या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!
Monday, 30 December 2019
Gentlemen Spymaster
Tuesday, 10 December 2019
Panipat: The Great Betrayal
पानिपतच्या परजयाची अनेक करणं सांगता येतील. या एका विषयाच्या अभ्यासासाठी तज्ञांनी हयाती घालवल्या. पानिपतच्या परजायची प्रमुख कारणं म्हणजे या लढ्याविषयी हिंदुस्थानातल्याच राज्यकर्त्यांमध्ये असलेली उदासीनता. भरतपुरचा सुरजमल जाट आणि पतियालाचा आलासिंग जाट हे तेवढे अप्रत्यक्षपणे का होईना पण मराठ्यांच्या बाजूने उभे होते. स्वतःला सुरमा समजणारे राजपूत राणे कोठे होते? त्या मराठ्यांची नांगी परस्पर ठेचली जात आहे, आपण यात का पडायचं असला स्वार्थी विचार करून स्वतःला राणा प्रतापचे वंशज समजणारे राजपूत वाळवंटात दडून बसले. याच रन प्रतापच्या वंशजाने अब्दालीला हिंदुस्थान लुटण्याच आमंत्रण दिलं होतं. प्रत्यक्ष महाराष्ट्रातूनही रसद पोचली नाही. दुसरं कारण ते लष्करात बायका आणि यात्रेकरूंचा अनावश्यक भरणा. लष्करी मोहिमेत यात्रेकरूंचा, बाजारबुण्ग्यांचा इतका जमाव मोहिमेचं मातेरं करायला पुरेसा असतो. पनित्च्य संग्रामाने ते सिद्ध केलं आहे. लष्कराचा वेग मंदावतो. हव्या त्या हालचाली वेगाने करता येत नाहीत. 'आठ दिवसात परतुडाहून बऱ्हाणपूर गाठू' ही भाऊसाहेबांची योजना होती. या यात्रेकरूंच्या आणि बुणगाईताच्या लोंढ्यामुळे वेग मंदावला. ते अंतर कापण्यासाठी महिन्याच्या वर कालावधी लागला. यावरूनच अंदाज येईल. तिसरं कारण ते रसद पुरवठा. मध्य आणि उत्तर प्रांतात दोन वर्ष दुष्काळ पडलेला होता. अब्दालीने यापूर्वी दोन स्वाऱ्या करून यत्थेछ लुट केली होती. या लुटीच्या भयामुळेच तिकडील शेतकऱ्यांनी पेरण्यादेखील केलेली नव्हत्या. पेरण्याच नाहीत तर कसलं उत्पादन? आणि जुन्या साठवनुकीवर तरी कुठवर पुरवठा करणार? युद्धापुर्वीपर्यंत गोविंदपंत खेर अन्तर्वेदितुन रसदेचा पुरवठा करत होते. पण त्यांच्या मृत्युनंतर खरी आबाळ सुरु झाली. पतियलाचा आलासिंग जाटदेखील पुरवठा करत होता, पण अब्दालीने तीही रसद तोडली. प्रत्यक्ष युद्ध्याच्या आधी चार दिवसांपासून मराठी लष्कर झाडांचा पाला आणि नदीकाठच्या शाडूच्या मातीवर गुजराण करत होतं. उपाशी लष्कर प्रत्यक्ष युद्ध्त मात्र तीन-साडेतीनपर्यंत विजयी लढाई खेळत होतं. आणि पाचवं ते सरदारांच्यातली बेदिली. होळकर-शिंदे याचं विळ्याभोपळ्याचं सख्य. पवार, गायकवाड, विंचूरकरांची काही निराळीच तर्हा. त्यातून तोफखाना प्रमुख इब्राहिमखान गर्द्यवर सर्वच सरदारांचा राग. आणि लढाईच्या पद्धतीवरून सर्व सरदार आणि भाऊसाहेबांमध्ये तिढा.
पानिपत हे यमुनेच्या खोर्यातील गाव. शालेय भूगोलाच्या भाषेत सांगायचं तर 'गंगेच्या मैदानाच्या प्रदेशात' गंगा-यमुनेच्या गाळामुळे बनलेला सुपीक पण सपाट प्रदेश. मराठे सह्याद्री पर्वताच्या आणि दक्खनच्या प्रदेशातले. तिथे शिवाजीने निर्माण केलेल्या 'गनिमी कावा' या युध्दपद्धतीत तयार झालेलं हे मराठी लष्कर. त्यात निकराची झुंज देण्याऐवजी शत्रूला बोचकारे काढून हैराण करून नामोहरम करण्याची पद्धत. आणि दक्खनचा, सह्याद्रीचा मुलुख या युद्धप्रकारासाठी अत्यंत अनुकूल. पानिपतावर नेमका उलटा प्रकार. शत्रूवर अचानक झडप घालून डोंगरात पळून जायला दूरदूरपर्यंत डोंगरांचा मागमूस नाही. अशा परीस्थित मैदानावरच्या लढाईचे अचूक आडाखे बांधून लष्कराचा अत्यंत बळकट व्युह रचणारा बहुसहेब अविचारी कसा ठरू शकतो? वास्तविक इब्राहीम्खानाच्या तोफखान्याच्या जोरावरच मराठी लष्कर दुपारी तीन वाजेपर्यंत विजयी होत आलेलं होतं. इब्राहीमखान गरदी पकडला गेला आणि तोफखाण्याचा मारा बंद पडला.
