Skip to main content

१५ ऑगस्ट : स्वातंत्र्यदिन .

                                

                         १५ ऑगस्ट! हिंदुस्थानासाठी एक अभिमानास्पद त्याचप्रमाणे दुःखद दिवस . इंग्रजांचं जुलमी शासन संपलं पण अखंड हिंदुस्थानाची दोन शकलं झाली . हिंदू-मुस्लीम दंगे झाले . दहा लाखांपेक्षा जास्त लोक मारले गेले, लाखो लोक निर्वासित झाले . राजकीय पुढार्यांचे त्या काळातले निर्णय आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा करण्याची इच्छा नाही . स्वातंत्र्यप्राप्तीच ६५वं वर्ष सुरु होत असताना हिंदुस्थान १९४७ च्या परिस्थितीपेक्षा वेगळा  का? या काळात जगात 'सामर्थ्य' दाखवू शकेन अशा गोष्टी हिंदुस्थानाकडून झाल्या का? आर्थिक- सामाजिक-सांस्कृतिक भरभराट झाली का? राजकारण आणि राजकारणी यांची स्थिती काय आहे? या आणि अशा प्रश्नांचा मागोवा  प्रयत्न घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे . 
               १९५२ साली पहिली सर्वात्रिक निवडणूक झाली आणि नेहरुंच मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं . नियोजन आयोगाची स्थापना झालीच होती, पहिली पंचवार्षिक योजनादेखील लागू झाली होती . उद्योग क्षेत्र एका मर्यादित सामाजगटापुरतच सीमित होतं . मिश्र अर्थव्यवस्था जरी स्वीकारली असली तरी बहुतेक उद्योग हे सार्वजनिक क्षेत्रात होते . सरकारी अधिकारी म्हणजेच IAS , IRS अधिकारी या उद्योगांच्या प्रधानपदी होते . उद्योग चालवण्यासाठी लोक-प्रशासक नाही तर Professional Managers लागतात . सार्वजनिक क्षेत्रात इतर उणीवा देखील होत्या . खाजगी क्षेत्रात नावाजलेले उद्योजक या क्षेत्रात येऊ दिले जात नसत . या परीस्थित उद्योगांची वाढ कशी झाली असती? जागतिक दर्जाचे उद्योग कशे उभे राहिले असते? लायसन्स- परमीटचं राज्य असताना, आयातीवर निर्बंध असताना उद्योगांची वाढ कशी झाली असती? नवनवीन तंत्रज्ञान भारतात कसा आला असतं ? आयात बंदी असताना काळाबाजार फोफावला नसता तरच नवल . टाटा, बिर्ला आणि तत्सम लोक हे खाजगी क्षेत्रातले मक्तेदार होते . संपूर्ण उद्योगविश्व ह्यालोकांच्या आणि सार्वजनिक क्षेत्राच्या हातात होते . नव्या उद्योगांना, नव्या कल्पनांना येण्यास मज्जाव म्हणण्यापेक्षा कडक निर्बंध होते . लायसन्स- परमीट  साठी द्यावी लागणारी लाचलुचपत . (जी आजही वेगळ्या पद्धतीनं सुरु आहे, आणि त्यांचे आकडे प्रचंड मोठे आहेत . )   १९९१ पूर्वी लायसन्सच्या राज्यात अस्गाला आनंदीआनंद होता पण उदारीकरणानंतर हि राजकीय पुढारयांनी  महाप्रचंड घोटाळे केले .  बोफोर्स पासून ते आताच्या कोळसा घोटाळ्यापर्यंत . 
                प्रत्येक राष्ट्र हे फक्त उत्तुंग आदर्श्वडावर नाही तर वस्तुनिष्ठ विकासात्मक प्रक्रियांवर विकास पावत . संरक्षणात्मक दृष्टीनं पाहण्यास गेलो तर बलाढ्य सैन्य हि राष्ट्राची खरी टाकत असते . सरंक्षणसज्जता हे प्रत्येक राष्ट्राचं भूषण असतं . जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, जपान दुसर्या महायुद्धात जमीन-पाणी आणि हवेत युद्ध लढत होते . अत्याधुनिक शस्त्रास्त्र, शारीरिकदृष्ट्या असमर्थ लष्कर त्यांच्याकडे होतं . स्वातंत्र्यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या 'आझाद हिंद फोजेवर' टीका करणारं कोन्ग्रेस जेव्हा काश्मीरवर हल्ला झाला तेव्हा ह्याच सेनेच्या आश्रयाला गेलं . सुभाषचंद्र बोसांची शिस्त, लढाउपणा काश्मीर विजयाला कारणीभूत ठरला (१९४८). लष्कराकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष, पंतप्रनांचीची स्वप्नाळू गाफिलता यांचा अपमानस्पद परिणाम चीन अकरामानावेली दिसून आला (१९६२). १९६५ पासून मात्र हिंदुस्थानी सैन्य प्रत्येक युद्ध जिंकत आलेलं आहे . 'पाकिस्तानी रणगाड्यांचं कब्रस्थान 'राजस्थान' (१९६५). आरमाराचा उत्तुंग पराक्रम, थेट काराचीवारच केलेलं  आक्रमण (१९७१) आणि कारगिल . आज संख्याबळाच्या दृष्टीनं दुसर्या क्रमांकाचं आणि अत्याधुनिक सैन्य हे भारताचं खराखुरं सामर्थ्य आहे . 
