Posts

Showing posts with the label पुस्तक परिचय (Book Reviews)

Mahabali Shahaji Raje Bhosale and his Times

Image
 The Statesman Who Laid Grounds for Hindavi Swarajya Mahavir Ta Bans me bhayo ek avanis Liyo birad Sisodiyo diyo Is ko Sees ( The One born/ belonging to the legacy of Mahavir, took the title 'Sisodiyo' as he had offered his Head to the Ishwar..) Kaviraj Bhooshan has described the Sisodiya clan of Chhatrapati Shivaji Maharaj, in the 'Kulvarnan' in his magnum opus Shri Shivbhushan.  Mahabali Shahaji Raje Bhosale, was the man, the legend who lived up to this legacy of Sisodiya. The legacy originated in the lands of Bappa Rawal, Rana Pratap's Mewar. The legacy of protecting independence, sovereignty, and Hindu dev-dharma who laid the grounds for Hindavi Swarajya in Maharashtra and Karnataka. The book 'Mahabali Shahaji Raje Bhosale and his Times' authored by Pune based historian Guruprasad Kanitkar explores the life and legacy of the statesman, who inspired Shivaji Maharaj in Maharashtra and Vyankoji or Ekoji Raje in the south to establish Hindavi Swarajya.  Guru...

वारसा मुंबईचा..

Image
मुंबईकर-पुणेकर-नागपूरकरांच्या पुढे 'कर' जोडताना पु.ल. हे लिहून गेले आहेत, ".... एक तर मुंबईच नव्हती. ती मुंबई झाली साहेब आल्यानंतर. त्यामुळे मुंबईचे पहिले आणि अखेरचे राजे हे इंग्रजच. ..." ते तत्कालीन व्यंगात्मक लेखन होते. त्याचा आस्वाद घेत आपण सगळेच मनमुराद हसतो, पण वास्तवात मुंबई आणि मुंबई भोवतालच्या परिसराला हजारो किंबहुना कोटीच्या कोटी वर्षांचा इतिहास आहे. मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत पुरात्तवज्ञ आणि कलेतिहासकार डॉ. सुरज पंडित यांनी अपरान्त आणि पुरातत्त्व विभाग व बहिःशाल विभाग, मुंबई विद्यापीठ प्रकाशित 'वारसा मुंबईचा' या पुस्तकात तो समृद्ध इतिहास उलगडला आहे.  तो उलगडावा वाटला याचे कारण सुरज पंडित यांनी नमूद केले आहे. ते म्हणतात, "मला कायम प्रश्न पडत असत, ही मुंबई अशी का आहे? ही जर पोर्तुगीज-ब्रिटिशांनी वसवलेली असेल तर प्राचीन साहित्यात तिचे उल्लेख कसे येतात?  या प्रश्नांचा मागोवा घेताना एक प्रवास सुरु झाला.." त्याला साथ मिळाली ती मुंबई महानगर विकास प्राधिकरण अर्थात MMRDA च्या वारसा संवर्धन विभागाची आणि त्या अंतर्गत उभ्...

अथातो बिंब जिज्ञासा

Image
अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

गांधार ते तालिबान: The Afghan Connection

Image
अफगाणिस्तान हे कोडं आहे. सध्याच्या काळात साम्राज्यांची दफनभूमी अशी प्रमुख ओळख कायम झाली आहे. पण प्राचीन काळात याच  भूभागात संस्कृतीचे मळे फुलले. पश्चिम आणि उत्तरेकडून भारतावर झालेली सर्व आक्रमणे गांधार भूमीतूनच झाली. कारण पश्चिम आणि उत्तरेकडून भारतात प्रवेश करण्यासाठी दोनच जमिनी वाटा होत्या. एक खैबर आणि दुसरी बोलन खिंड. समुद्री मार्ग खुले झाले, भूराजकीय गणिते बदलली तरी या भागाचं महत्त्व काही कमी झालं नाही.  भारत आणि अफगाणिस्तान ही पूर्वापार चालत आलेली एक अतूट बंधनाची नाळ आहे. तीच डॉ. प्रमोद पाठक यांनी त्यांच्या 'द अफगाण कनेक्शन' या पुस्तकात उलगडली आहे.   भारतीय उपखंड आणि त्याच्या लगत असणाऱ्या भूभागात जगातल्या प्राचीन संस्कृतींपैकी एक उदयाला आली, वाढली. काही बदल होत तीच संस्कृती आजही या उपखंडात टिकून आहे. मोठे बदल झाले ते सीमावर्ती भागात म्हणजेच, वायव्य भागात. इस्लामिक आक्रमणानंतर झालेले बदल वरवरचे आहेत हे बलोच स्वातंत्र्यकांक्षीच्या, "आम्ही पाकिस्तानी गेल्या ५०-६० वर्षांपासून आहोत, मुस्लिम १४०० वर्षांपासून पण गेल्या हजारो वर्षांपासून आम्ही बलोच आहोत" वाक्यातून स्पष्ट...

आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग: अपूर्वा जोशी

Image
फॉरेन्सिक, हा शब्द ऐकल्यानंतर डोळ्यासमोर एसीपी प्रद्युमन यांच्या सीआयडी ब्युरोतील डॉ. साळुंखे येतात. चित्रविचित्र रंगांची रसायने, बर्नर, वगैरे येत असत. कारण एक पिढी तो कार्यक्रम पाहत मोठी झाली आहे. पुढली पिढी थोडा अधिक वास्तववादी वाटावा असा क्राईम पेट्रोल हा कार्यक्रम पाहत मोठी होत आहे. त्यात बोटांचे ठसे, रक्ताचे डाग वगैरे शोधणारी अगदी सामान्य दिसणारी माणसे आहेत. पण फॉरेन्सिक म्हणजे भारतीय दंड संहितेतील खून, दरोडा, सदोष मनुष्यवध वगैरेच समोर येते. या रूढार्थाने प्रसिद्ध गुन्ह्यांच्या जोडीला आर्थिक आणि आता सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागले आहेत. मग या आर्थिक गुन्ह्यांचा तपास कसा केला जातो? तिथे कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान, प्रणाली वापरली जाते? त्याचे नाव फॉरेन्सिक अकाउंटिंग!  वर्ष २००९ मध्ये गाजलेल्या सत्यम कॉम्प्युटर्स च्या घोटाळ्यात देशात प्रथमच या ज्ञान शाखेचा उपयोग केला गेला. तो घोटाळा नेमका काय आहे, गफलत नेमकी कुठे आहे हे शोधून काढण्यात पुण्यातील फॉरेन्सिक अकाउंटिंग एक्स्पर्ट श्री मयूर जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचीच चित्तथरारक कथा, मयूर जोशी यांची स...

Partition and Unintended consequences

Image
पुस्तकं हा ग्रेट खजिना आहे. कधी, कुठल्या पुस्तकात काय भन्नाट वाचायला मिळेल, काही निराळीच दृष्टी मिळेल काही सांगता येत नाही. उदाहरणार्थ, वसंत पटवर्धन लिखित विष्णुगुप्त चाणक्याच्या आयुष्यावरील 'आर्य' ही कादंबरी. रूढार्थाने ही कादंबरी आहे. त्यावेळी उपलब्ध असलेले सर्व ऐतिहासिक पुरावे, त्यांचा अभ्यास करुन मांडलेली असली तरी शेवटी ती कादंबरीच, तो इतिहास मांडणी करणारा ग्रंथ नव्हे. पण त्या कादंबरीत बौद्ध विचार, बौद्ध पंथाच्या भविष्यातील ऱ्हासाची कारणे, ही चाणक्याच्या गहन चिंतनाचा भाग म्हणून मांडली आहेत. इतिहास ग्रंथात किंवा इतर विश्लेषणात्मक ग्रंथांपेक्षा त्या मांडणीतून तो सर्व मुद्दा अधिक स्पष्टपणे वैयक्तिक पातळीवर मला समजला. आणखी एक उदाहरण, अमेरिकेत साठ आणि सत्तरच्या दशकांत व्हिएतनाम युद्ध, हिप्पी चळवळ, भरकटलेली तरुणाई हा गंभीर प्रश्न झाला होता. या सर्वांची माझी पहिली ओळख झाली पु. ल. देशपांडे यांच्या 'जावे त्यांच्या देशा' या पुस्तकातील 'एक बेपत्ता देश' या लेखातून. उत्सुकता वाढली तेव्हा मग मिळतील साधने वाचून, माहितीपट पाहून हा विषय आणि या विषयाचे अनेक पदर उलगडत गेले. हा...

कोण होते वाकाटक?

