मल्टीब्रान्ड रिटेल एफडीआय- हितकारक कि अहितकारक १९९१! अर्थव्यवस्थेसाठी थोडसं अपमानकारक आणि म्हणूनच क्रांतिकारी बदलांची जननी ठरलेलं वर्ष. तेलाची आयात करण्यासाठी करण्यासाठी थेट सोन्याचा साठा टाकण्याची परिस्थती आली होती. १९९१ च्या आर्थिक उदारीकरण-जागतिकीकरण ह्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था महत्वाची भूमिका बजावली. १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर आणि परदेशी गुंतवणूक भारतात आल्यानंतर आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था निश्चितपणे प्रगतीपथावर आली. १९४८ ते १९९० पर्यंत केवळ ४%-५% एवादीच वाढणारी अर्थव्यवस्था ५%-८% नि वाढू लागली. परकीय गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत केवळ २१% वाटा असणारं तृतीयक क्षेत्र (बँकिंग, विमा, सेवा, इ.) आज अर्थव्यवस्थेतला ५८% वाटा उचलत आहे. कोकणातला आंबा अमेरिकेत जातो आहे, टाटा-रिलायंस-इन्फोसिस सारखे उद्योगसमूह दिमाखा...