या लढाईच्या कारणांची चर्चा करत असता, एक मुद्दा महत्वाचा ठरतो. तो म्हणजे रोहीलखंडचा नवाब नजीब. अब्दालीला मराठ्यांविरुद्ध पानिपतावर उभा करणारा कापती नजीब हाच खरा युद्ध घडवून आणणारा मनुष्य ठरतो. मराठ्यांविरुद्धच्या लढाईला धर्मयुद्धाचं स्वरूप दिलं ते नजिबनेच. या धर्मयुद्धाच्या हाकेमुळे अब्दालीचे लष्कर देखील पेटून उठले. नजीबच्या मायावी शब्दांच्या जाळ्यात अडकले. या युद्धात अब्दालीच्या सैन्याचीही वाताहत झाली. अब्दाली भारतात असतानाच अफगाणिस्तानात बंडाळी झाली. त्यामुळे अब्दालीही लवकरात लवकर परत जाण्यास उत्सुक होता. अब्दाली पानिपतावर निसटता विजय मिळवून परत गेला तो पुन्हा परत भारतात येऊ शकला नाही. किंबहुना कोणीच खैबर खिंड मार्गे भारतावर आक्रमण करू शकलं नाही. वास्तविक एक निराळाच आक्रमक समुद्रमार्गे येऊन स्थानापन्न झाला होता. तो म्हणजे इंग्रज-फ्रेंच-पोर्तुगीज ह्या युरोपीय सेना. पानिपतच्या संग्रामाचा पट खूप मोठा आहे. निजामाविरुद्ध झालेली उदगीरची लढाई नंतर देवगिरी परतूर मुक्कामाहून मोठा लवाजमा, राजकारण, समाजकारण हे सर्व सांभाळत शेवटी अन्नाला मोताद झालेली मराठी प्राणपणाने लढली. आजवर काहीसा दुर्लक्षित असा हा विषय मोठ्या पडद्यावर येणं गरजेचं होतं. दुसऱ्या बाजूला हेही तितकंच खरं की हे आव्हान खूप मोठे आहे. त्यामुळे आशुतोष गोवारीकरांसारखा दिग्दर्शक या विषयाला हात घालतो तेव्हा उत्सुकता अधिक वाढते. जोधा-अकबर मध्ये इतिहासकालीन काल्पनिक कथा त्यांनी हाताळली आहे. पण इथे सर्व लेखी-टाकी पुराव्यांनी सिद्ध असा इतिहास आहे. हा इतिहास विविध कादंबऱ्या, इतिहास मांडणारी पुस्तके, ग्रंथ यांच्याद्वारे महाराष्ट्रात तरी परिचित आहे. त्यामुळेच जेव्हा पानिपत चित्रपटाचा ट्रेलर बाहेर आला तेव्हा अर्जुन कपूर आणि संजय दत्त हे कलाकार पाहून काही वेगळा विचार आला होता. कपूरचा प्रत्येक प्रसंगात ताठर चेहरा पाहून लोकांनी निवड चुकली अशा प्रकारची टीका केली होती. पण चित्रपट पाहून आल्यावर बऱ्याच शंका (कलाकृतीबद्दल) दूर होतात.
चित्रपटाची सुरुवात उदगिरीच्या लढाई पासून होते. उदगिरीचा विजय संपादून सदाशिवराव भाऊ आणि सेना पुण्यात येते. (इथे क्रिएटिव्ह लिबर्टी की घोडचूक? कारण उदगिरी नंतर मराठी फौज थेट देवगिरी म्हणजेच दौलताबादला गेली. तिथून परतूर आणि तिथूनच पानिपत मोहिमेवर.) मराठी संस्कृती, एकंदर वातावरण उत्कृष्ट कलादिग्दर्शनातून योग्य रीतीने दाखवणात आलं आहे. पुण्यातील तसेच कंदहार, कुंजपुरा, पानिपत, दिल्ली असे किल्ले तसेच विविध शामियाने वगैरे भव्यतेने साकारले आहेत. चित्रपटाचा एकंदर आवाका पाहता काही गोष्टी ज्या आवर्जून येणे अपेक्षित होते किंवा अधिक उठावदारपणे येणे अपेक्षित होते त्या आल्या नाहीत. म्हणजे पानिपत मोहिमेसाठी प्रमुख कारणीभूत ठरलेली घटना म्हणजे बुराडी घाट लढाई, जेथे दत्ताजी शिंदे मारले गेले. ती लढाई अधिक उठावदारपणे आणि अधिक विस्तृत दाखवली असती तर मोहिमेचं प्रमुख कारण पुढे आलं असतं. पेशवे कुटुंबात किंवा एकंदरच समाजात अतिशय कमी वयात लग्ने होत असत. सदाशिवराव भाऊंचे पार्वतीबाईंशी लहान वयातच लग्न झाले होते. केवळ प्रेमकहाणी दाखवण्याच्या अट्टाहासापायी निष्कारण वेळ घालवला नसता तर अधिक महत्वपूर्ण गोष्टी दाखवता आल्या असत्या किंवा लांबी कमी करता आली असती. उत्तर भारतात सुरू असलेले राजकारण, अहमदिया करार, गलितगात्र मुघल गादी, वजीरपदासाठी चाललेल्या खेळी हा सर्व पट योग्य रित्या मांडण्यात आला आहे. त्यातही काही ढोबळ तर काही किरकोळ चुका आहेत. त्या चुका काय आहेत त्यासाठी इतिहास संशोधक आणि लेखक कौस्तुभ कस्तुरे यांचा फेसबुकवरील लेख आवर्जून वाचावा. सामाजिक उद्रेक किंवा आजच्या भाषेत कॉंट्रोव्हर्सी टाळण्यासाठी अनेक गोष्टी एक तर वगळण्यात आल्या आहेत किंवा सोयींसकररीत्या बदलण्यात आल्या आहेत. तरीही सुरजमल जाट यांचं पात्र अवमानकारक आहे असं म्हणत राजस्थानमध्ये काही लोकांनी ओरड सुरू केलीच आहे. शिवाय अफगाणिस्तानातून काही निषेधाचे सूर येत आहेत. कारण त्यांचा उत्कृष्ट वीर अहमदशाह अब्दाली इथे खलनायक आणि क्रूर दाखवण्यात आला आहे. सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेत अर्जुन कपूर आपल्या आवडी-निवडीनुसार आवडेल किंवा अगदी सहन होणार नाही. पण बाकी कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखांत चपखल बसले आहेत. नानासाहेब पेशव्यांच्या भूमिकेत मोहनीश बहल, गोपिकाबाई पद्मिनी कोल्हापुरे, मल्हारराव होळकर रविंद्र महाजनी, जनकोजी शिंदे गश्मीर महाजनी, अहमदशाह अब्दाली संजय दत्त आणि सर्वात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा नजीब मंत्रा या अभिनेत्याने साकारली आहे. सर्वात जास्त लक्षपूर्वक केला गेला आहे तो प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग. पुरेसा वेळ, डावपेचांनी आखणी आणि प्रत्यक्षातील लढाई हे सर्व भव्यपणे मांडलं आहे. भारताच्या इतिहासातील ही अतिशय महत्वाची गाथा काही चुका आहेत म्हणून अगदीच टाकाऊ म्हणून बाजूला करण्यात अर्थ नाही. एकदा आवर्जून पाहावी.
