Saturday, 8 September 2012

                               माधवराव बल्लाळ पंतप्रधान 

                    १४ जानेवारी, १७६१ चा पानिपतावरचा पराभव, उत्तरेत माजलेली अंदाधुंदी, दक्षिणेत पुन्हा प्रबळ झालेले निजाम आणि हैदर, बंगाल मधून वाढत असलेला ब्रिटीशांचा प्रभाव या सर्वांवर खंबीरपणे मत करून मराठी साम्राज्याचं सामर्थ्य वाढवलं ते नानासाहेब पेशव्यांचे द्वितीय चिरंजीव माधवराव यांनी . एकवेळ शून्यातून साम्राज्य उभारणं सोपं वाटेल, पण जम बसलेली, बलाढ्य झालेली राज्यसत्ता पानिपातासारख्या आघातानंतर पुन्हा वैभवशाली करणं हे काही सोपं नाही .
                   पानिपतचा आघात, सदाशिवरावभाऊ, विश्वासराव आणि कित्येक सरदार आणि त्यांच्या सैन्याचा मृत्यू झालेला . सदाशिवरावभाऊच्या आणि एकूणच पानिपातामुळे निराशेच्या गर्तेत झालेला नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू यामुळे अवघ्या सोळाव्या वर्षी माधावारावांवर पेश्वेपदाची जबाबदारी आली . शिस्त ,न्यायानिष्ठुरता, राजकारणच प्रगाढ ज्ञान यांच्या जोरावर अवघ्या ११ वर्षात मराठी साम्राज्य माधवरावांनी पुनर्वैभवाला पोचवलं . राघोबा दादा, भोसले, गायकवाड इ अप्त्साकीय आणि सरदारांचा विरोध  मोडून काढला . हैदरवर वेळोवेळी स्वार्या करून त्याला जवळजवळ आश्रित बनवलं,   राक्षसभूवानाच्या लढाईत निजामाला पराभूत केलं . राक्षसभूवनची लढाई  माधवरावांच्या उत्कृष्ट युद्धडावपेच ज्ञानाची पहिली झलकच होती .निजामाला उपकरात ठेवून त्याच्याशी स्नेह जोडला .
             बंगालमध्ये प्रबळ झालेल्या ब्रिटीशाना माधवराव आणि नंतर नाना फडणीस असेपर्यंत मराठी साम्राज्यात राजकीय हस्तक्षेप करण्याची संधीदेखील मिळाली नाही .  माधवराव, शिवाजी, संभाजी, नाना फडणीस यांच्या परराष्ट्र नीतीचं कौतुक ब्रिटीश आणि पोर्तुगीज इथास्कर खुल्यादिलाने करतात .          
            . होळकर- शिंद्यांनी उत्तरेतलं रोहिल्यांचं बंद मोडून काढून नजीबच्या थडग्याची वासलात लावली . उत्तरेतली परिस्थिती सावरली . रामशास्त्री प्रभूण्यांसारखे न्यायाधीश, नाना फडनिसंसारखे कारभारी आणि मुत्सद्दी, तुकोजी होळकर,  महादजी शिंदे इ व्यक्तिमत्व पुढे आणण्यात माधवरावांचा सिंहाचा वाट आहे . अशा कर्तबगार, मुत्सद्दी आणि चतुर पेशव्याचा घरातील अंतर्गत कलह  आणि राज्याक्ष्मासारख्या रोगाने घात केला . ब्रिटीश इतिहासकार ग्रांट डफ्फ म्हणतो .......

                                      "या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे 

                                      मराठी साम्राज्याच्या जिव्हारी लागलेला 

                                      त्यापुढे पानिपतचा आघात काहीच नव्हे ."


                    ( ११ वीत असताना काढलेले हे चित्र, खूप लोकांनी आवडल्याचे सांगितले. आणि मग असे चित्र काढत राहण्याचा ध्यास लागला. म्हणूनच की काय माझी चित्रकला त्यातच अडकून पडली आहे…. )

Friday, 7 September 2012

१५ ऑगस्ट : स्वातंत्र्यदिन .

