Thursday, 28 November 2019

फर्जंद ते फत्तेशिकस्त

फर्जंद ते फत्तेशिकस्त 



शिवाजी, भारताच्या इतिहासातील युगप्रवर्तक राजा. यादव, विजयनगर या साम्राज्यांच्या पाडावानंतर एक अहोम राज्य वगळता सर्वत्र मुसलमानी राजवट कायम झाली होती. एतद्देशीय मराठा, राजपूत आणि इतर सर्व सरदार घराणी तालेवार होती, मातब्बर होती पण त्यांच्या आपापसात लढाया होत असत. एकमेकांच्या लग्नाच्या वऱ्हाडांवर हल्ले केले जात असत. एकमेकांत वैर असले तरी चाकरी मात्र इमाने इतबारे बादशहाची करत असत. या सर्वात स्वातंत्र्याकांक्षी एक घराणे आले ज्यांनी इतिहासाचे पाट बदलले. शहाजी राजांनी स्वराज्याच्या अयशस्वी प्रयत्न केला. पण पुढे जात बंगळुरू, तंजावर येथे जवळ जवळ स्वायत्त असे राज्य उभारले. इकडे महाराष्ट्रात मात्र शिवाजी राजांनी मावळातल्या सामान्य माणसांना एकत्र करत, त्यांच्यातून नवे सरदार घडवत एक स्वराज्य स्थापन केले. ते स्वराज्य रयतेचे राज्य होते. ते स्वराज्य व्हावे ही 'श्रीं'ची इच्छा या भावनेतून उभारणी झाली होती. या स्वराज्यस्थापनेचा अचाट पराक्रम पाहून गागाभट्टांसारख्या प्रकांड पंडिताने राज्याभिषेकाची कल्पना मांडली आणि ती तडीस नेली. त्यासाठी एक नवा ग्रंथ शिवराज्याभिषेक प्रयोग सिद्ध केला. ही सर्व दैदिप्यमान गाथा इतकी सरळसोट नाही. अनेक खाचखळगे आणि जय-पराजयाचा चक्रातून हे उभे राहिले. आपल्या उण्यापुऱ्या ५० वर्षांच्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी अनेक वेळा स्वतः ज्याला 'लिडिंग फ्रॉम द फ्रंट' म्हणतात अशा प्रकारे साहसी कारवाया केल्या आहेत. त्यात अफझल वध, सुरत लूट, आग्रा आणि सर्वात थरारक म्हणता येईल अशी पुण्यातील लाल महालवरील धाड अशा अचाट कारवाया आहेत. एकेक प्रसंग, मोहीम ही खूप काही शिकवणारी आणि आजच्या काळातही उपयुक्त आहे. त्यातील लाल महाल, शाहिस्ताखानाची शास्त या विषयावर आधारित हा चित्रपट आहे फत्तेशिकस्त. 

शिवाजी महाराजांनी अफझल वधानंतर आश्चर्याचा भर ओसरायच्या आत पन्हाळ्यावर धडक मारली. पण सिद्दी जौहर सारख्या कसलेल्या सेनानीने पन्हाळ्याला वेढा दिला. त्या वेढ्यातून शिताफीने करून घेतलेली सुटका आणि घोडखिंडीचा प्रसंग एका बाजूला आणि त्याचवेळी आलमगीर औरंगजेबाचा मामा शाहिस्ताखान याच्या लाखावर असलेल्या फौजेचा पुणे परिसरात धुमाकूळ. शाहिस्ताखाला एक चाकणचा संग्रामदुर्ग वगळता कुठेही लक्षणीय यश मिळालेले नाही. म्हणून खानाची फौज मुलुख बेचिराख करत आहे. त्यावेळी कोकण किनारपट्टीवर ताबा घेण्यासाठी कारतलबखान उझबेक याला फौज देऊन पाठवले जाते. लोहगडाजवळील उंबरखिंडीत घात लावून कारतलबखानाच्या फौजेला सळो की पळो करून गुडघे टेकायला भाग पाडले. त्यानंतर सुरू केली तो प्रत्यक्ष लाल महालावर धाड घालण्याची योजना. उंबरखिंड ते लाल महाल हा मोठा पट लेखक-दिग्दर्शक दिक्पाल लांजेकर यांनी या चित्रपटात मांडला आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण अशा प्रसंगांवर ५ चित्रपटांची मालिका करण्याचा लांजेकर यांचा मानस आहे. त्यातील पहिला, फर्जंद, जो कोंडाजी फर्जंद आणि अनाजी दत्तो यांनी अवघ्या साठ जणांनिशी काही हजार फौज असणाऱ्या पन्हाळ्यावर, फौजेला जाग आणून पन्हाळा जिंकला त्या अफाट कामगिरीवर आधारित आहे. त्याच मालिकेतील हा दुसरा फत्तेशिकस्त. 



