Skip to main content

सेक्शन 375 : मर्जी या जबरदस्ती

सेक्शन 375 : मर्जी या जबरदस्ती 

‘जस्टिस इज अ‍ॅबस्ट्रॅक्ट बट द लॉ इज फॅक्ट’ असा विचार करण्यास भाग पाडणार्‍या संवादाने चित्रपटाची सुरुवात होते. हा संवाद पुढे येतो तो मुंबईतील नामांकित वकील तरुण सलुजा (अक्षय खन्ना) एका विधी महाविद्यालयात व्याख्यान देत असताना चित्रपटाच्या साधारण सुरुवातीलाच असा प्रश्नार्थक संवाद देऊन, चित्रपट मूळ कथानकाकडे वळतो. या चित्रपटाची कथा भारतीय दंडविधानाच्या कलम 375 आणि 376 च्या भोवती गुंफलेली आहे. पार्श्वभूमी आहे ती नुकत्याच झालेल्या ‘मि टू’ चळवळीची.

हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक रोहन खुराणा (राहुल भट) आपल्या घरी आलेल्या कॉस्चूम विभागात काम करणार्‍या मुलीवर बलात्कार करतो. मुलगी पोलीसात तक्रार दाखल करते. दिग्दर्शकाला अटक होते. हिंदी चित्रपटसृष्टी असल्यामुळे प्रकरण माध्यमांमध्ये खूप चर्चेत येते. मीडिया, सोशल मीडियाच्या न्यायालयात दिग्दर्शकाला दोषी करार दिला जातो. सोशल मीडियावर हँग द रेपिस्ट वगैरे हॅशटॅग फिरतो. स्थानिक सत्र न्यायालयात दाखल झालेली तक्रार, वैद्यकीय चाचणी आणि प्राथमिक तपासणीनंतर मिळालेले पुरावे यांच्या आधारावर 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली जाते. पण दिग्दर्शक त्या शिक्षेला उच्च नयायालयात आव्हान देतो. उच्च न्यायालयात त्याच्या वतीने लढायला उभा राहतो. तरुण सलुजा उच्च न्यायालयात खटला उभा राहिल्यानंतर तपासातील ढिसाळपणा, महिलांच्या बाजूने असणारा कायदा लक्षात घेता पोलिसांतर्फेच बदनामी टाळण्यासाठी लाचेची मागणी आणि   इतर घटकांच्या आधारावर एक वेगळेच चित्र उभे राहाते. अशावेळी निकाल काय द्यावा असा प्रश्न उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला पडतो. सत्र न्यायालयात उभे राहिलेले चित्र आता पूर्णपणे बदललेले आहे. अशा पार्श्वभूमीवर देखील खटल्याचा निकाल महिलेच्या बाजूने लागतो.

चित्रपटाची कथा आणि पटकथा अतिशय चांगल्या पद्धतीने बांधण्यात आली आहे. वक्तव्यातून प्रथमदर्शी पुराव्यांमधून उभे राहणारे चित्र आणि प्रत्यक्षातल्या चित्रातला फरक पटकथेच्या मांडणीतून चांगल्या पद्धतीने मांडला आहे. ह्या कोर्टरूम ड्रामामध्ये वकील म्हणून अक्षय खन्ना आणि रिचा चड्ढा यांनी रंगत आणली आहे.  भारतीय कोर्टरूम इमारतीमधील आरडाओरडा मख्ख चेहर्‍याने बघणारे न्यायाधीश वगैरे प्रकार इथे नाहीत. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या भूमिकेत किशोर कदम आणि कृत्तिका देसाई यांनी जान भरली आहे. चित्रपटात हिंदी मराठी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांचा वापर आहे. न्यायालयातल्या प्रसंगात कायद्यातील तरतुदी आणि त्यातील शब्दांवर कसा खेळ केला जातो. याचे उत्तम चित्रण आहे. ‘मी टू’च्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट महत्त्वपूर्ण आहेच पण यानिमित्ताने पुन्हा एकदा विस्तृृत पातळीवर चर्चा होणे आवश्यक आहे.


चित्रपटसृष्टीसकट सर्व क्षेत्रांत बढतीसाठी काम मिळण्यासाठी महिला सहकार्‍याकडे किंवा पुरुष सहकार्‍याकडेही लैंगिक सुखाची मागणी करणे हा चिंतनाचा काळजीचा विषय आहे. हे वर्षानुवर्षापासून सुरू असून अमेरिकेत हावॅ विनस्टीन विरोधात सुरू झालेल्या ‘मी टू चळवळीनंतर भारतात देखील महिला पुढे येऊ लागल्या. महिला आपल्यावरील अत्याचाराच्या विरोधात बोलू लागल्या. कायदेशीर कारवाई करू लागल्या. त्यावर त्यांनी त्याचवेळी  तक्रार का केली नाही. ते महिला उघडपणे बोलू शकत आहेत. हे धाडसाचे कौतुकाचे आहे. सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. महिलांनी अनेक मोठमोठ्या व्यक्तींविरोधात तक्रारी दाखल केल्या. त्यात माजी केंद्रीय राज्यमंत्रांचा देखील समावेश आहे. याच प्रश्नांच्या संदर्भात आरोप असणार्‍या पुरुषांकडून तसेच काही महिलांकडून असा युक्तिवाद केला गेला की जोपर्यंत या महिलांना फायदे मिळत होते तोवर त्यांनी काहीही तक्रार केली नाही. आता कुठलाही फायदा मिळत नाही. ‘मी टू’ चळवळीची हवा आहे तर केवळ सुडासाठी त्यांनी तक्रार दाखल केल्या. तसेच खोट्या तक्रारी दाखल करून पैसे उकळल्याची  प्रकरणेही उजेडात आली. अशा दोन परस्परविरोधी भूमिका आल्यामुळेच काद्यातील तरतुदी  आणि वापरण्यात आलेले शब्द महत्त्वाचे ठरतात. दोन व्यक्तींमधील शारीरिक संबंध केवळ संमती (consent) आहे म्हणून योग्य ठरत नाहीत. तर इच्छा (will) देखील असावी लागते. महिलेची इच्छा (will) आणि संमती (Consent) असेल तरच तो शारीरिक संबंध बलात्कार मानता येणार नाही व कलम 375 मध्ये इच्छा हा शब्द संमतीच्या आधी येतो.
हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे. शब्दच्छल, चर्चा करावी तेवढी कमी आहे. मोठ्या प्रमाणात बाहेर आलेल्या सुडापोटी पैसे उकळण्यासाठी  करण्यात आलेल्या खोट्या तक्रारींमुळे खर्‍याखुर्‍या भीषण बलात्काराच्या प्रकरणांत देखील पोलीस यंत्रणा, माध्यमे आणि जनतादेखील संशयाने बघायला लागेल. कायदा महिलांच्या बाजूने आहे. असायलाच हवा आहे. पण त्या कायद्याच्या सुडापोटी होणारा गैरवापर टाळण्यासाठी कडक तरतुदी तितक्याच आवश्यक आहेत. अधिक प्रगल्भ, सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी सर्व उपलब्ध साधनांनिशी जनजागृती, चळवळ आवश्यक आहे. त्यादृष्टीने एक पाऊल म्हणून अशा चित्रपटांच्या निमित्ताने चर्चा व्हावी ती कायद्यांची सेक्शन 375  मर्जी या जबरदस्ती.

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...