  

१५ ऑगस्ट! हिंदुस्थानासाठी एक अभिमानास्पद त्याचप्रमाणे दुःखद दिवस . इंग्रजांचं जुलमी शासन संपलं पण अखंड हिंदुस्थानाची दोन शकलं झाली. हिंदू-मुस्लीम दंगे झाले . दहा लाखांपेक्षा जास्त लोक मारले गेले, लाखो लोक निर्वासित झाले . राजकीय पुढार्यांचे त्या काळातले निर्णय आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा करण्याची इच्छा नाही . स्वातंत्र्यप्राप्तीच ६५वं वर्ष सुरु होत असताना हिंदुस्थान १९४७ च्या परिस्थितीपेक्षा वेगळा  का? या काळात जगात 'सामर्थ्य' दाखवू शकेन अशा गोष्टी हिंदुस्थानाकडून झाल्या का? आर्थिक- सामाजिक-सांस्कृतिक भरभराट झाली का? राजकारण आणि राजकारणी यांची स्थिती काय आहे? या आणि अशा प्रश्नांचा मागोवा  प्रयत्न घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. 

१९५२ साली पहिली सर्वात्रिक निवडणूक झाली आणि नेहरुंच मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. नियोजन आयोगाची स्थापना झालीच होती, पहिली पंचवार्षिक योजनादेखील लागू झाली होती. उद्योग क्षेत्र एका मर्यादित सामाजगटापुरतच सीमित होतं . मिश्र अर्थव्यवस्था जरी स्वीकारली असली तरी बहुतेक उद्योग हे सार्वजनिक क्षेत्रात होते . सरकारी अधिकारी म्हणजेच IAS , IRS अधिकारी या उद्योगांच्या प्रधानपदी होते . उद्योग चालवण्यासाठी लोक-प्रशासक नाही तर Professional Managers लागतात. सार्वजनिक क्षेत्रात इतर उणीवा देखील होत्या. खाजगी क्षेत्रात नावाजलेले उद्योजक या क्षेत्रात येऊ दिले जात नसत. या परीस्थित उद्योगांची वाढ कशी झाली असती? जागतिक दर्जाचे उद्योग कशे उभे राहिले असते? 

लायसन्स- परमीटचं राज्य असताना, आयातीवर निर्बंध असताना उद्योगांची वाढ कशी झाली असती? नवनवीन तंत्रज्ञान भारतात कसा आला असतं ? आयात बंदी असताना काळाबाजार फोफावला नसता तरच नवल. टाटा, बिर्ला आणि तत्सम लोक हे खाजगी क्षेत्रातले मक्तेदार होते . संपूर्ण उद्योगविश्व ह्यालोकांच्या आणि सार्वजनिक क्षेत्राच्या हातात होते . नव्या उद्योगांना, नव्या कल्पनांना येण्यास मज्जाव म्हणण्यापेक्षा कडक निर्बंध होते . लायसन्स- परमीट  साठी द्यावी लागणारी लाचलुचपत . (जी आजही वेगळ्या पद्धतीनं सुरु आहे, आणि त्यांचे आकडे प्रचंड मोठे आहेत.)   १९९१ पूर्वी लायसन्सच्या राज्यात अस्गाला आनंदीआनंद होता पण उदारीकरणानंतर हि राजकीय पुढारयांनी  महाप्रचंड घोटाळे केले.  बोफोर्स पासून ते आताच्या कोळसा घोटाळ्यापर्यंत .                 

प्रत्येक राष्ट्र हे फक्त उत्तुंग आदर्शवादावर नाही तर वस्तुनिष्ठ विकासात्मक प्रक्रियांवर विकास करत असतं.