लांजेकर यांनी चित्रपट उभे करताना सुरुवातीलाच एक सूचना केली आहे की हे ऐतिहासिक दस्तऐवज नाही. पण पुराव्याने सिद्ध झालेल्या ऐतिसाहिक घटनांवर आधारित प्रेरणादायक चित्रपट आहेत. त्यामुळे काही तपशिलाच्या चुका असल्या तरी त्या संजय लीला भन्साळी सारख्या छछोर नाहीत. मान्य होण्यासारख्या आहेत. लांजेकर यांच्या दोन्ही चित्रपटांचे महत्व सांगता येईल ते असे की एकंदर मोहिमेचा खूप सर्वांगीण विचार आणि मांडणी त्यांनी केली आहे. शिवाजीचा गुप्तहेर यंत्रणेवरील भर, विरोधी गोटातील प्रत्येक बारीक सारीक माहितीवर आधारित अचूक योजना आणि अंमलबजावणी, माणसांची अचूक निवड या गोष्टी दिसून येतात. फत्तेशिकस्त चित्रपटात बहिर्जी नाईक, किसना आणि केसर या व्यक्तिरेखा ताकदीने उभ्या केल्या आहेत. फर्जंद या चित्रपटात बहिर्जी नाईकांची भूमिका प्रसाद ओक यांनी केली होती तर फत्तेशिकस्त चित्रपटात ही भूमिका हरीश दुधाडे याने केली आहे. वेषांतर, लोककला, भाषा यांवरील प्रभुत्व यामुळे हे गुप्तहेर शत्रूच्या आतल्या गोटात शिरू शकत असत. लाल महालावरील धाडीत शिवाजी महाराजांनी लाल महाल माहिती असणारी, लहान पणापासून सोबत वावरलेली अशी माणसे घेतली होती. तान्हाजी, चिमणाजी-बाळाजी देशपांडे बंधू, कोयाजी बांदल, सर्जेराव जेधे अशी मंडळी या मोहिमेत निवडली गेली. अचूक नियोजनामुळे लाखाच्या फौजेत थेट लाल महालात शिरून कारवाई करून  निसटून येणे ही कामगिरी तर बजावलीच पण त्यानंतर होणार संभाव्य पाठलाग लक्षात घेऊन 'कात्रजचा घाट' करणे या योजनाही तयार होत्या. 

फर्जंद काय किंवा फत्तेशिकस्त काय, दोन्ही चित्रपट आपल्याला बांधून ठेवतात. फत्तेशिकस्त चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण प्रत्यक्ष राजगडावर केले आहे. आजच्या पिढीपर्यंत हा इतिहास चित्रपट या सर्वश्रेष्ठ लोक माध्यमातून पोचवणे आवश्यक आहे. पन्नास आणि साठच्या दशकात भालजी पेंढारकर यांनी मराठा तितुका मेळवावा, छत्रपती शिवाजी आणि अनेक चित्रपटांची मालिका दिली. तत्कालीन संदर्भात ते चित्रपट आवश्यक होते. पण त्यानंतर चित्रपट विषयांचा सांधा बदलला. आज सामाजिक स्तरावर जातीय फूट आणि इतर विषय गलिच्छ पातळीवर मांडले जात आहेत. त्यावरून सामाजिक घुसळण मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच वैचारिक पातळीवर 'भारतीय' पणा त्याला आपापल्या धारणेनुसार हिंदुत्ववादी म्हणा, भारतीय म्हणा किंवा नवा इंग्रजी शब्द 'इंडिक' म्हणा मूळ धरू लागला आहे. मुखतः डावा, समाजवादी समाज रचनेचा विचार सरकार, प्रमुख राजकीय पक्ष, ज्याला इंटलीजींशिया म्हणतात अशा पातळीवर होता तेव्हा तो विचार मांडणारे चित्रपट आले. त्या पद्धतीचे 'समांतर' चित्रपट म्हणजेच काहीतरी ग्रेट अशा पद्धतीची भावना नकळतपणे रुजवली गेली. आजही ती बहुतांशी कायम आहे. ठोस विचार लोकप्रिय चित्रपट, कलाकृतीतून मांडता येतो हे अनेक कलाकृतींतून दाखवून दिले आहे. ठोस विचारांबरोबरच 'भारतीय' इतिहासातील असामान्य घटना, व्यक्तींपासून अर्वाचीन काळातील भारताच्या विजयगाथा अधिकाधिक समोर येणे आवश्यक आहे. उरी, परमाणू, मद्रास कॅफे, रॉ (जॉन अब्राहाम), बाहुबली, टॉयलेट एक प्रेम कथा, सुई धागा, पॅडमॅन ते मराठीत फर्जंद, फत्तेशिकस्त, तेलगू मध्ये गौतमीपुत्र सातकर्णी अशी मालिकाच्या मालिका येत राहणे आवश्यक आहे. भारताचा भारतीय पणा, श्रेष्ठत्व जगावर आणि मुख्य भारतीय मनावरच ठसवण्याची गरज आहे. म्हणूनच अशा पद्धतीचे चित्रपट येत राहणे गरजेचे आहे. एक चित्रपट केवळ दोन तासाची करमणूक उरात नाही. उरू नयेत. 

भारतीय विचारांची, संस्कृतीची नव्या तंत्रज्ञानाची सांगड घालत जगाच्या पटलावर फत्ते होणार हे नक्की. त्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होत राहणे गरजेचे. चित्रपटसृष्टी आपल्या परीने करत आहे. आपणही करूयात....  

Tuesday, 19 November 2019

जेएनयू: दुसऱ्या नवनिर्माणाचे स्वप्नाळू आंदोलन?




विद्यार्थी.. या नावात, संकल्पनेतच एक ऊर्जा आहे. प्रश्न विचारणारी, बंडखोरी करणारी ऊर्जा आहे. 

पारंपरिक भारतीय शिक्षणपद्धती शैक्षणिक परिप्रेक्ष्यात प्रश्न विचारण्याला, बंडखोरीला उत्तेजन आहे. भारतीय शिक्षणपद्धतीत गहन विषय गुरू-शिष्यांमधील प्रश्नोत्तरांतूनच उलगडत गेले आहेत. 

