Skip to main content

Posts

Showing posts with the label कलाक्षेत्रम

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

भारतीय राष्ट्र: परंपरेच्या दृष्टीकोनातून घेतलेला वेध: विषय प्रवेश

वक्ता दशसहस्त्रेषु प्रा. राम शेवाळकर यांनी त्यांच्या योगेश्वर श्रीकृष्णावरील व्याख्यानात 'परंपरा' ही संकल्पना मांडली आहे. ती पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये, सामाजिक चालीरीती या अर्थी नाही. भारतीय राष्ट्राचा सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक गाभा या व्यापक अर्थाने ती संकल्पना त्यांनी मांडली आहे. श्रीकृष्ण उलगडण्याचा दृष्टीने त्यांनी तिचा थोडक्यात विस्तार केला आहे. तोच धागा पकडून भारतीय राष्ट्राचा परंपरेच्या दृष्टिकोनातून वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे...  भारतीय राष्ट्र.... उच्चारल्याबरोबर माझ्या तरी डोळ्यासमोर येते ते विष्णू पुराणातील भारतीय भूमीचे आणि भारतीयाचे वर्णन,  उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम। वर्षं तद भारत नाम भारती यत्र संतति:।। समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेला असलेल्या भूमीला भारत म्हणतात आणि तिथे राहणारे ते भारतीय.  ही झाली भौगोलिक व्याख्या. पण भारतीय राष्ट्र केवळ या भूगोलापलीकडे आहे. सिंधू-सरस्वती-वेद काळापासून चालत आलेला तो सांस्कृतिक प्रवाह आहे.  राज्यकर्ते आले गेले. राजकीय व्यवस्था बदलत राहिल्या. बदलला नाही तो संस्कृतीचा गाभा. एकम सत विप्रा ...

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

Shivraj Ashtak: Digpal Lanjekar

A Perfect Blend of  Adhering to Historical Facts and Creative Liberty  Chhatrapati Shivaji Maharaj is a scared, revered figure for the Maharashtrians, Indians. He is not any other king who found his kingdom by defecting a weak existing king. He is revered because his ideals, his actions, his vision changed the course of history. India, especially Hindus in India owe their existence today to Shivaji Maharaj. Maharaj always iterated that establishment of Hindavi Swarajya is will of Shri (Ishwar), I am the marshal of that will. Many historians have written biographies, historical accounts on Maharaj. Some of the most authentic historians are Gajanan Bhaskar Mehendale, Va. Si. Bendre, Jadunath Sarkar, Vi. Ka. Rajwade, T. S. Shejwalkar and many more. There are great scholars like Narhar Kurundkar who have put brilliant analysis on life and times of Shivaji Maharaj at various platforms. I would like to quote what Narhar Kurundkar has stated about Maharaj, and will go to the topic,...

How poets personified Shivaji Maharaj

  साजि चतुरंग सैन अंग में उमंग धरी  सरजा शिवाजी जंग जीतन चलत हैं  भूषण भनत नाद बिहद नगारन के  नदी-नद मद गैबरन के रलत हैं  ऐल-फैल खैल-भैल खलक में गैल गैल  गजन की ठैल-पैल सैल उसलत हैं  तारा सों तरनि धूरि-धारा में लगत जिमि  थारा पर पारा पारावार यों हलत हैं  This is how Kavi Bhooshan describes how Chhatrapati Shivaji Maharaj looks like when he begins his march for a war. He says, the sounds of kettle-drums are deafening and the young bull-elephants are secreting so much that, there are rivers of them flowing. The elephants are spreading such commotion that there is chaos and disorder in the paths of enemy, where this treads. So thunderous is there movement that the hills along are being uprooted. The feet and the hooves of this army raise so much dust that it covers the sky and the shining sun is reduced to but like a twinkling star. As the massive army marches through, the earth trembles like mercury on a wobbling plate. (Translation by Atul Sab...