               आज जगातील सर्वात तरुण देश म्हणून हिंदुस्थान जगात ओळखला जातो . जगात सर्वात जास्त इंग्रजी भाषा बोलणार्या लोकांचा देश हिंदुस्थान आहे . आज महासत्ता होण्याची स्वप्ना पाहणारा आणि त्या सत्यात उतरवण्याची क्षमता राखणारा देश हिंदुस्थान आहे . १९९१ नंतर अवघ्या २१ वर्षात हि प्रगती करणारा देश हिंदुस्थान आहे . पण त्याच वेळेला बेसुमार भष्ट्राचार होणारा आणि केंद्रीय मंत्रीमंडळातले जबाबदार मंत्रीच घोटाळ्यांच्या रकमांचे विक्रम एकामागून मोडीत काढत आहेत . आसाम मध्ये परदेशातले घुसखोर दंगे माजवत आहेत . राजकीय फक्त भेटी देण्यापलीकडे काहीही करत नाहीत . मुंबईत महिला पोलिसांवर मोर्चाच्या वेळी काय प्रसंग आला हे पाहूनही राजकीय पुढारी काय करत आहेत? देशातली २० टक्के जनता आजही दारिद्र्यरेषेखाली जगते आहे . ग्रामीण भागात आजही शिक्षणाच्या सोयी नाहीत . आरोग्याच्या सेवा घेण्यासाठी कित्येक किलोमीटर दूर जावं लागत आहे . खाजगी आरोग्य सेवा परवडत नाहीत . देशात असलेली तरुणांची शक्ती जर योग्य ठिकाणी वापरली, तरुणांना योग्य संधी दिली तर तरुण काय करू शकणार नाहीत? हिंदुस्थान महासत्ता होण्यासाठी २०२० ची वाट पाहतो आहे न, तरुण ते २१७ लाच करून दाखवतील, फक्त योग्य राजकारणातील, प्रशासनातील, आर्थिक क्षेत्रातील संधी उपलब्ध  द्या . आजचा तरुण फक्त पायाभूत सुविधा आणि योग्य संधीची वाट पाहतो आहे ती द्या आणि मग पहा हिंदुस्थान जगातली महासत्ता म्हणून पुढे येईल . 
         स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अशा वल्गना करायच्या आणि पुन्हा पहिले पाध्ये पंचावन्न अशीच परिस्थिती दरवर्षी येते . पण हि परिस्थिती बदलण्याची क्षमता आणि सामर्थ्य आपणा तरुणांकडेच आहे , कमी आहे फक्त  इच्छाशक्तीची .

Comments

  1. Hey Shaunak, that is an impressive writeup. You don't mince words. It is crisp and precise. No wastage just like what finance people prefer!

    ReplyDelete
  2. Sahi re...
    Good read.. I am surprised to see your analysis right from Neharuvian era to this 21st century. You even didn't miss world economy - politics links..
    Well done.. Keep writing.. Love to read them...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विश्वास कसा ठेवावा?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी. ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. “आमचा मुलगा निष्पाप आहे.” “सरकार खोटे आरोप करते.” ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो,  विश्वास कसा ठेवावा? मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले.  पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या  शंभरपैकी नव्व्याण्णव  यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी.  २०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली प...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...