काळ पुढे सरकत गेला तसं विद्यार्थ्यांमधील बंडखोरीच्या कक्षा विस्तारल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबतच अधिक व्यापक राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर विद्यार्थीप्रणित आंदोलने जगभर झाली. काही यशस्वी, काही अयशस्वी तर काही नव्या व्यवस्थेला जन्म देणाऱ्या चळवळी जन्माला आल्या. असंच मजेची गोष्ट सांगायची तर अफगाणिस्तानात धार्मिक, दहशतवादी उत्पात माजवणाऱ्या संघटनेच्या नावाचा अर्थ विद्यार्थी असाच आहे. ती संघटना म्हणजे तालिबान. अर्थात त्यांच्या 'विद्येच्या' आणि विद्यार्थ्यांच्या कल्पना खूपच वेगळ्या आहेत. 

भारतात देखील विद्यार्थी चळवळींचा मोठा वारसा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक विद्यार्थी संघटना स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होत्या. 

स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला महात्मा गांधींनी 'स्वतंत्र भारताच्या सरकारांनी योग्य कारभार केला नाही तर स्वतंत्र भारतात जन्माला आलेली पिढी या व्यवस्थेला प्रश्न विचारणार, त्याविरुद्ध बंड करून उठणार. त्यावेळी मी त्या पिढीच्या पाठीशी उभा राहीन.' असे वक्तव्य केले होते. 

त्याप्रमाणे खरोखरच स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्या पिढीने, त्यातही मुख्यतः एका जनआंदोलनाची सुरुवात केली. त्या विद्यार्थी चळवळीची ठिणगी पाहता पाहता मोठी झाली आणि आणीबाणीच्या मार्गे एक काहीशी अपयशी पण दूरगामी परिणाम करणारी लोकशाही मार्गाने झालेल्या क्रांतीत परावर्तित झाली. हे जनांदोलन म्हणजेच नवनिर्माण आंदोलन. नवनिर्माण आंदोलन आणि जेएनयू मधले विद्यमान आंदोलन यांच्यात काही एक संगती आहे का? सध्याचे आंदोलन खरंच तेवढ्या क्षमतेचे होऊ शकेल की त्याची एक स्वप्नाळू अखेर होईल? 


        
ते वर्ष होते १९७३-७४. गुजरात मधल्या मोरबी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेसचे दर वाढवण्यात आले. शेंगदाणा तेलाचे दर वाढल्यामुळे मेसचे दर वाढवल्याचे महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले. त्या वर्षी गुजरातचे प्रमुख नगदी पीक असलेल्या शेंगदाण्याचे बंपर पीक आले होते. 

अर्थशास्त्राच्या मूलगामी नियमानुसार पुरवठा वाढला आणि मागणी कमी असेल किंवा आहे तेवढीच असेल तर उत्पादनाचे दर कमी होतात. पण तत्कालीन व्यवस्थेत काळाबाजार, साठेबाजी, कृत्रिम टंचाई, मक्तेदारी या सरकारी धोरणांमुळे निर्माण झालेल्या गोष्टी होत्या. या पार्श्वभूमीवर हा घटनाक्रम सरळसोट वाटत असला तरी त्यातील घोळ लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. 

त्या आंदोलनात आपापले राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी राजकारणाने प्रवेश केला. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातीलच विरोधी गटांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शेंगदाणा आणि तेल व्यापारी यांच्यातील कृत्रिम टंचाई, साठेबाजी, तेलाचे दर वाढवणे याविषयी चालेलेल्या संभाषणाची टेप विद्यार्थ्यांना मिळेल अशी सोया केली.  विद्यार्थी पातळीवर सुरू झालेल्या या आंदोलनाची तीव्रता बघता बघता वाढत गेली. त्यात भ्रष्टाचार, सामाजिक असे अनेक घटक वाढत गेले. 

त्याच काळात पूर्वेकडे बिहारमध्ये अशीच विद्यार्थी आंदोलने सुरू झाली होती. त्यात राजकीय रंग चढत व्याप्ती वाढत गेली. ती विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर जायला लागली तेव्हा लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी नेतृत्व स्वीकारले. त्यापुढे या आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली. 

जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया अशा समाजवादी धुरिणांमुळे आणि बिहार-उत्तर प्रदेशातील तत्कालीन विद्यार्थी नेत्यांच्या समाजवादी विचारसरणीमुळे या आंदोलनाला तो चेहरा प्राप्त झाला. त्याची परिणती पुढे जाऊन आणीबाणी, जनता पक्ष यात झाली. 

आंदोलनाची पुढची राजकीय वाटचाल कशीही झाली असली तरी त्यातून जे नेते पुढे आले त्यांत काही अपवाद वगळता इतर सर्वच व्यवस्थेचा भाग झाले. 

गुजरात मधील आंदोलनाचे सुरुवात करणारे नेते उमाकांत मांकड आणि मनिशी जानी यांनी पुढे काँग्रेसमध्येच प्रवेश केला. ज्या काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचार वगैरेंच्या विरोधात त्यांनी रान उठवले होते त्याच पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यांची राजकीय कारकीर्द फारशी पुढे गेली नाही. 

उमाकांत मांकड यांना गुजरातमध्ये लोकांनी रस्त्यात गाठून प्रचंड चोप दिला होता. कारण त्यांच्याविषयी एक विश्वासघाताची भावना लोकांमध्ये पसरली होती. 

तीच गोष्ट उत्तर प्रदेश-बिहारची. मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, रविशंकर प्रसाद अशी काही नेते मंडळी या आंदोलनातून पुढे आली. लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव हेच पुढे भ्रष्टाचार शिरोमणी म्हणून गाजले. अपवाद म्हणता येईल तो नितीश कुमार आणि रविशंकर प्रसाद यांचा. नितीश कुमार आज बिहारमध्ये एक चतुर राजकारणीच नाही तर बिहारचे विकासपुरुष म्हणून नावारूपाला येत आहेत. 