अखेरचा हा तुला दंडवत

स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे.. शांता शेळकेंच्या शब्दांना स्वरसाज चढवणारी व्यक्ती ही त्यातल्या 'मराठी पाऊल पडते पुढे' चे मूर्तिमंत उदाहरण. यात काहीही अतिशयोक्ती ठरणार नाही. आठ दशकांहून अधिक काळ हिंदी, मराठी सोबत भारतातील जवळ जवळ सर्व भाषांतील हजारांच्या घरातील गाणी, मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन, अशी त्यांची देदीप्यमान कारकीर्द. ते मराठी पाऊल अवघे जग व्यापून दशांगुळे उरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे लता मंगेशकर. सर्वांच्या लाडक्या लता दीदी. त्यांच्या अचाट, अफाट कामगिरीचा यथोचित गौरव झाला. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न, चित्रपट जगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके सन्मान आणि अगणित सन्मान त्यांना मिळाले. कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण प्रत्येक पिढीला त्या 'आपल्या' वाटत आलेल्या आहेत. हे आपलेपण, हा जिव्हाळा, हे प्रेम, एखाद्याच्याच वाट्याला येते. ते आयुष्याचे संचित गाठण्यासाठी कुठली तपश्चर्या करावी लागत नाही. आपण निवडलेले क्षेत्र, त्यातली उत्तमता, उत्कृष्टता हीच तपश्चर्या होते.  मुली औक्...

कुमार गंधर्व

  कुमारच्या चेहऱ्यावर आजाराचे कुठलेच लक्षण नव्हते. पाच वर्षापूर्वीच्याच कानांना 'आता अवधारिजो जी' असे जरासे बजावून सांगणारा तोच, तसाच षड्ज लागला आणि त्यापूर्वी कोणीही न ऐकलेल्या एका रागातल्या चिजेचा अद्भुत मुखडा कानी पडला, "मारुजी भूलो ना म्हाने". अस्ताई म्हटल्यावर पुन्हा चिजेच्या तोंडाकडे येताना मारुजीमधल्या 'जी'वर कुमार कोमल रिषभावर दोनच सेकंद असेल पण अशा ताकदीने ठेहरला की त्या कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला. त्या रिषभाची जखम आजही माझ्या मनात ओलीच आहे. कुमारने मग त्या रागाचे नाव सांगितले, 'सोहनीभटियार' आणि म्हणाला, "गेल्या काही वर्षात असे काही नवे राग आणि नव्या चिजा झाल्या आहेत." पु.ल. नावाच्या शब्दप्रभूने 'मंगल दिन आज' या गुण गाईन आवडी मधील व्यक्तिचित्रात पंडित कुमार गंधर्व या संगीतातील अलौकिक चमत्काराचे असे वर्णन केले आहे.  पुल ज्याप्रमाणे त्या नव्या रागातील कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला असे वर्णन करतात, तो कोमल रिषभ लागला, म्हणजे काय झालं हे नीट सविस्तर समजावून सांगितल्याशिवाय काही मला कळणार नाही. पण एक ग...

सवाई एकांकीकोत्सव

सवाई एकांकीकोत्सव  महाराष्ट्रातील नाट्य क्षेत्रात एकांकिका स्पर्धांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातही पुणे, मुंबईत आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा या नाट्य-चित्रपट सृष्टीसाठी कलाकारांची, तंत्रज्ञांची खाण ठरतात. ही कलाकारांची खाण आता मुंबई-पुण्याच्या पट्ट्याबाहेर वाढू लागली आहे. राज्य नाट्य स्पर्धा, अहमदनगर महाकरंडक, कोकणात पेण, बार्शी, औरंगाबाद, मध्यंतरीच्या काळात सकाळ करंडक आणि आता लोकसत्ता लोकांकिका ही विविध व्यासपीठे उपलब्ध आहेत. पण या सर्व चुरशीच्या स्पर्धा प्राथमिक ठराव्यात अशी एकांकिका स्पर्धा आहे ती 'चतुरंग सवाई' एकांकिका स्पर्धा. या स्पर्धेचे स्वरूपच आहे ते 'उत्तमातील सर्वोत्तम निवडण्याची स्पर्धा' असे. राज्यभरातील विविध एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सर्वोत्तम प्रायोगिक एकांकिका साठी असणारा 'जयराम हर्डीकर करंडक' विजेती एकांकिका इत्यादी संघाना सवाई एकांकिका स्पर्धेत प्रवेश मिळतो. त्यानुसार चालू वर्षात सवाई एकांकिका स्पर्धेत राज्यभरातील उत्तम अशा एकांकिका त्यातील सात 'सवाई' च्या अंतिम फेरीत होत्या...