Image
भारताचा हजारो वर्षांचा देदीप्यमान इतिहास हा गौरवाचा, अभिमानाचा विषय आहे. इथल्या दगडादगडाला इतिहास आहे. मातीचा प्रत्येक कण त्या इतिहासाचा साक्षीदार आहे. भारतात विविध काळात, विविध प्रदेशात विविध राजवंश राज्य करुन गेले. भारतीय इतिहासाकडे एकाच दृष्टीने, एकच एक प्रदेश डोळ्यासमोर ठेऊन इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला तर ती इतिहासाशी, इतिहास मांडणी शास्त्राशी प्रतारणा होईल. हाच भारताचा इतिहास म्हणून जो मांडण्यात आला आहे, पाठ्यक्रमात आहे तो असाच एकांगी आहे. इतिहास, मांडणी ही जणू काही आपली मक्तेदारी आहे याप्रमाणे डाव्या इतिहासकारांनी थोपला. काही वेगळेपण मांडणारे, इतिहासाशी प्रामाणिक राहून मांडणी करणारे यांच्या ग्रंथांना लोकाश्रय आणि राजाश्रय मिळणार नाही याची तजवीज करण्यात या मंडळींनी काळ खर्ची घातला.  भारतीय विद्या भवन, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ, डेक्कन कॉलेज आणि अशा अनेक संस्थांमधून चालणारे थेट उत्खनन, ताम्रपट, शिलालेख, नाणी, ग्रंथ, मंदिरे, लेण्या, कला यांच्या प्रत्यक्ष अभ्यासाद्वारे चालणारे संशोधन काहीसे मागे पडले. वास्तविक श्रेष्ठ इतिहास तज्ज्ञ म. के. ढवळीकर, काशीप्रसाद ...

Tiananmen Square: Making of a Protest

Image
- Vijay Gokhale  Tiananmen Square has been an important monument, site in the history of China. It has been witness to many incidents that defined China what it is today. One of such important incidents that defined the future of modern China. An incident that still attracts the attention of global media, academicians, intellectuals. The Tiananmen Square incident. Was it a massacre? Was it a genuine attempt to bring Western-style democracy to the People's Republic of China?  India's former Foreign Secretary Vijay Gokhale's book 'Tiananmen Square: The Making of a Protest' tries to answer many of such questions. This book recalls what led to the gathering of masses at the square, how the movement was dealt with and how China created a narrative to cover up the incident, from a former diplomat's point of view, who was posted in the Indian Embassy in Beijing when entire episode unfolded.  The book is presented in a style that can resemble with Indian style of theatr...

Age of Pandemics: Chinmay Tumbe

Image
  The Great Divide.. is the term used to denote the only time in the census history of India where there was negative growth in the population of India. How did it happen? With a warm climate, assured seasonal rains, perennial rivers, resources India has always been a suitable for a large population to settle and grow. To say it precisely, India and Asia have always been a home for more than a fifth or sixth of humankind on the Earth. However, the fact remains that despite of having a large population it had always been stable with continuous wars, famines caused due to droughts, and pandemics. There have been incidences of epidemics, pandemics in India since ancient times but the century from 1817 to 1920 has changed the course of history. These around 103 years led to the Great Divide, forever changes in almost all the sectors of life. The Age of Pandemics, a professor at prestigious IIM-A and author Chinmay Tumbe has termed these years and elaborated it.  The book begins wi...

धर्म: अर्थपूर्ण जीवनासाठी महाकाव्यांचा अन्वयार्थ

Image
भारत! हे हजारो वर्षांचा वारसा असणारा आणि तो समर्थपणे जपून ठेवणारे राष्ट्र आहे. भारतावर अनेक आक्रमणे झाली. ती केवळ लष्करीच नव्हती तर धार्मिक, सांस्कृतिक देखील होती. भारतीय संस्कृतीचा स्वभाव सतत विस्तार करण्याचा आहे. तो विस्तार आक्रमणाद्वारे नाही तर सामावून घेऊन होणारा आहे. म्हणूनच कित्येक आक्रमकांना भारतीय परंपरेने आपल्यात सामावून घेतले आहे. त्याचबरोबर भारतीय परंपरा, भारतीय धर्मविचार हा आत्मोन्नतीवादी आहे. जिथे एकच एक ग्रंथ, प्रेषित आणि त्यांच्या आज्ञा यांच्या चौकटीत भौतिक जीवनातील वाटचाल ही पद्धत नाही. मुळात एक कुठलाही विशिष्ट ग्रंथ नाही. भारतीय परंपरा वेद वाङ्मय, उपनिषदे, आरण्यके, ब्राह्मण ग्रंथ यांच्याबरोबर भौतिक जीवनातील नियमन मांडणाऱ्या स्मृती आणि रामायण-महाभारत या ऐतिहासिक काव्यांना प्रमाण मानते. या सर्वांच्या चौकटीत आपला अध्यात्मिक, अधिभौतिक विकास आपल्या कुवतीनुसार, दृष्टिकोनानुसार करण्यास संपूर्ण वाव देते. त्याचबरोबर या चौकटीचे प्रामाण्य झुगारून देखील आपला विकास साधण्याच्या स्वातंत्र्याचे स्वागत करते. म्हणूनच चार्वाक, बुद्ध आणि जैन भारतीय परंपरेत निर्माण होतात, रुजतात. वेद प...