हे नवनिर्माण आंदोलन महाविद्यालयीन निर्णय, धोरणांमुळे सुरू झलन असलं तरी त्यात पुढे देशपातळीवरील मुद्दे आले. देशाची लोकशाही अधिक प्रगल्भ, मजबूत करणारी चळवळ त्यातून उभी राहिली. 

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. जागतिक स्तरावर नावाजलेली संस्था. वैचारिक, शैक्षणिक दृष्ट्या मोकळे, चर्चा, वादविवादांना मुक्त स्थान असणारी संस्था. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, प्रशासन, सैन्य अशा विविध क्षेत्रांतील दिग्गज या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. 

एका बाजूला असे वातावरण आहे तर दुसऱ्या बाजूला ' भारत तेरे तुकडे होंगे हजार, अफजल हम शरमिंदा है तेरे कातील जिंदा है' अशा घोषणा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देणारे विद्यार्थी याच संस्थेत आहेत. हिंदू संस्कृती, विचार, प्रथा यांचे अश्लाघ्य अर्थ काढून त्यावर रान उठवणारे विद्यार्थी याच संस्थेत आहेत. 

भारताची संवैधानिक व्यवस्था उलथवून क्रांती घडवण्याच्या सरळ सरळ देशद्रोही अशा माओवादी विचारसरणीचे समर्थन करणारे विद्यार्थी, प्राध्यापक याच संस्थेत आहेत. छत्तीसगढच्या दंतेवाडा मध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या ७६ सीआरपीएफ जवानांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणारे विद्यार्थी याच संस्थेत आहेत. 

मेसमध्ये बिर्याणीत तूप कमी का वापरले म्हणून आंदोलन, वर्गात उपस्थिती अनिवार्य केली म्हणून आंदोलन, काही धोरणात्मक, शैक्षणिक निर्णय घेतले गेले म्हणून आंदोलन, कलम ३७० चा निर्णय घेतला म्हणून आंदोलन, अयोध्येची जमीन सर्वोच्च न्यायालयाने रामलल्लाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय दिला म्हणून आंदोलन, गाझा पट्टीत इस्राईल दहशतवाद्यांना टिपण्यासाठी कारवाई करते म्हणून आंदोलन. फुटकळ विषयापासून ते जागतिक मुद्द्यांपर्यंत कुठल्याही विषयावर ते आपल्या विचारसरणीच्या विरुद्ध असेल तर आंदोलन. त्यात विद्यापीठाचा परिसर, इमारती यांवर 'अभिव्यक्ती' प्रकट करणारी कलाकारी करणारे विद्यार्थी याच संस्थेत आहेत. 
         

सध्या सुरू असलेले हॉस्टेल आणि मेसची फीवाढीविरोधातील आंदोलन. तब्बल १९ वर्षांनंतर हे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

धक्का बसेल इतके कमी दर आहेत. दोन कॉट असलेल्या रूमचं एका विद्यार्थ्याला भाडं होतं १० रुपये प्रतिमाह ते वाढवून ३०० रुपये करण्यात आलं. मेसची फी नाही तर अनामत रक्कम वाढवण्यात आली. सेवा शुल्क वाढवण्यात आले. यावरून ठिणगी पडली (त्या संस्थेत ती कशावरूनही पडते. ) आणि आंदोलन सुरू. 

या आंदोलनाचे स्वरूप काय? विद्यार्थी आंदोलकांनी आजारी प्राध्यापकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा रस्ता अडवला. संस्थेच्या असोसिएट डीन डॉ. वंदना मिश्रा यांना घेराव घालून त्यांना एका वर्गखोलीत अडकवून ठेवण्यात आलं. 

विद्यापीठ परिसरातील सभागृहात एका सभागृहात एक समारंभ सुरु होता. विद्यार्थी आंदोलकांनी या सभागृहाच्या गेट आणि बाहेर पडायचे रस्ते अडवून धरले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री ५ तास त्याठिकाणी अडकून पडले. विद्यापीठ परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला. 

संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेवर मोर्चा नेण्याचा मानस पोलिसांनी हाणून पाडला. या विद्यार्थी आंदोलनांमुळे त्या परिसरातील अनेक मेट्रो स्टेशन बंद करावे लागले. ही कुठली विध्वंसक वृत्ती? स्वतःला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, बुद्धिजीवी वगैरे म्हणवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अशा विध्वंसक आंदोलनाची अपेक्षा नाही. 

विद्यार्थी आंदोलकांनी या आंदोलनामागे '४० टक्के विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १ लाख ४४ हजारांपेक्षा कमी आहे. त्यांना उच्चशिक्षणाचा हक्क नाही का? त्यांना अधिक शुल्क देणे शक्य नाही. हा त्यांच्यावर अन्याय आहे. तसेच या संस्थेत अनुदानित शिक्षण आहे. त्यावर सर्व विद्यार्थ्यांचा हक्क आहे.' असे युक्तिवाद केले जात आहेत. 

त्यावर सोशल मीडिया, या आंदोलनाच्या टीकाकर्त्या वर्गाने इतर सरकारी उच्चशिक्षण संस्थांचा हवाला दिला आहे. आयआयटी, आयआयएम आणि इतर संस्थांत शैक्षणिक शुल्क या संस्थेपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. शिवाय त्यात वेळोवेळी बदलही करण्यात आले आहेत. 

या संस्थांत वेळोवेळी आंदोलने झाली आहेत. हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठात रोहित वेमुला या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर अनोलन झाले. पण त्याचे स्वरूप अशा विध्वंसक पातळीवर गेले नाही. याच संस्थेत हे का? हा प्रश्न पडायला हवा. 