१९१७: उलटणारा वेळ हाच कसा वैरी होतो याची कथा

१९१७ महायुद्धाची भीषणता आणि उलटणारा  वेळ हाच कसा वैरी होतो याची कथा              दोन महायुद्ध. जगाच्या राजकारणाचे, समाजकारणाचे, अर्थकारणाचे पाट बदलणारे. पहिल्या महायुद्धाची कारणे शोधू तितकी कमी इतकी त्यात गुंतागुंत आहे. त्याच्या कारणांचा  वेध घेत गेलो तर युरोपच्या राजकारणात किमान १०० वर्षे मागे जावे लागते. जर्मनी, इटलीचे एकीकरण, वसाहतवादी स्पर्धा, बिस्मार्कचे राजकारण, महत्वाकांक्षा यातली प्रचंड गुंतागुंत ते सर्बियाचा राजपुत्र फ्रान्झ फर्डिनांडची हत्या हे तात्कालिक कारण असा मोठा पट त्यात आहे. जितका मोठा पट युद्धामागील कारणांचा आहे तितकाच मोठा पट प्रत्यक्ष युद्धाचा आहे. किंबहुना खूप कमी कालमर्यादेत प्रचंड उलथापालथ महायुद्ध काळात झाली आहे. पहिल्या महायुद्धा मागील कारणांची पार्श्वभूमी मोठी असली तरी दुसऱ्या महायुद्धामागे इतर कशाहीपेक्षा पहिले महायुद्ध हेच एक मोठे कारण होते. जगाचे पाट बदलणाऱ्या या घटनाक्रमांनी हॉलीवूडला अचाट, सुंदर युद्धपट करण्यासाठी हजारोंच्या संख्येत विषय आयते तयार करून ठेवले आहेत. त्यात चार्ली चॅप्...

Panipat: The Great Betrayal

पानिपत  इ. स. १५२६, १५५६ आणि १७६१ हि वर्ष मध्ययुगीन भारताचा इतिहास मुळातूनच बदलण्यास कारणीभूत ठरली. इतिहासाचे सर्व संदर्भ, इतिहासाची गणितंच बदलली या वर्षी. समरकंदचा निर्वासित सुलतान बाबर इब्राहीम लोदीचा पराभव करून मोंगल राजवंशाची स्थापना १५२६ या वर्षी करतो. मोंगल वंशाचा निर्वासित वंशज अकबर, बैराम खानच्या मदतीनं हेमूचा पराभव करून मोंगल राज्याची पुनर्स्थापना १५५६ या वर्षी करतो. हिंदुस्थानच्या रक्षणार्थ लाखभर मराठी लष्कर परकीय घुसखोर अहमदशहा अब्दालीविरुद्ध १७६१ साली जीवघेणा लढा देतात. या तिन्ही इतिहास बदलणाऱ्या लढाया झाल्या त्या पानिपतच्या परिसरात. पानिपतच्या त्या भूमीचं महत्व काही ओउरच आहे. दोन राजघराण्यांची स्थापना आणि ते राज्य वाचवण्यासाठी घनघोर लढाया झाल्या त्या याच भूमीवर. Alexander पासून अब्दालीपर्यंत हिंदुस्थानवर आक्रमणं व्हायची ती खैबरखिंड, पानिपत याच मार्गानं. अफगाणीस्तनातून, पंजाब मार्गे दिल्लीकडे सरकणारा हा मार्ग अनादिकालापासून  रुधिरासाठी चटावलेला आहे. महाभारतातल महायुद्ध घडलेली ती कुरुक्षेत्राची भूमी तिथून जवळच आहे. पानिपतच तिसरा युद्ध अफगाण घुसखोर अहमद...

