Skip to main content

                               माधवराव बल्लाळ पंतप्रधान 

                    १४ जानेवारी, १७६१ चा पानिपतावरचा पराभव, उत्तरेत माजलेली अंदाधुंदी, दक्षिणेत पुन्हा प्रबळ झालेले निजाम आणि हैदर, बंगाल मधून वाढत असलेला ब्रिटीशांचा प्रभाव या सर्वांवर खंबीरपणे मत करून मराठी साम्राज्याचं सामर्थ्य वाढवलं ते नानासाहेब पेशव्यांचे द्वितीय चिरंजीव माधवराव यांनी . एकवेळ शून्यातून साम्राज्य उभारणं सोपं वाटेल, पण जम बसलेली, बलाढ्य झालेली राज्यसत्ता पानिपातासारख्या आघातानंतर पुन्हा वैभवशाली करणं हे काही सोपं नाही .
                   पानिपतचा आघात, सदाशिवरावभाऊ, विश्वासराव आणि कित्येक सरदार आणि त्यांच्या सैन्याचा मृत्यू झालेला . सदाशिवरावभाऊच्या आणि एकूणच पानिपातामुळे निराशेच्या गर्तेत झालेला नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू यामुळे अवघ्या सोळाव्या वर्षी माधावारावांवर पेश्वेपदाची जबाबदारी आली . शिस्त ,न्यायानिष्ठुरता, राजकारणच प्रगाढ ज्ञान यांच्या जोरावर अवघ्या ११ वर्षात मराठी साम्राज्य माधवरावांनी पुनर्वैभवाला पोचवलं . राघोबा दादा, भोसले, गायकवाड इ अप्त्साकीय आणि सरदारांचा विरोध  मोडून काढला . हैदरवर वेळोवेळी स्वार्या करून त्याला जवळजवळ आश्रित बनवलं,   राक्षसभूवानाच्या लढाईत निजामाला पराभूत केलं . राक्षसभूवनची लढाई  माधवरावांच्या उत्कृष्ट युद्धडावपेच ज्ञानाची पहिली झलकच होती .निजामाला उपकरात ठेवून त्याच्याशी स्नेह जोडला .
             बंगालमध्ये प्रबळ झालेल्या ब्रिटीशाना माधवराव आणि नंतर नाना फडणीस असेपर्यंत मराठी साम्राज्यात राजकीय हस्तक्षेप करण्याची संधीदेखील मिळाली नाही .  माधवराव, शिवाजी, संभाजी, नाना फडणीस यांच्या परराष्ट्र नीतीचं कौतुक ब्रिटीश आणि पोर्तुगीज इथास्कर खुल्यादिलाने करतात .          
            . होळकर- शिंद्यांनी उत्तरेतलं रोहिल्यांचं बंद मोडून काढून नजीबच्या थडग्याची वासलात लावली . उत्तरेतली परिस्थिती सावरली . रामशास्त्री प्रभूण्यांसारखे न्यायाधीश, नाना फडनिसंसारखे कारभारी आणि मुत्सद्दी, तुकोजी होळकर,  महादजी शिंदे इ व्यक्तिमत्व पुढे आणण्यात माधवरावांचा सिंहाचा वाट आहे . अशा कर्तबगार, मुत्सद्दी आणि चतुर पेशव्याचा घरातील अंतर्गत कलह  आणि राज्याक्ष्मासारख्या रोगाने घात केला . ब्रिटीश इतिहासकार ग्रांट डफ्फ म्हणतो .......

                                      "या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे 

                                      मराठी साम्राज्याच्या जिव्हारी लागलेला 

                                      त्यापुढे पानिपतचा आघात काहीच नव्हे ."


                    ( ११ वीत असताना काढलेले हे चित्र, खूप लोकांनी आवडल्याचे सांगितले. आणि मग असे चित्र काढत राहण्याचा ध्यास लागला. म्हणूनच की काय माझी चित्रकला त्यातच अडकून पडली आहे…. )

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...