त्याचे उत्तर काही प्रमाणात येथील डाव्या विचारसरणीचा पगडा यात दिसून येईल. उच्चशिक्षण घ्यायचे असेल तर त्याचे शुल्क देण्याची तयारी असायला हवी. इतर संस्थांत असलेले जास्तीचे शुल्क यांचे दाखले दिल्यानंतर विद्यार्थी आंदोलकांकडून 'प्रश्न फक्त जेएनएयू चा नाही, प्रत्येक उच्चशिक्षण संस्थेत अत्यल्प शुल्कात, अनुदानित शिक्षण मिळालेच पाहिजे हा आमचा आग्रह आहे' असा युक्तिवाद मांडला जातो आहे. यावर लेखक आनंद रंगनाथन यांचे एक  वाक्य चपखल बसते ते म्हणजे 'Subsidize the Education, Not the Educated.'           

या बुद्धिजीवी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी विद्यापीठातील वातावरणाचे चपखल वर्णन अक्षर मैफल मासिकाचे संपादक मुकुल रणभोर याने केले आहे ते असे, 'हे विद्यार्थी ग्राउंड रिऍलिटी विसरले आहेत. ती मुलं आली असतील गरीब घरातूनच. पण जेएनयूतला मोकळेपणा, निवांतपणा, सरकार  विद्यार्थ्यांवर करत असलेला खर्च या सगळ्याने मुलं हवेत गेली आहेत. विद्यापीठाच्या बाहेर पडल्यावर आपल्याला असा मोकळेपणा, निवांतपणा मिळणार नाही हे एकतर त्यांच्या लक्षात येत नाही किंवा समजून घ्यायचं नाही. याचा एक परिणाम असा होतो की जेएनयूचा परिसर सोडवत वाटत नाही. M. Phil करत असलेल्या मुलाला/मुलीला ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळाली नसली तरी दरमहा ५ हजार भत्ता मिळतो. मग फुकट नाममात्र किंमतीमध्ये जेवण, मिळणार भत्ता आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा मोकळेपणा सोडून बाहेरच्या संकुचित, बंदिस्त जगात कोणाला जावंसं वाटणार? पण जेएनयू मधल्या वातावरणामुळे बाहेरही जग असंच आहे असा ग्रह मुलांचा झाला आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बाहेरचं जग अजूनही संकुचित आहे. अजूनही तिथे मोकळेपणाला स्थान नाही.' 

गरिबी, हे तथाकथित बुद्धिजीवी बेरोजगारी, आर्थिक, सामाजिक परिस्थिती यावर आपल्या विचारसरणी आणि तिथल्या झापडबंद वातावरणातून विश्लेषण, अभ्यास करतात. पण व्यवहारी जगात त्याचे काय होते, हे विद्यार्थी प्रत्यक्ष जगात नक्की कुठल्या क्षेत्रात कशा प्रकारे आर्थिक योगदान देतात हा प्रश्न पडायला लागतो. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेताना या संस्थेतील शैक्षणिक, वादविवाद याचे वातावरण यामुळे अनेक दिग्गज देशाला मिळाले आहेत. त्यातच विद्यमान अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री आहेत याचे भान कायम ठेवणे आवश्यक आहे.               

सत्तरीच्या दशकातले नवनिर्माण आंदोलन आणि जेएनयूमधले हे आंदोलन यात काही सामान दुवे असले तरी फरक मात्र मोठे आहेत. सध्याचे हे विद्यार्थी आंदोलक प्रत्यक्ष जगातील परिस्थितीचे  त्यांच्या कोषातून आकलन करणारे, त्यावरून गदारोळ, व्यवस्थेला प्रश्न विचारणे वगैरे बुद्धिजीवी खेळ करणारे आहेत. शैक्षणिक परंपरा उज्वल असणाऱ्या या विद्यापीठात अशा विध्वंसक वृत्ती का प्रबळ झाल्या, त्यांचे अंतःस्थ हेतू काय याचा अधिकाधिक शोध घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन स्वप्नाळू आंदोलन भासत आहे. किंवा स्वतःचे वैचारिक, राजकीय महत्व टिकवण्याची एक धडपड एवढ्याच पातळीवर हे उरले आहे. हा सर्व विचार करताना, अभ्यास करून पुन्हा एकदा आनंद रंगनाथन यांचे वाक्य उद्धृत करावे असे आहे, 
The Students must get back to studies, if they are capable of it...

पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक 'स्वतंत्र नागरिक' 