फर्जंद ते फत्तेशिकस्त

फर्जंद ते फत्तेशिकस्त  शिवाजी, भारताच्या इतिहासातील युगप्रवर्तक राजा. यादव, विजयनगर या साम्राज्यांच्या पाडावानंतर एक अहोम राज्य वगळता सर्वत्र मुसलमानी राजवट कायम झाली होती. एतद्देशीय मराठा, राजपूत आणि इतर सर्व सरदार घराणी तालेवार होती, मातब्बर होती पण त्यांच्या आपापसात लढाया होत असत. एकमेकांच्या लग्नाच्या वऱ्हाडांवर हल्ले केले जात असत. एकमेकांत वैर असले तरी चाकरी मात्र इमाने इतबारे बादशहाची करत असत. या सर्वात स्वातंत्र्याकांक्षी एक घराणे आले ज्यांनी इतिहासाचे पाट बदलले. शहाजी राजांनी स्वराज्याच्या अयशस्वी प्रयत्न केला. पण पुढे जात बंगळुरू, तंजावर येथे जवळ जवळ स्वायत्त असे राज्य उभारले. इकडे महाराष्ट्रात मात्र शिवाजी राजांनी मावळातल्या सामान्य माणसांना एकत्र करत, त्यांच्यातून नवे सरदार घडवत एक स्वराज्य स्थापन केले. ते स्वराज्य रयतेचे राज्य होते. ते स्वराज्य व्हावे ही 'श्रीं'ची इच्छा या भावनेतून उभारणी झाली होती. या स्वराज्यस्थापनेचा अचाट पराक्रम पाहून गागाभट्टांसारख्या प्रकांड पंडिताने राज्याभिषेकाची कल्पना मांडली आणि ती तडीस नेली. त्यासाठी एक नवा ग्रंथ शिवराज्याभिषे...

जोकर

जोकर अस्वस्थ करणारा सिनेमा   माझ्याशिवाय तुझ्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. मी आहे म्हणून तुझे महत्व आहे... ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'द डार्क नाईट राईसेज' चित्रपटातील जोकर हे खलनायकी पात्र नायक, सुपरहिरो बॅटमॅन ला म्हणतो. हे खरेच आहे. चित्रपट असो कि सामान्य जीवन खलनायकाच्या खलत्वावर नायकाचे नायकत्व अवलंबून असते. चित्रपट, कथा, कादंबऱ्यांत आपल्या समोर उभा केला जातो तो नायक. त्याची बाजू. त्याची नायक होण्याकडची वाटचाल. पण त्यातील खलनायकाची देखील एक बाजू असते. त्याची देखील काही कहाणी असते. ती विचारात घेणे आवश्यक वाटू लागते. त्या खलनायकाच्या नकारात्मक बाजूचे उदात्तीकरण योग्य नाहीच. पण बाजू समजून घेणे आवश्यक आहे. जगभरच्या चित्रपटांमध्ये अनेक वेळा अँटी हिरो ह्या संकल्पनेवर आधारित चित्रपट तयार झाले आहेत. त्यात अमेरिकेतील माफिया जगतावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट गॉडफादरचा उल्लेख अपरिहार्य आहे. भारतीय चित्रपट परिप्रेक्ष्यात देखील अनेक अँटी हिरो संकल्पनेवर अनेक चित्रपट तयार झाले आहेत. रोमान्स चा बादशहा म्हणवला जाणारा शाहरुख खान पुढे आला तो अँटी हिरो टाईपच्या भूमिकांमधूनच. ही झाल...