पानिपतची आशुतोष गोवारीकर कृत गाथा मोठ्या पडद्यावरच का पाहावी? उत्कृष्ट कलादिग्दर्शनाद्वारे उभ्या राहणाऱ्या काळासाठी. यासाठी नितीन देसाई यांचे अभिनंदन. दुष्मनची वाट लावली वगैरे छछोर नाही तर खरंच मराठमोळी गाणी आणि चपखल पार्श्वसंगीतासाठी. त्यासाठी अजय-अतुल यांचे अभिनंदन. मराठी कलाकारांची मांदियाळी आहेच शिवाय मराठी भाषेचा लहेजा पकडत आपापल्या भूमिका चोख बजावणाऱ्या अभिनेत्यांसाठी. पानिपत सारखा मर्मबंधातला विषय इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहता येण्यासाठी. यासाठी आशुतोष गोवारीकर यांचे अभिनंदन. अनेक तपशिलांच्या त्रुटींनी भरलेली असली तरी एकदा आवर्जून पाहावी अशी कलाकृती पानिपत.. The Great Betrayal.
Monday, 2 December 2019
Sri Lanka: Maj. Gen. Shashikant Pitre
Thursday, 28 November 2019
फर्जंद ते फत्तेशिकस्त
Tuesday, 19 November 2019
जेएनयू: दुसऱ्या नवनिर्माणाचे स्वप्नाळू आंदोलन?
विद्यार्थी.. या नावात, संकल्पनेतच एक ऊर्जा आहे. प्रश्न विचारणारी, बंडखोरी करणारी ऊर्जा आहे.
पारंपरिक भारतीय शिक्षणपद्धती शैक्षणिक परिप्रेक्ष्यात प्रश्न विचारण्याला, बंडखोरीला उत्तेजन आहे. भारतीय शिक्षणपद्धतीत गहन विषय गुरू-शिष्यांमधील प्रश्नोत्तरांतूनच उलगडत गेले आहेत.
काळ पुढे सरकत गेला तसं विद्यार्थ्यांमधील बंडखोरीच्या कक्षा विस्तारल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबतच अधिक व्यापक राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर विद्यार्थीप्रणित आंदोलने जगभर झाली. काही यशस्वी, काही अयशस्वी तर काही नव्या व्यवस्थेला जन्म देणाऱ्या चळवळी जन्माला आल्या. असंच मजेची गोष्ट सांगायची तर अफगाणिस्तानात धार्मिक, दहशतवादी उत्पात माजवणाऱ्या संघटनेच्या नावाचा अर्थ विद्यार्थी असाच आहे. ती संघटना म्हणजे तालिबान. अर्थात त्यांच्या 'विद्येच्या' आणि विद्यार्थ्यांच्या कल्पना खूपच वेगळ्या आहेत.
भारतात देखील विद्यार्थी चळवळींचा मोठा वारसा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक विद्यार्थी संघटना स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होत्या.
स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला महात्मा गांधींनी 'स्वतंत्र भारताच्या सरकारांनी योग्य कारभार केला नाही तर स्वतंत्र भारतात जन्माला आलेली पिढी या व्यवस्थेला प्रश्न विचारणार, त्याविरुद्ध बंड करून उठणार. त्यावेळी मी त्या पिढीच्या पाठीशी उभा राहीन.' असे वक्तव्य केले होते.
त्याप्रमाणे खरोखरच स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्या पिढीने, त्यातही मुख्यतः एका जनआंदोलनाची सुरुवात केली. त्या विद्यार्थी चळवळीची ठिणगी पाहता पाहता मोठी झाली आणि आणीबाणीच्या मार्गे एक काहीशी अपयशी पण दूरगामी परिणाम करणारी लोकशाही मार्गाने झालेल्या क्रांतीत परावर्तित झाली. हे जनांदोलन म्हणजेच नवनिर्माण आंदोलन. नवनिर्माण आंदोलन आणि जेएनयू मधले विद्यमान आंदोलन यांच्यात काही एक संगती आहे का? सध्याचे आंदोलन खरंच तेवढ्या क्षमतेचे होऊ शकेल की त्याची एक स्वप्नाळू अखेर होईल?
ते वर्ष होते १९७३-७४. गुजरात मधल्या मोरबी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेसचे दर वाढवण्यात आले. शेंगदाणा तेलाचे दर वाढल्यामुळे मेसचे दर वाढवल्याचे महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले. त्या वर्षी गुजरातचे प्रमुख नगदी पीक असलेल्या शेंगदाण्याचे बंपर पीक आले होते.
अर्थशास्त्राच्या मूलगामी नियमानुसार पुरवठा वाढला आणि मागणी कमी असेल किंवा आहे तेवढीच असेल तर उत्पादनाचे दर कमी होतात. पण तत्कालीन व्यवस्थेत काळाबाजार, साठेबाजी, कृत्रिम टंचाई, मक्तेदारी या सरकारी धोरणांमुळे निर्माण झालेल्या गोष्टी होत्या. या पार्श्वभूमीवर हा घटनाक्रम सरळसोट वाटत असला तरी त्यातील घोळ लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले.