Monday, 18 November 2019

Veerappan: Chasing the Brigand by K. Vijay Kumar

वीरप्पन: क्रूरकर्म्याचा थरारक माग 

तामिळनाडू स्पेशल टास्क फोर्सचे तत्कालीन प्रमुख के. विजय कुमार यांची विजयी गाथा 



   १४ हजार चौरस किलोमीटरचे कर्नाटक, तामिळनाडू केरळ राज्यांच्या सीमावर्ती प्रदेशातील डोंगराळ, घनदाट जंगलांचा प्रदेश. एकीकडे उटी हे लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण, तेथील चहाचे मळे दुसरीकडे मदुमलाई, बांदीपूर चे जंगल तर एम एम डोंगर, कावेरी नदीचं खोरं असा प्रचंड प्रदेश. चहा, उत्कृष्ट प्रतीचे चंदन, ग्रॅनाईट खडकांच्या खाणी आणि हस्तिदंत याचा अवैध व्यापार, शिकार यामुळे अस्वस्थ असणारा प्रदेश. त्यातच आपली अंगभूत हुशारी, अखंड सावध, संशयी आणि जवळ जवळ अखेरच्या क्षणापर्यंत असलेली नशिबाची साथ या जोरावर एक क्रूरकर्मा त्या भागात निर्माण झाला. चंदन तस्करी, हत्तीची शिकार यातून झालेली सुरुवात अपरिहार्यपणे वन खात्याशी  संपर्क आणणारी ठरते. तिथे एक तर संगनमत किंवा संघर्ष अशा दोन शक्यता संभवतात. इथे संघर्ष उभा राहिला. अगदी सुरुवातीच्या काळात झालेल्या अटकेतून विलक्षण चतुराईने करून घेतलेली सुटका यामुळे स्थानिक आदिवासी आणि गावांमध्ये एक रॉबिनहूड सारखी प्रतिमा तयार झाली. ती प्रतिमा अंगभूत हुशारी आणि प्रचारामुळे अधिक गहिरी करण्याच्या कौशल्यामुळे एक दहशततीचा, एका लिजंडचा मदुमलाई आणि आसपासच्या जंगलात एका दंतकथेचा जन्म झाला.  कोसे मुनीसमी वीरप्पन या नावाची ही दंतकथा, दहशत संपुष्टात आणण्यासाठी ४० हुन अधिक पोलीस, स्पेशल टास्क फोर्स कमांडो, वनसंरक्षक आणि शेकड्याच्या आकड्यात सामान्य माणसांनी आपले प्राण गमावले. वीरप्पन आणि त्याची टोळी संपवण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडू राज्य सरकारांनी संयुक्त कृती दले उभारली. या कृती दलांना वीरप्पनची टोळी संपवण्यासाठी ११ वर्षांपेक्षा अधिक काळ लागला. घनदाट जंगलात एकमेकांविरुद्ध सुरु असलेला हा सामना १८ ऑक्टोबर २००४ च्या रात्री नाट्यमय कमांडो कारवाईने संपला. ही कारवाई  १९७५ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी के. विजय कुमार यांनी  यांनी प्रत्यक्षात उतरवली. त्या असामान्य, चित्तथरारक पाठलागाची कहाणी के. विजय कुमार यांनी 'Verappan: Chasing The Brigand (मराठी अनुवाद वीरप्पन विरुद्ध विजय कुमार) या पुस्तकात मांडली आहे. 


वीरप्पन. सुरुवात चंदन तस्करीपासून केलेली असली तरी पुढे हस्तिदंत तस्करी, ग्रॅनाईट खाण मालकांकडून खंडणी आणि पुढे जात मोठमोठ्या व्यक्तींचे अपहरण करून खंडणी इथपर्यंत त्याच्या कारवायांची वाढ झाली. चंदन तस्करीमुळे कर्नाटक आणि तामिळनाडू राज्य सरकारचा महसूल बुडत होता. मोठ्या वन क्षेत्रावर त्याची दहशत असल्यामुळे वाहतूक आणि इतर सुविधा यांच्या वाढीवर मर्यादा येत होत्या. वीरप्पनने आपल्या हुशारीने त्या परिसरातील इतर शिकारी टोळ्या एक तर नेस्तनाबूत केल्या किंवा आपल्या टोळीत सामील करून घेतल्या. सततची खंडणीखोरी आणि इतर कारणे लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने त्या भागातील ग्रॅनाईट खाणी बंद केल्या. त्या खाणीत काम करणारे कामगार त्यामुळे बेकार झाले. त्या बेरोजगारीचा सगळा ठपका वीरप्पनवर न येता राज्य सरकारवर पडला किंवा वीरप्पनने तो पाडला. त्या बेकार कामगारांतले अनेक जण पुढे वीरप्पनच्या टोळीत सामील झाले. एका बाजूला ही तस्करी आणि खंडणीखोरी तर दुसऱ्या बाजूला एलटीटीई सकट अनेक तामिळ बंडखोर संघटनांशी संधान बांधत .३०३ पासून ते ए के ४७ पर्यंत अनेक बंदुका त्याच्या टोळीकडे आल्या होत्या. जेव्हा पोलीस आणि स्पेशल टास्क फोर्सने त्याच्या विरुद्ध कारवाई तीव्र केली तेव्हा चवताळून जात वीरप्पनने तामिळनाडूमध्ये एक आणि कर्नाटक राज्यात एक अशा पोलीस ठाण्यांवर हल्ला करत शस्त्रागार लुटलंच शिवाय तिथले पोलीस मारले. वीरप्पनने आपल्या आयुष्यात अनेक अपहरणे केली पण त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली ती कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नट राजकुमार यांच्या अपहरणाने. वीरप्पनने राजकुमार यांच्या बांदीपूर जंगलाजवळच्या फार्म हाउसवरून त्यांचे अपहरण केले. त्यांच्या अपहरणामुळे कर्नाटक आणि तामिळनाडू राज्य सरकारांवर प्रचंड दबाव आला. वीरप्पनने राजकुमार यांना कुठलीही इजा केली नाही. पण त्यांच्या सुटकेसाठी केलेल्या मागण्या अतिशय चतुराईने केलेल्या होत्या. शिवाय त्या मागण्या वीरप्पनची राजकीय, आर्थिक समज दाखवून देणाऱ्या होत्या. राजकुमार यांचे अपहरण हा वीरप्पनच्या आयुष्यातील सगळ्यात खळबळजनक कृती होती पण तीच त्याच्या शेवटाकडे वाटचाल सुरु करणारी ठरली. राजकुमार तब्ब्ल १०० पेक्षा अधिक दिवस वीरप्पनच्या ताब्यात होते. हे नाट्य संपल्यानंतर राजकुमार यांनी वीरप्पन बद्दल प्रशंसोद्गार काढले होते. हे स्टोकहोम सिंड्रोमचे उदाहरण म्हणता येईल पण वीरप्पनच्या खात्म्यानंतर याच राजकुमार यांनी 'एक दुष्ट प्रवृत्ती नाहीशी झाली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 


