowing. The elephants are spreading such commotion that there is chaos and disorder in the paths of enemy, where this treads. So thunderous is there movement that the hills along are being uprooted. The feet and the hooves of this army raise so much dust that it covers the sky and the shining sun is reduced to but like a twinkling star. As the massive army marches through, the earth trembles like mercury on a wobbling plate. (Translation by Atul Sab...

अखेरचा हा तुला दंडवत

स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे.. शांता शेळकेंच्या शब्दांना स्वरसाज चढवणारी व्यक्ती ही त्यातल्या 'मराठी पाऊल पडते पुढे' चे मूर्तिमंत उदाहरण. यात काहीही अतिशयोक्ती ठरणार नाही. आठ दशकांहून अधिक काळ हिंदी, मराठी सोबत भारतातील जवळ जवळ सर्व भाषांतील हजारांच्या घरातील गाणी, मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन, अशी त्यांची देदीप्यमान कारकीर्द. ते मराठी पाऊल अवघे जग व्यापून दशांगुळे उरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे लता मंगेशकर. सर्वांच्या लाडक्या लता दीदी. त्यांच्या अचाट, अफाट कामगिरीचा यथोचित गौरव झाला. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न, चित्रपट जगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके सन्मान आणि अगणित सन्मान त्यांना मिळाले. कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण प्रत्येक पिढीला त्या 'आपल्या' वाटत आलेल्या आहेत. हे आपलेपण, हा जिव्हाळा, हे प्रेम, एखाद्याच्याच वाट्याला येते. ते आयुष्याचे संचित गाठण्यासाठी कुठली तपश्चर्या करावी लागत नाही. आपण निवडलेले क्षेत्र, त्यातली उत्तमता, उत्कृष्टता हीच तपश्चर्या होते.  मुली औक्...

कुमार गंधर्व

  कुमारच्या चेहऱ्यावर आजाराचे कुठलेच लक्षण नव्हते. पाच वर्षापूर्वीच्याच कानांना 'आता अवधारिजो जी' असे जरासे बजावून सांगणारा तोच, तसाच षड्ज लागला आणि त्यापूर्वी कोणीही न ऐकलेल्या एका रागातल्या चिजेचा अद्भुत मुखडा कानी पडला, "मारुजी भूलो ना म्हाने". अस्ताई म्हटल्यावर पुन्हा चिजेच्या तोंडाकडे येताना मारुजीमधल्या 'जी'वर कुमार कोमल रिषभावर दोनच सेकंद असेल पण अशा ताकदीने ठेहरला की त्या कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला. त्या रिषभाची जखम आजही माझ्या मनात ओलीच आहे. कुमारने मग त्या रागाचे नाव सांगितले, 'सोहनीभटियार' आणि म्हणाला, "गेल्या काही वर्षात असे काही नवे राग आणि नव्या चिजा झाल्या आहेत." पु.ल. नावाच्या शब्दप्रभूने 'मंगल दिन आज' या गुण गाईन आवडी मधील व्यक्तिचित्रात पंडित कुमार गंधर्व या संगीतातील अलौकिक चमत्काराचे असे वर्णन केले आहे.  पुल ज्याप्रमाणे त्या नव्या रागातील कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला असे वर्णन करतात, तो कोमल रिषभ लागला, म्हणजे काय झालं हे नीट सविस्तर समजावून सांगितल्याशिवाय काही मला कळणार नाही. पण एक ग...

संगीत मार्तंड

धुंवाधार पाऊस कोसळत होता. आजी-आजोबा, मामा-भाचे वगैरे गोतावळा गाडीने तुळजापूरच्या वाटेवर होतो. अशा प्रवासात कायम असतात तशी गाणी तत्कालीन टेपवर वाजत होती. माझ्या मामाने प्रस्ताव मांडला, की एक भजनाची कॅसेट आहे माझ्याकडे. ऐकू. छान वाटेल. भजन म्हटल्यावर आम्ही मुलं काहीसे नाखूष झालो. पण एक समजूतदार तोडगा निघाला, की इतका वेळ इतर सर्व सुरूच होतं, आता हे ऐकायला काय हरकत आहे? संध्याकाळी साडेसातची वेळ असावी. अंधार पडला होता. पाऊस होताच, मृदंगाचा भजनी ठेका ऐकायला आला आणि,  ओम नमो भगवते, वासुदेवाय... मृदंगाच्या तालाच्या पार्श्वभूमीवर हळूहळू वाढत जाणाऱ्या आवाजात हे बोल ऐकायला आले. एका विलक्षण अनुभूतीला सुरुवात झाली. त्या वासुदेवाची आराधना मृदंग, टाळाच्या साथीने सुरु झाली. प्रत्येक कडव्यात एका अक्षरापासून त्या श्रीविष्णूची कौतुके गायली जातात. वामनम विश्वरुपंच वासुदेवम च विठ्ठलम... असं म्हणत त्वं वंदे वेदवल्लभम असं समेवर येताच आपणही आपसूक गायला लागतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.. पंडित जसराज या संगीत मार्तंडाशी माझी ओळख ही अशी झाली. वास्तविक ते वय, "शास्त्रीय संगीत म्हणजे काय? दळण दळल्यासारखं एकच...

'सुधाकांत' डॉ. भूपेन हजारिका

'सुधाकांत' डॉ. भूपेन हजारिका  दिल हुंम हुंम करे , घबराए ..... लताचा आवाज आणि एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारी चाल. त्या चालीत काहीतरी वेगळे आहे. ह्याप्रकारची चाल, संगीत संयोजन याआधी फारसे कधी ऐकलेले नाही. एक वेगळी अनुभूती आहे. कोठून आली ती? ह्या चालीचा निर्माता कोण? तो आहे आसामचाच नाही तर देशाचा सुपुत्र 'सुधाकांत' भूपेन हजारिका. ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात पसरलेला आसाम भारतीय संस्कृतीचे एक आगळे वेगळे रूप दाखवतो. श्रीमंत शंकरदेवांनी दाखवलेल्या वैष्णव धर्माची पताका आसाम अभिमानाने वागवतो. त्या वैष्णव धर्माचे एक महत्वाचे स्थान म्हणजे माजुली आणि त्या असं पासचे क्षेत्र. त्या क्षेत्रातच आसामच्या ह्या श्रेष्ठ संगीतकार, गायक, गीतकार, कवी, चित्रपटकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, शिक्षण तज्ञाचा जन्म झाला. आसामचे लोकसंगीत, प्रचलित संगीताचे विविध प्रकार आत्मसात करत, असामी भाषेचा गोडवा, शब्दांची गंमत अंगीकारत पुढे त्याने आसामचे नाव देशभरात पोचवले. तेझपूर सारख्या गाववजा शहरात त्यांची भेट ज्येष्ठ आसामी कवी, नाटककार आणि पहिले आसामी चित्रपटकर्ते  ज्योती प्रसाद अग्रवाल यांच्याशी झाली. त्याचबर...