ब्लड आयलंड: ओरल हिस्टरी ऑफ मॉरिझापी मॅसेकर

Image
निर्वासित! हा शब्द सध्या जगभरात सर्वात जास्त चर्चेत आहे. संयुक्त राष्ट्रासारख्या जागतिक संस्थेपासून ते स्थानिक संस्थांपर्यंत लोक निर्वासित, त्यामागची कारणे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न तो पुनर्वसनाचा, यावर अभ्यास करत आहेत. संशोधन करत आहेत. मोठ्या कष्टाने उभारलेला आपला संसार, आपली मालमत्ता एकाएकी सोडून देशोधडीला लागणे, निर्वासितांचे काहीसे लाचारीचे आणि हलाखीचे आयुष्य जगायचे. त्यातल्या त्यात सन्माननीय आयुष्यासाठी पुन्हा धडपड करायची हे भोग जगातल्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या जाती-जमातीचे लोक भोगत आहेत. लोकांच्या निर्वासित होण्यामागे पर्यावरण हानी आणि त्यामुळे होणारे वातावरण बदल, युद्ध, दंगली ही प्रमुख कारणं आहेत. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या भागात युद्धामुळे, दंगलींमुळे निर्वासित समस्या निर्माण होत आहे. यापुढेही ती होतच राहणार आहे. जागतिक स्तरावर इराक-सीरिया-अफगाणिस्तान मधून युरोपात गेलेले लाखो निर्वासित, आफ्रिकेतल्या संघर्षात देशोधडीला लागलेले निर्वासित ही प्रकरणे ताजी आहेत.  भारताच्या बाबतीत म्हणायचे तर निर्वासितांचा प्रचंड मोठा प्रश्न दोन प्रमुख वेळेला आला. प्रत्येक वेळी भारताला निर...

सुहेलदेव: - अमिश त्रिपाठी

Image
"इंडियाज लिटररी पॉपस्टार" असे अमीश त्रिपाठी यांचे यथार्थ वर्णन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले आहे. या वर्णनास साजेशी अशीच अमीश यांची लेखन कारकीर्द आहे. पशुपती महादेवाच्या कथेकडे शक्य तितक्या मानवी दृष्टिकोनातून बघत त्यांनी कादंबरीस्वरूपात केलेली मांडणी 'शिव ट्रायोलॉजी' मधून पुढे आली आहे. रामायणाकडे देखील मानवी दृष्टिकोनातून बघत, त्यातील चमत्कृतीपूर्ण आश्चर्यांना फाटा देत, तीन प्रमुख पात्रे, राम-सीता आणि रावण यांच्या दृष्टीने तीन भागात कादंबरीमय रामायण त्यांनी मांडले आहे. याच मालिकेत त्यांचे पुढची कादंबरी आली आहे. ज्यात त्यांनी मध्ययुगीन भारतातील पराक्रमी परंतु काहीशा विस्मरणात गेलेल्या राजाची गाथा त्यांनी मांडली आहे.  एक असा राजा ज्याने इस्लामच्या ध्वजाखाली अमानुष आक्रमणे करणाऱ्या तुर्कांच्या सैन्याचा सपाटून पराभव केला. असा राजा ज्याच्या पराक्रमामुळे पुढच्या दीडशे वर्षात तुर्की आक्रमकांचे भारतीय भूमीवर आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही. असा राजा ज्याने शक्य तेवढ्या सर्व राज्यांना, राजघराण्यांना एकत्र करून, सामूहिक लढा दिला आणि भारताच्या इति...