त्या आंदोलनात आपापले राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी राजकारणाने प्रवेश केला. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातीलच विरोधी गटांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शेंगदाणा आणि तेल व्यापारी यांच्यातील कृत्रिम टंचाई, साठेबाजी, तेलाचे दर वाढवणे याविषयी चालेलेल्या संभाषणाची टेप विद्यार्थ्यांना मिळेल अशी सोया केली. विद्यार्थी पातळीवर सुरू झालेल्या या आंदोलनाची तीव्रता बघता बघता वाढत गेली. त्यात भ्रष्टाचार, सामाजिक असे अनेक घटक वाढत गेले.
त्याच काळात पूर्वेकडे बिहारमध्ये अशीच विद्यार्थी आंदोलने सुरू झाली होती. त्यात राजकीय रंग चढत व्याप्ती वाढत गेली. ती विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर जायला लागली तेव्हा लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी नेतृत्व स्वीकारले. त्यापुढे या आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली.
जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया अशा समाजवादी धुरिणांमुळे आणि बिहार-उत्तर प्रदेशातील तत्कालीन विद्यार्थी नेत्यांच्या समाजवादी विचारसरणीमुळे या आंदोलनाला तो चेहरा प्राप्त झाला. त्याची परिणती पुढे जाऊन आणीबाणी, जनता पक्ष यात झाली.
आंदोलनाची पुढची राजकीय वाटचाल कशीही झाली असली तरी त्यातून जे नेते पुढे आले त्यांत काही अपवाद वगळता इतर सर्वच व्यवस्थेचा भाग झाले.
गुजरात मधील आंदोलनाचे सुरुवात करणारे नेते उमाकांत मांकड आणि मनिशी जानी यांनी पुढे काँग्रेसमध्येच प्रवेश केला. ज्या काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचार वगैरेंच्या विरोधात त्यांनी रान उठवले होते त्याच पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यांची राजकीय कारकीर्द फारशी पुढे गेली नाही.
उमाकांत मांकड यांना गुजरातमध्ये लोकांनी रस्त्यात गाठून प्रचंड चोप दिला होता. कारण त्यांच्याविषयी एक विश्वासघाताची भावना लोकांमध्ये पसरली होती.
तीच गोष्ट उत्तर प्रदेश-बिहारची. मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, रविशंकर प्रसाद अशी काही नेते मंडळी या आंदोलनातून पुढे आली. लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव हेच पुढे भ्रष्टाचार शिरोमणी म्हणून गाजले. अपवाद म्हणता येईल तो नितीश कुमार आणि रविशंकर प्रसाद यांचा. नितीश कुमार आज बिहारमध्ये एक चतुर राजकारणीच नाही तर बिहारचे विकासपुरुष म्हणून नावारूपाला येत आहेत.
हे नवनिर्माण आंदोलन महाविद्यालयीन निर्णय, धोरणांमुळे सुरू झलन असलं तरी त्यात पुढे देशपातळीवरील मुद्दे आले. देशाची लोकशाही अधिक प्रगल्भ, मजबूत करणारी चळवळ त्यातून उभी राहिली.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. जागतिक स्तरावर नावाजलेली संस्था. वैचारिक, शैक्षणिक दृष्ट्या मोकळे, चर्चा, वादविवादांना मुक्त स्थान असणारी संस्था. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, प्रशासन, सैन्य अशा विविध क्षेत्रांतील दिग्गज या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.
एका बाजूला असे वातावरण आहे तर दुसऱ्या बाजूला ' भारत तेरे तुकडे होंगे हजार, अफजल हम शरमिंदा है तेरे कातील जिंदा है' अशा घोषणा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देणारे विद्यार्थी याच संस्थेत आहेत. हिंदू संस्कृती, विचार, प्रथा यांचे अश्लाघ्य अर्थ काढून त्यावर रान उठवणारे विद्यार्थी याच संस्थेत आहेत.
भारताची संवैधानिक व्यवस्था उलथवून क्रांती घडवण्याच्या सरळ सरळ देशद्रोही अशा माओवादी विचारसरणीचे समर्थन करणारे विद्यार्थी, प्राध्यापक याच संस्थेत आहेत. छत्तीसगढच्या दंतेवाडा मध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या ७६ सीआरपीएफ जवानांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणारे विद्यार्थी याच संस्थेत आहेत.
मेसमध्ये बिर्याणीत तूप कमी का वापरले म्हणून आंदोलन, वर्गात उपस्थिती अनिवार्य केली म्हणून आंदोलन, काही धोरणात्मक, शैक्षणिक निर्णय घेतले गेले म्हणून आंदोलन, कलम ३७० चा निर्णय घेतला म्हणून आंदोलन, अयोध्येची जमीन सर्वोच्च न्यायालयाने रामलल्लाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय दिला म्हणून आंदोलन, गाझा पट्टीत इस्राईल दहशतवाद्यांना टिपण्यासाठी कारवाई करते म्हणून आंदोलन. फुटकळ विषयापासून ते जागतिक मुद्द्यांपर्यंत कुठल्याही विषयावर ते आपल्या विचारसरणीच्या विरुद्ध असेल तर आंदोलन. त्यात विद्यापीठाचा परिसर, इमारती यांवर 'अभिव्यक्ती' प्रकट करणारी कलाकारी करणारे विद्यार्थी याच संस्थेत आहेत.