या पार्श्वभूमीवर वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाल्टर दवाराम यांनी तामिळनाडू स्पेशल टास्क फोर्सची स्थापना केली. त्यांच्या गाठीशी तामिळनाडूच्या उत्तर भागात आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या नक्षलवादी चळवळीच्या उच्चाटनाचा अनुभव होता. त्यांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्स मध्ये अनेक अधिकारी, कमांडो होते. कित्येकांनी तर वीरप्पन पकडला अथवा मारला जाईपर्यंत विवाह न करण्याची शपथ घेतली होती. वीरप्पनचा वावर असणाऱ्या भागात खबऱ्यांचं विश्वसनीय जाळं उभारणे, गस्त घालणे, वेळोवेळी चकमकी अशा प्रकारे वर्ष २००० च्या आरंभापर्यंत वीरप्पनची टोळी मोठ्या प्रमाणात मोडकळीला आली होती. तरीही वीरप्पन कायम गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. हा जीवघेणा पाठशिवणीचा खेळ अनेक वर्ष चालला. जंगलात वावरताना, अशा हुशार आणि धोकादायक माणसाचा पाठलाग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, गस्ती मोहीम कशा पद्धतीने आखल्या पाहिजेत याचे अतिशय उपयुक्त धडे या संपूर्ण कारवाईत मिळतात. एक उदाहरण मात्र अवाक करण्यास पुरेसे आहे. स्पेशल टास्क फोर्स वीरप्पन टोळीचा माग काढत घनदाट अरण्यातील एका वस्तीत आली.  तिथल्या लोकांनी सांगितलं की गावाजवळच्या एका मोकळ्या भागात त्यांना वेगळ्या रंगाची मानवी विष्ठा दिसली आहे. या गावातील लोक जे प्रमुख अन्न खातात त्यामुळे त्यांच्या विष्ठेचा रंग काळसर असतो. पण ही वेगळी आहे. त्यावरून टास्क फोर्सनी निष्कर्ष काढले आणि ते बरोबर निघाले ते असे की हे लोक मुख्यतः भात खाणारे असावेत. एक-दोन दिवसांपूर्वीच या भागातून निघून गेले असावेत. आणि त्याद्वारे माग काढला असता एका ठिकाणी चकमक झाली पण घनदाट जंगल, अंधार यांचा फायदा घेऊन वीरप्पन गुंगारा देण्यात  यशस्वी झाला. या पुस्तकांत वीरप्पनच्या क्रौर्याच्या कथा वाचताना कायम एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्याने कायम पोलीस यंत्रणेच्या एक पाऊल पुढे जात विचार करून सापळा रचलेला असायचा. 


के. विजय कुमार यांनी २००१ मध्ये स्पेशल टास्क फोर्सचं प्रमुखपद स्वीकारलं. त्याचवेळी वीरप्पनची टोळी क्षीण झाली होती. त्याला माणसांची आणि शस्त्रांची गरज होती. टास्क फोर्सने आपल्यातला एक माणूस शस्त्र व्यूव्हर करणारा दलाल आहे अशी बतावणी करून त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. पण शेवटच्या क्षणी वीरप्पनला आलेला बारीकसा संशय आणि 'नजीकचा काळ कठीण आहे' असा त्याच्या ज्योतिषाने दिलेला सल्ला यामुळे वीरप्पन सावध झाला आणि योजना बारगळली.  पण वीरप्पनला त्याच्या अंताकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरला तो त्याचा डोळ्याचा आजार. त्याचाच वापर करून त्याच्या विरोधात सापळा रचण्यात आला. त्याच्या विश्वासार्ह स्रोतांत आपली माणसे पेरत त्याला पोलिसांनी खास तयार केलेली ऍम्ब्युलन्स देण्यात आली. ठरलेल्या ठिकाणी ती ऍम्ब्युलन्स आली आणि तुफान थरारक गोळीबार नाट्यानंतर या क्रूरकर्म्याचा अंत झाला. त्यानंतर देशभरच्या माध्यमात उलटसुलट चर्चा रंगल्या. एकेकाळी जगात मोस्ट वॉन्टेड लोकांच्या यादीत वीरप्पनला तिसरे स्थान देण्यात आले होते. त्यात सद्दाम, ओसामा नंतर वीरप्पनचा क्रमांक होता. वीरप्पनच्या मृत्यूनंतर मदुमलाई आणि बांदीपूरचा मोठा भाग आता शांत झाला आहे. तिथे आता गोळीबाराचे नाही तर प्राण्या-पक्ष्यांचे आवाज जास्त येतात. जवळ जवळ ११ वर्षं चाललेल्या या पाठलागाची कथा मुळातून वाचण्यासारखी आहे. जंगल आणि कारवाया करणे किती अवघड आहे ते कळण्यासाठी, व्यवस्थाच कशा प्रकारे वीरप्पनसारख्या वृत्ती जन्माला घालते पण त्याच व्यवस्थेच्या अधीन राहून त्यांचा अंतही करता येतो हे कळण्यासाठी हे पुस्तक मुळातून वाचले पाहिजे. के. विजय कुमार पुढे छत्तीसगढ मध्ये नक्षलवाद विरोधी कारवायांसाठी तेथील पोलिसांचे सल्लागार होते. त्याहीपेक्षा महत्वाची अगदी अलीकडची कामगिरी म्हणजे जम्मू आणि काश्मीर राज्यातील राष्ट्रपती राजवट- कलम ३७० चा निर्णय, राज्याचे द्विभाजन करण्याचा निर्णय या सर्व महत्वपूर्ण काळात ते तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे सल्लागार होते. 