संरक्षणात्मक दृष्टीनं पाहण्यास गेलो तर बलाढ्य सैन्य हि राष्ट्राची खरी टाकत असते . सरंक्षणसज्जता हे प्रत्येक राष्ट्राचं भूषण असतं . जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, जपान दुसर्या महायुद्धात जमीन-पाणी आणि हवेत युद्ध लढत होते . अत्याधुनिक शस्त्रास्त्र, शारीरिकदृष्ट्या समर्थ लष्कर त्यांच्याकडे होतं . स्वातंत्र्यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या 'आझाद हिंद फोजेवर' टीका करणारं कोन्ग्रेस जेव्हा काश्मीरवर हल्ला झाला तेव्हा ह्याच सेनेच्या आश्रयाला गेलं . सुभाषचंद्र बोसांची शिस्त, लढाउपणा काश्मीर विजयाला कारणीभूत ठरला (१९४८). 

लष्कराकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष, पंतप्रनांचीची स्वप्नाळू गाफिलता यांचा अपमानस्पद परिणाम चीन आक्रमणावेळी दिसून आला (१९६२). १९६५ पासून मात्र हिंदुस्थानी सैन्य प्रत्येक युद्ध जिंकत आलेलं आहे . 'पाकिस्तानी रणगाड्यांचं कब्रस्थान 'राजस्थान' (१९६५). आरमाराचा उत्तुंग पराक्रम, थेट काराचीवारच केलेलं  आक्रमण (१९७१) आणि कारगिल . आज संख्याबळाच्या दृष्टीनं दुसर्या क्रमांकाचं आणि अत्याधुनिक सैन्य हे भारताचं खराखुरं सामर्थ्य आहे.  

आज जगातील सर्वात तरुण देश म्हणून हिंदुस्थान जगात ओळखला जातो. जगात सर्वात जास्त इंग्रजी भाषा बोलणार्या लोकांचा देश हिंदुस्थान आहे . आज महासत्ता होण्याची स्वप्ना पाहणारा आणि त्या सत्यात उतरवण्याची क्षमता राखणारा देश हिंदुस्थान आहे . १९९१ नंतर अवघ्या २१ वर्षात हि प्रगती करणारा देश हिंदुस्थान आहे.

पण त्याच वेळेला बेसुमार भष्ट्राचार होणारा आणि केंद्रीय मंत्रीमंडळातले जबाबदार मंत्रीच घोटाळ्यांच्या रकमांचे विक्रम एकामागून मोडीत काढत आहेत . आसाम मध्ये परदेशातले घुसखोर दंगे माजवत आहेत . राजकीय फक्त भेटी देण्यापलीकडे काहीही करत नाहीत . मुंबईत महिला पोलिसांवर मोर्चाच्या वेळी काय प्रसंग आला हे पाहूनही राजकीय पुढारी काय करत आहेत? देशातली २० टक्के जनता आजही दारिद्र्यरेषेखाली जगते आहे . ग्रामीण भागात आजही शिक्षणाच्या सोयी नाहीत . आरोग्याच्या सेवा घेण्यासाठी कित्येक किलोमीटर दूर जावं लागत आहे . खाजगी आरोग्य सेवा परवडत नाहीत . 

देशात असलेली तरुणांची शक्ती जर योग्य ठिकाणी वापरली, तरुणांना योग्य संधी दिली तर तरुण काय करू शकणार नाहीत? हिंदुस्थान महासत्ता होण्यासाठी २०२० ची वाट पाहतो आहे न, तरुण ते २१७ लाच करून दाखवतील, फक्त योग्य राजकारणातील, प्रशासनातील, आर्थिक क्षेत्रातील संधी उपलब्ध  द्या . आजचा तरुण फक्त पायाभूत सुविधा आणि योग्य संधीची वाट पाहतो आहे ती द्या आणि मग पहा हिंदुस्थान जगातली महासत्ता म्हणून पुढे येईल.          

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अशा वल्गना करायच्या आणि पुन्हा पहिले पाध्ये पंचावन्न अशीच परिस्थिती दरवर्षी येते . पण हि परिस्थिती बदलण्याची क्षमता आणि सामर्थ्य आपणा तरुणांकडेच आहे , कमी आहे फक्त  इच्छाशक्तीची.

Artha and the Civilisation: What Really Drives the Indian Economy

  Any system rests on two principal components. One is the driving force behind the system's construction, and the other is the guiding ...