सध्या सुरू असलेले हॉस्टेल आणि मेसची फीवाढीविरोधातील आंदोलन. तब्बल १९ वर्षांनंतर हे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धक्का बसेल इतके कमी दर आहेत. दोन कॉट असलेल्या रूमचं एका विद्यार्थ्याला भाडं होतं १० रुपये प्रतिमाह ते वाढवून ३०० रुपये करण्यात आलं. मेसची फी नाही तर अनामत रक्कम वाढवण्यात आली. सेवा शुल्क वाढवण्यात आले. यावरून ठिणगी पडली (त्या संस्थेत ती कशावरूनही पडते. ) आणि आंदोलन सुरू.
या आंदोलनाचे स्वरूप काय? विद्यार्थी आंदोलकांनी आजारी प्राध्यापकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा रस्ता अडवला. संस्थेच्या असोसिएट डीन डॉ. वंदना मिश्रा यांना घेराव घालून त्यांना एका वर्गखोलीत अडकवून ठेवण्यात आलं.
विद्यापीठ परिसरातील सभागृहात एका सभागृहात एक समारंभ सुरु होता. विद्यार्थी आंदोलकांनी या सभागृहाच्या गेट आणि बाहेर पडायचे रस्ते अडवून धरले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री ५ तास त्याठिकाणी अडकून पडले. विद्यापीठ परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला.
संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेवर मोर्चा नेण्याचा मानस पोलिसांनी हाणून पाडला. या विद्यार्थी आंदोलनांमुळे त्या परिसरातील अनेक मेट्रो स्टेशन बंद करावे लागले. ही कुठली विध्वंसक वृत्ती? स्वतःला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, बुद्धिजीवी वगैरे म्हणवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अशा विध्वंसक आंदोलनाची अपेक्षा नाही.
विद्यार्थी आंदोलकांनी या आंदोलनामागे '४० टक्के विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १ लाख ४४ हजारांपेक्षा कमी आहे. त्यांना उच्चशिक्षणाचा हक्क नाही का? त्यांना अधिक शुल्क देणे शक्य नाही. हा त्यांच्यावर अन्याय आहे. तसेच या संस्थेत अनुदानित शिक्षण आहे. त्यावर सर्व विद्यार्थ्यांचा हक्क आहे.' असे युक्तिवाद केले जात आहेत.
त्यावर सोशल मीडिया, या आंदोलनाच्या टीकाकर्त्या वर्गाने इतर सरकारी उच्चशिक्षण संस्थांचा हवाला दिला आहे. आयआयटी, आयआयएम आणि इतर संस्थांत शैक्षणिक शुल्क या संस्थेपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. शिवाय त्यात वेळोवेळी बदलही करण्यात आले आहेत.
या संस्थांत वेळोवेळी आंदोलने झाली आहेत. हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठात रोहित वेमुला या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर अनोलन झाले. पण त्याचे स्वरूप अशा विध्वंसक पातळीवर गेले नाही. याच संस्थेत हे का? हा प्रश्न पडायला हवा.
त्याचे उत्तर काही प्रमाणात येथील डाव्या विचारसरणीचा पगडा यात दिसून येईल. उच्चशिक्षण घ्यायचे असेल तर त्याचे शुल्क देण्याची तयारी असायला हवी. इतर संस्थांत असलेले जास्तीचे शुल्क यांचे दाखले दिल्यानंतर विद्यार्थी आंदोलकांकडून 'प्रश्न फक्त जेएनएयू चा नाही, प्रत्येक उच्चशिक्षण संस्थेत अत्यल्प शुल्कात, अनुदानित शिक्षण मिळालेच पाहिजे हा आमचा आग्रह आहे' असा युक्तिवाद मांडला जातो आहे. यावर लेखक आनंद रंगनाथन यांचे एक वाक्य चपखल बसते ते म्हणजे 'Subsidize the Education, Not the Educated.'
या बुद्धिजीवी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी विद्यापीठातील वातावरणाचे चपखल वर्णन अक्षर मैफल मासिकाचे संपादक मुकुल रणभोर याने केले आहे ते असे, 'हे विद्यार्थी ग्राउंड रिऍलिटी विसरले आहेत. ती मुलं आली असतील गरीब घरातूनच. पण जेएनयूतला मोकळेपणा, निवांतपणा, सरकार विद्यार्थ्यांवर करत असलेला खर्च या सगळ्याने मुलं हवेत गेली आहेत. विद्यापीठाच्या बाहेर पडल्यावर आपल्याला असा मोकळेपणा, निवांतपणा मिळणार नाही हे एकतर त्यांच्या लक्षात येत नाही किंवा समजून घ्यायचं नाही. याचा एक परिणाम असा होतो की जेएनयूचा परिसर सोडवत वाटत नाही. M. Phil करत असलेल्या मुलाला/मुलीला ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळाली नसली तरी दरमहा ५ हजार भत्ता मिळतो. मग फुकट नाममात्र किंमतीमध्ये जेवण, मिळणार भत्ता आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा मोकळेपणा सोडून बाहेरच्या संकुचित, बंदिस्त जगात कोणाला जावंसं वाटणार? पण जेएनयू मधल्या वातावरणामुळे बाहेरही जग असंच आहे असा ग्रह मुलांचा झाला आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बाहेरचं जग अजूनही संकुचित आहे. अजूनही तिथे मोकळेपणाला स्थान नाही.'
गरिबी, हे तथाकथित बुद्धिजीवी बेरोजगारी, आर्थिक, सामाजिक परिस्थिती यावर आपल्या विचारसरणी आणि तिथल्या झापडबंद वातावरणातून विश्लेषण, अभ्यास करतात. पण व्यवहारी जगात त्याचे काय होते, हे विद्यार्थी प्रत्यक्ष जगात नक्की कुठल्या क्षेत्रात कशा प्रकारे आर्थिक योगदान देतात हा प्रश्न पडायला लागतो. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेताना या संस्थेतील शैक्षणिक, वादविवाद याचे वातावरण यामुळे अनेक दिग्गज देशाला मिळाले आहेत. त्यातच विद्यमान अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री आहेत याचे भान कायम ठेवणे आवश्यक आहे.