थरारक कथानक, वैशिष्ट्यपूर्ण तपशील यामुळे ही जंगलातील पाठलागाची कहाणी अतिशय वाचनीय झाली आहे. मूळ इंग्रजी तसेच मराठी अनुवाद आवर्जून वाचावा असाच आहे. वीरप्पन: चेंजिंग द ब्रिगंड....  

Tuesday, 12 November 2019

Political Games: Maharashtra chapter

Political Games

Maharashtra Chapter

Politics is an art. Ideally it has to be a tool to make people's lives better through governing policies. In practice it's a game. A brutal game where power does not remain a tool, it becomes the goal. A brutal game where as per Frank Underwood 'Generosity is its own form of power.' Tussle for top position, tussle for becoming an influential figure and tussle to remain consistent and relevant is inevitable in this game. One who masters in tactics and timings play a long inning. There are many such figures in India who not just remained relevant in constantly changing political scenarios but also turned out to be pioneers of precedents. India being 'Union of states' has many layers of politics. Indian voters have always been mature enough to vote keeping in mind what institution they are voting for. One such election recently happened where politics turned out to be brutal game. A game where one cannot decide or come to at a conclusion who has been playing with whom? Did voters played with fates of political parties and candidates, Did political stalwarts played not just against party, ideological opponents but against partners also. Did intra party politics prevail? There are many possibilities. One may analyse it according own ideological tilt, choice. One thing is crystal clear that coming to appropriate conclusion is very difficult. 

May 2019. BJP and NDA won Loksabha elections with thumping majority. Based on those numbers psephologists came to the conclusion that opposition parties in BJP ruled states of Maharashtra and Hariyana stand no chance and BJP will win these two states with thumping majority. Were they wrong in concluding? They were not wrong on paper. The thing is politics, political dynamics do not proceed on paper. Let's go to recently concluded Maharashtra assembly elections. There were and there are many factors in favor of BJP. BJP formed a government in 2014, taking a party with them  that played a double role of being in Government and opposition at the same time. Chose, appointed a CM from a caste which is not liked by many other caste factions. In this scenario Devendra Fadnavis led a government and governance to new level, setting new precedents. Fadnavis, only second CM after Vasantrao Naik to complete his term. Faced various hurdles from Koregaon Bhima, unprecedented Farmer's strike, Maratha Mook and Kranti Morcha, Tribal long March to direct-indirect comments on his caste. He kept intra party possible opponents in check, handled ally like Shivsena. Despite of Mahajanadesh yatra, strong organisational structure of BJP final results of assembly elections were not as per expectations. But Assembly election results came out on 24th October with clear mandate to 'Mahayuti.' A brutal game of politics and possibilities started. 

When the results came out Sena became adamant for division of CM post for 2.5 years. Rajyasabha MP and editor of Sena mouthpiece Saamana Sanjay Raut kept on conducting press conferences. Initially it looked like a pressure tactic to get significant portfolios in government. Sena kept on demanding CM post quoting 50:50 agreement of alliance. Here BJP came up with strategy of keeping quite, and wait and watch. When necessary BJP leaders clarified their stand on 50:50 share. In the end when tenure of last assembly came to an end Fadnavis rendered his resignation. Conducted a press conference where he indirectly called Sena's bluff. Governor asked BJP to submit ability to form government and prove majority. despite of being single largest party BJP submitted that they are not in position to form government. The ball went into Sena's court. They batted for forming government with NCP and INC's support. NCP supremo kept on saying that people have given them mandate to sit in opposition until 11th November. Sena went to Rajbhavan to stake claim depending upon letter of support from INC. INC did not give it until last minute. In the end Sena lost a powerful ally and credibility for the long term. During all this political drama which media hyped too much BJP was just playing a game of patience. Considering the speed in gathering the post poll alliances in Manipur, Goa, Karnataka, Haryana and forming government why BJP is so calm and just watching the situation? 

Multiple possibilities could be there. BJP does have a strong organisational structure in Maharashtra. Fadnavis focused on winning local body elections, establishing party structure from Panchayat to Loksabha constituency level. BJP was in position to contest the elections on its own. alliance with Sena created a ground for rebels in BJP? Off course unnecessary intake from INC,NCP in BJP triggered for more rebels. Another question, why Sharad Pawar entered the game with such force? One of the answers lies in decisions by fadnavis government. They initiated inquires in Cooperatives, Education institutes, took decisions that could wither away hold of political parties, traders affiliated to political parties. Many leaders who garner their power from Cooperative and education institutes joined BJP. NCP, INC draw their electoral and party fund base from these organisations. When BJP in general and Fadnavis in particular went on to hunt these organisations it triggered NCP and Pawar. In all this political drama Fadnavis has been behind the limelight. After his recent press conference state party president Chandrakant Patil is presenting their stand. This kind of silence creates sense of more brutal power games. Non interference of Amit Shah creates more confusion. Is someting big yet to come? Is Maharashtra heading towards President's rule and midterm elections? Was this entire game of wait and watch a strategy to come out with new narrative? Only time will tell. People of Maharashtra witnessed high end drama. vertically opposite stands by Sena, NCP causing loss of their credibility. Every other party seems to be looking for immediate stake in power and BJP looking fro long term game? But the question remains in this brutal game of politics, Who is playing agaisnt whom? Till then, Let's wait and Watch....

Artha and the Civilisation: What Really Drives the Indian Economy

  Any system rests on two principal components. One is the driving force behind the system's construction, and the other is the guiding ...