सत्तरीच्या दशकातले नवनिर्माण आंदोलन आणि जेएनयूमधले हे आंदोलन यात काही सामान दुवे असले तरी फरक मात्र मोठे आहेत. सध्याचे हे विद्यार्थी आंदोलक प्रत्यक्ष जगातील परिस्थितीचे त्यांच्या कोषातून आकलन करणारे, त्यावरून गदारोळ, व्यवस्थेला प्रश्न विचारणे वगैरे बुद्धिजीवी खेळ करणारे आहेत. शैक्षणिक परंपरा उज्वल असणाऱ्या या विद्यापीठात अशा विध्वंसक वृत्ती का प्रबळ झाल्या, त्यांचे अंतःस्थ हेतू काय याचा अधिकाधिक शोध घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन स्वप्नाळू आंदोलन भासत आहे. किंवा स्वतःचे वैचारिक, राजकीय महत्व टिकवण्याची एक धडपड एवढ्याच पातळीवर हे उरले आहे. हा सर्व विचार करताना, अभ्यास करून पुन्हा एकदा आनंद रंगनाथन यांचे वाक्य उद्धृत करावे असे आहे,
The Students must get back to studies, if they are capable of it...
पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक 'स्वतंत्र नागरिक'
Monday, 18 November 2019
Veerappan: Chasing the Brigand by K. Vijay Kumar
वीरप्पन: क्रूरकर्म्याचा थरारक माग
तामिळनाडू स्पेशल टास्क फोर्सचे तत्कालीन प्रमुख के. विजय कुमार यांची विजयी गाथा
Tuesday, 12 November 2019
Political Games: Maharashtra chapter
Political Games
Thursday, 10 October 2019
जोकर
जोकर
अस्वस्थ करणारा सिनेमा
Wednesday, 25 September 2019
अमिताभ..
अमिताभ..
अभिनय असावा तर त्याच्यासारखा, सभा - संमेलनात वावर असावा तर त्याच्यासारखा, भाषेवर प्रभुत्व असावं तर त्यांच्यासारखं, व्यावसायिकता असावी तर त्यांच्यासारखी, वय सहसरचंद्र दर्शनाकडे जात असताना तरुणांना लाजावणारी ऊर्जा असावी तर त्यांच्यासारखी, वागण्या - बोलण्यात सुसंस्कृतपणा असावा तर त्याच्यासारखा. आणखी किती आणि काय गुण सांगावेत त्यांच्यातले जे अंगीकारले तर माणूस आपापल्या क्षेत्रात यशस्वी होईल, मानद होईल. भारतीय चित्रपटसृष्टीत ४० वर्षांपेक्षा जास्त काळ विविध धाटणीचे चित्रपट, जाहिरात, दूरचित्रवाणी कार्यक्रम अशा क्षेत्रांत उत्तुंग काम केलेल्या, महनीय अशा महानायकला यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. गोवा मुक्तिंग्राम ही पार्श्वभूमी असणाऱ्या सात हिंदुस्तानी या चित्रपटातील अन्वर पासून ते अलीकडेच गाजलेल्या पिंक पर्यंत आपल्या अभिनयाने, भरदार आवाजाने महानायक झालेल्या अमिताभ बच्चन यांच्याविषयी अनेक माध्यमात अनेक वेळा बोललं गेलं आहे. त्यांच्या कारकीर्दीचा उहापोह अनेक वेळा करण्यात आलेला आहे. आता पुन्हा करण्यात काय हशील असा प्रश्न पडू शकतो. पण कितीही वेळा चर्चा केली तरी काहीतरी उरतंच. पुनरुक्ती होते, पुन्हा सगळं ढवळलं जातं पण तरी बोलण्यासारखं काहीतरी उरतंच.
विसावं शतक संपत असताना जन्माला आलेल्या आमच्या पिढीसमोर चित्रपटगृहात अमिताभ आला तो कभी खुशी, कभी गम, बागबान वगैरे चित्रपटांतून. वास्तविक ते चित्रपट आले तेव्हा शाळकरी वय होतं. पांढऱ्या दाढीतल्या, भरदार आवाजाच्या या माणसाविषयी लोक इतकं भरभरून काय आणि का बोलत आहेत असा प्रश्न पडायचा. कारण बाप, काका वगैरे भूमिका तशा दुय्यम मानल्या गेलेल्या असतात. (निदान तेव्हा तरी. ) पण जसजसे मोठे होत गेलो तसा हा माणूस खूप मोठा पल्ला गाठून इथवर आला आहे आणि या वयातही चित्रपटाच्या कथानकात त्याचं महत्त्व टिकवून आहे हे लक्षात यायला लागलं. ते लक्षात येण्यासाठी निःसंशय हातभार लावला तो टेलिव्हिजनने. कारण त्याच काळात एका बाजूला हा माणूस जगाविषयी आमचं कुतूहल जागं करणारा कार्यक्रम, कौन बनेगा करोडपती सादर करत होता तर दुसऱ्या बाजूला केवळ चित्रपट दाखवणाऱ्या वाहिन्यांवर त्याचे जुने चित्रपट दाखवले जात होते. सामान्यांच्या मनातल्या असंतोषाला वाचा फोडणारा त्याचा अँग्री यंग मॅन दिसत होता, ' आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश...' म्हणत खळखळून हसवणारा नायक दिसत होता, ' पिछले छह महिनोसे बकबक सून रहा हुं...' अशी आर्त हाक घालून रडवणारा संवेदनशील नायक दिसत होता. त्यामुळे केवळ हिरोचा किंवा हिरोईनचा बाप, काका, शिक्षक वगैरे भुमिकांपुरता मर्यादित हा अभिनेता नाही हे लक्षात येत गेलं. आमच्या पिढीने त्याचा अँग्री यंग मॅन टेलिव्हिजन वर पाहिला. टेलिव्हिजनच्या पडद्यावरची त्याची माझ्या मनात घर करून गेली तर त्याकाळात पडद्यावर तयार झालेली प्रतिमा केवढी मोठी असेल कल्पनाच केलेली बरी.
अमिताभने तद्दन व्यावसायिक ते समांतर अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांत अभिनय केला. एरवी अतिशय सुमार ठरले असते असे चित्रपट त्याने आपल्या अभिनय सामर्थ्यावर तारून नेले. त्याच्या चित्रपटांची यादी भली मोठी आहे. त्यात प्रत्येकाला त्याच्या आवडी नुसार भावणार काही ना काही आहे. माझी आवड सुरू होते ती आनंद पासून. त्याचा डॉ. भास्कर बॅनर्जी आपल्या पुस्तकाचं प्रकाशन आणि कथेने सुरुवात करतो. तेव्हा अमिताभ डोळ्यात भरायला लागतो. पण काही वेळाने राजेश खन्ना येऊन आपल्या प्रसन्न वावराने सगळा चित्रपट भारून टाकतो. पण शेवटच्या प्रसंगात मात्र पुन्हा एकदा अमिताभ पडदा व्यापतो. त्या प्रसंगात अमिताभने जणू आपल्यातला अभिनेता चित्रपटसृष्टीला दखल घ्यायला लावला. ही आवड पुढे वाढत गेली ती ' कल एक और कुली उन्हे हफ्ता देने से इन्कार करने वाला है..., तुम लोग मुझे उधर ढूंढ रहे हो, और में तुम्हारा यहां इंतजार कर रहा हूं.. , में आज भी फेके हुए पैसे नहीं उठता...' हे संवाद एका बेदरकार आत्मविश्वासाने, थंड नजरेने म्हणणाऱ्या दीवार मधल्या विजयपाशी. ती आवड तशीच पुढे जाते अमर अकबर अँथनी मधल्या अँथनीपाशी. अमर (विनोद खन्ना) कडून बेदम मार खाऊन आल्यानंतर दारूच्या नशेत आरशातल्या आपल्या प्रतिमेला मलमपट्टी करणारा अँथनी, हा प्रसंग हा अभ्यास करावा असा अभिनयाविष्कार आहे. तत्कालीन चित्रपटांतील काहीशा एकसारख्या कथानकांच्या पार्श्वभूमीवर चासनाला
खाण दुर्घटनेवर आधारित काला पत्थर मधला विजय अधिक आवडू लागतो. पुढे अमिताभच्या सुमार चित्रपटांच्या काळातील पत्नीवरील बलात्काराचा सूड घेणारा डेव्हिड आणि त्याचाच मुलगा विजय अशा दुहेरी भूमिका असणारा चित्रपट आखरी रास्ता आवड अधिक वाढवतो.
ही आवड अधिकाधिक वाढत असताना खुदा गवाह, सूर्यवंशम वगैरे चित्रपट समोर येतात. कुठेतरी प्रतिमेला धक्का बसतो. पण मग पुन्हा समोर येते ती दमदार सेकंड इनिंग. ' लगान, जोधा अकबर ' ची कथा त्याच्या आवाजात उलगडते. खाकी मधला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी समोर येतो. सरकार मधला सुभाष नागरे आणि ' नो... अपने आप में एक पुरा वाक्य होता हैं...' म्हणणाऱ्या पिंक मधल्या अॅडव्होकेट सेहगल पर्यंत येत त्याची प्रतिमा अधिक मोठी होत जाते. नवरत्न तेल ते खेळकर अंदाजातलं ' कुछ दिन तो गुजारो गुजरात में..' अशा अनेक जाहिराती. आपल्या असण्याने, आपल्या बोलण्याने समोरच्याला धीर देणारा, बोलतं करणारा अमिताभ मला प्रचंड आवडतो.
आपला अभिनय, आपला आवाज हा एक ब्रँड आहे आणि त्याचा व्यावसायिक तसेच समाजोपयोगी वापर अमिताभने यथायोग्य केला आहे. गुजरात पर्यटन असो की ' दो बूँद जिंदगिके..' अशी पोलिओ लसीकरण जाहिरात असो की सध्याची स्वच्छ भारत अभियानाची जाहिरात असो. आपला ब्रँड त्याला अभ्यासाची, सुसंस्कृत वावराची नैसर्गिक जोड मिळाल्यामुळे अमिताभ अधिकच आवडायला लागतो. वेळेच्या बाबतीत काटेकोर, अत्यंत व्यावसायिक अशा हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत दुर्मिळ, महान अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवडण्यात आलं आहे. पुरस्कार मिळत जातात पण लाखो लोकांच्या मनातील प्रतिमा हा खूप मोठा पुरस्कार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीच्या महानायकाला सलाम!!
Wednesday, 18 September 2019
सेक्शन 375 : मर्जी या जबरदस्ती
सेक्शन 375 : मर्जी या जबरदस्ती
हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक रोहन खुराणा (राहुल भट) आपल्या घरी आलेल्या कॉस्चूम विभागात काम करणार्या मुलीवर बलात्कार करतो. मुलगी पोलीसात तक्रार दाखल करते. दिग्दर्शकाला अटक होते. हिंदी चित्रपटसृष्टी असल्यामुळे प्रकरण माध्यमांमध्ये खूप चर्चेत येते. मीडिया, सोशल मीडियाच्या न्यायालयात दिग्दर्शकाला दोषी करार दिला जातो. सोशल मीडियावर हँग द रेपिस्ट वगैरे हॅशटॅग फिरतो. स्थानिक सत्र न्यायालयात दाखल झालेली तक्रार, वैद्यकीय चाचणी आणि प्राथमिक तपासणीनंतर मिळालेले पुरावे यांच्या आधारावर 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली जाते. पण दिग्दर्शक त्या शिक्षेला उच्च नयायालयात आव्हान देतो. उच्च न्यायालयात त्याच्या वतीने लढायला उभा राहतो. तरुण सलुजा उच्च न्यायालयात खटला उभा राहिल्यानंतर तपासातील ढिसाळपणा, महिलांच्या बाजूने असणारा कायदा लक्षात घेता पोलिसांतर्फेच बदनामी टाळण्यासाठी लाचेची मागणी आणि इतर घटकांच्या आधारावर एक वेगळेच चित्र उभे राहाते. अशावेळी निकाल काय द्यावा असा प्रश्न उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला पडतो. सत्र न्यायालयात उभे राहिलेले चित्र आता पूर्णपणे बदललेले आहे. अशा पार्श्वभूमीवर देखील खटल्याचा निकाल महिलेच्या बाजूने लागतो.
चित्रपटाची कथा आणि पटकथा अतिशय चांगल्या पद्धतीने बांधण्यात आली आहे. वक्तव्यातून प्रथमदर्शी पुराव्यांमधून उभे राहणारे चित्र आणि प्रत्यक्षातल्या चित्रातला फरक पटकथेच्या मांडणीतून चांगल्या पद्धतीने मांडला आहे. ह्या कोर्टरूम ड्रामामध्ये वकील म्हणून अक्षय खन्ना आणि रिचा चड्ढा यांनी रंगत आणली आहे. भारतीय कोर्टरूम इमारतीमधील आरडाओरडा मख्ख चेहर्याने बघणारे न्यायाधीश वगैरे प्रकार इथे नाहीत. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या भूमिकेत किशोर कदम आणि कृत्तिका देसाई यांनी जान भरली आहे. चित्रपटात हिंदी मराठी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांचा वापर आहे. न्यायालयातल्या प्रसंगात कायद्यातील तरतुदी आणि त्यातील शब्दांवर कसा खेळ केला जातो. याचे उत्तम चित्रण आहे. ‘मी टू’च्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट महत्त्वपूर्ण आहेच पण यानिमित्ताने पुन्हा एकदा विस्तृृत पातळीवर चर्चा होणे आवश्यक आहे.
चित्रपटसृष्टीसकट सर्व क्षेत्रांत बढतीसाठी काम मिळण्यासाठी महिला सहकार्याकडे किंवा पुरुष सहकार्याकडेही लैंगिक सुखाची मागणी करणे हा चिंतनाचा काळजीचा विषय आहे. हे वर्षानुवर्षापासून सुरू असून अमेरिकेत हावॅ विनस्टीन विरोधात सुरू झालेल्या ‘मी टू चळवळीनंतर भारतात देखील महिला पुढे येऊ लागल्या. महिला आपल्यावरील अत्याचाराच्या विरोधात बोलू लागल्या. कायदेशीर कारवाई करू लागल्या. त्यावर त्यांनी त्याचवेळी तक्रार का केली नाही. ते महिला उघडपणे बोलू शकत आहेत. हे धाडसाचे कौतुकाचे आहे. सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. महिलांनी अनेक मोठमोठ्या व्यक्तींविरोधात तक्रारी दाखल केल्या. त्यात माजी केंद्रीय राज्यमंत्रांचा देखील समावेश आहे. याच प्रश्नांच्या संदर्भात आरोप असणार्या पुरुषांकडून तसेच काही महिलांकडून असा युक्तिवाद केला गेला की जोपर्यंत या महिलांना फायदे मिळत होते तोवर त्यांनी काहीही तक्रार केली नाही. आता कुठलाही फायदा मिळत नाही. ‘मी टू’ चळवळीची हवा आहे तर केवळ सुडासाठी त्यांनी तक्रार दाखल केल्या. तसेच खोट्या तक्रारी दाखल करून पैसे उकळल्याची प्रकरणेही उजेडात आली. अशा दोन परस्परविरोधी भूमिका आल्यामुळेच काद्यातील तरतुदी आणि वापरण्यात आलेले शब्द महत्त्वाचे ठरतात. दोन व्यक्तींमधील शारीरिक संबंध केवळ संमती (consent) आहे म्हणून योग्य ठरत नाहीत. तर इच्छा (will) देखील असावी लागते. महिलेची इच्छा (will) आणि संमती (Consent) असेल तरच तो शारीरिक संबंध बलात्कार मानता येणार नाही व कलम 375 मध्ये इच्छा हा शब्द संमतीच्या आधी येतो.
हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे. शब्दच्छल, चर्चा करावी तेवढी कमी आहे. मोठ्या प्रमाणात बाहेर आलेल्या सुडापोटी पैसे उकळण्यासाठी करण्यात आलेल्या खोट्या तक्रारींमुळे खर्याखुर्या भीषण बलात्काराच्या प्रकरणांत देखील पोलीस यंत्रणा, माध्यमे आणि जनतादेखील संशयाने बघायला लागेल. कायदा महिलांच्या बाजूने आहे. असायलाच हवा आहे. पण त्या कायद्याच्या सुडापोटी होणारा गैरवापर टाळण्यासाठी कडक तरतुदी तितक्याच आवश्यक आहेत. अधिक प्रगल्भ, सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी सर्व उपलब्ध साधनांनिशी जनजागृती, चळवळ आवश्यक आहे. त्यादृष्टीने एक पाऊल म्हणून अशा चित्रपटांच्या निमित्ताने चर्चा व्हावी ती कायद्यांची सेक्शन 375 मर्जी या जबरदस्ती.
Artha and the Civilisation: What Really Drives the Indian Economy
Any system rests on two principal components. One is the driving force behind the system's construction, and the other is the guiding ...
-
Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is...
-
छायाचित्र सौजन्य: इंटरनेट अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे? एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आ...
-
The establishment of Hindavi Swarajya cannot be understood as the achievement of a single individual, a single battle, or even a single stre...


























