Skip to main content

Panipat: The Great Betrayal

पानिपत


 इ. स. १५२६, १५५६ आणि १७६१ हि वर्ष मध्ययुगीन भारताचा इतिहास मुळातूनच बदलण्यास कारणीभूत ठरली. इतिहासाचे सर्व संदर्भ, इतिहासाची गणितंच बदलली या वर्षी. समरकंदचा निर्वासित सुलतान बाबर इब्राहीम लोदीचा पराभव करून मोंगल राजवंशाची स्थापना १५२६ या वर्षी करतो. मोंगल वंशाचा निर्वासित वंशज अकबर, बैराम खानच्या मदतीनं हेमूचा पराभव करून मोंगल राज्याची पुनर्स्थापना १५५६ या वर्षी करतो. हिंदुस्थानच्या रक्षणार्थ लाखभर मराठी लष्कर परकीय घुसखोर अहमदशहा अब्दालीविरुद्ध १७६१ साली जीवघेणा लढा देतात. या तिन्ही इतिहास बदलणाऱ्या लढाया झाल्या त्या पानिपतच्या परिसरात. पानिपतच्या त्या भूमीचं महत्व काही ओउरच आहे. दोन राजघराण्यांची स्थापना आणि ते राज्य वाचवण्यासाठी घनघोर लढाया झाल्या त्या याच भूमीवर. Alexander पासून अब्दालीपर्यंत हिंदुस्थानवर आक्रमणं व्हायची ती खैबरखिंड, पानिपत याच मार्गानं. अफगाणीस्तनातून, पंजाब मार्गे दिल्लीकडे सरकणारा हा मार्ग अनादिकालापासून  रुधिरासाठी चटावलेला आहे. महाभारतातल महायुद्ध घडलेली ती कुरुक्षेत्राची भूमी तिथून जवळच आहे. पानिपतच तिसरा युद्ध अफगाण घुसखोर अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्यान बुधवार १४ जानेवारी, १७६१ या दिवशी घडलं. आजवरच्या इतिहासात सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या कालावधीत असं भयंकर, जीवघेणं युद्ध घडल्याचं आणि त्यामध्ये दोन्ही बाजुंची दीड लाख माणसं आणि ऐंशी हजार जनावरं मेल्याचं दुसरं उदाहरण नाही. हिंदुस्थानच्या रक्षणार्थ १७५२ सालच्या 'अहमदिया करारा'नुसार मराठे एका ध्येयाने प्रेरित होऊनच पानिपतावर गेले होते. दुर्दैवानं पानिपत म्हणजे पराभव. पानिपत म्हणजे वाताहत, सपशेल नाश असाच सर्वत्र प्रचार झाला. वास्तविक पंढरीच्या वेशिमध्ये आषाढी-कार्तिकीला मराठी मातीतल्या साऱ्या वैष्णवांचा मेळावा एक व्हावा, तसा पानिपतावर परकीय शत्रूच्या बिमोडासाठी अवघा एक झालेला मराठी मुलुख उभा होता.


   पानिपतच्या परजयाची अनेक करणं सांगता येतील. या एका विषयाच्या अभ्यासासाठी तज्ञांनी हयाती घालवल्या. पानिपतच्या परजायची प्रमुख कारणं म्हणजे या लढ्याविषयी हिंदुस्थानातल्याच राज्यकर्त्यांमध्ये असलेली उदासीनता. भरतपुरचा सुरजमल जाट आणि पतियालाचा आलासिंग जाट हे तेवढे अप्रत्यक्षपणे का होईना पण मराठ्यांच्या बाजूने उभे होते. स्वतःला सुरमा समजणारे राजपूत राणे कोठे होते? त्या मराठ्यांची नांगी परस्पर  ठेचली जात आहे, आपण यात का पडायचं असला स्वार्थी विचार करून स्वतःला राणा प्रतापचे वंशज समजणारे राजपूत वाळवंटात दडून बसले. याच रन प्रतापच्या वंशजाने अब्दालीला हिंदुस्थान लुटण्याच आमंत्रण दिलं होतं. प्रत्यक्ष महाराष्ट्रातूनही रसद पोचली नाही. दुसरं कारण ते लष्करात बायका आणि यात्रेकरूंचा अनावश्यक भरणा.  लष्करी मोहिमेत यात्रेकरूंचा, बाजारबुण्ग्यांचा इतका जमाव मोहिमेचं मातेरं करायला पुरेसा असतो. पनित्च्य संग्रामाने ते सिद्ध केलं आहे. लष्कराचा वेग मंदावतो. हव्या त्या हालचाली वेगाने करता येत नाहीत. 'आठ दिवसात परतुडाहून बऱ्हाणपूर गाठू' ही भाऊसाहेबांची योजना होती. या यात्रेकरूंच्या आणि बुणगाईताच्या लोंढ्यामुळे वेग मंदावला. ते अंतर कापण्यासाठी महिन्याच्या वर कालावधी लागला. यावरूनच अंदाज येईल. तिसरं कारण ते रसद पुरवठा. मध्य आणि उत्तर प्रांतात दोन वर्ष दुष्काळ पडलेला होता. अब्दालीने यापूर्वी दोन स्वाऱ्या करून यत्थेछ लुट केली होती. या लुटीच्या भयामुळेच तिकडील शेतकऱ्यांनी पेरण्यादेखील केलेली नव्हत्या. पेरण्याच नाहीत तर कसलं उत्पादन? आणि जुन्या साठवनुकीवर तरी कुठवर पुरवठा करणार? युद्धापुर्वीपर्यंत गोविंदपंत खेर अन्तर्वेदितुन रसदेचा पुरवठा करत होते. पण त्यांच्या मृत्युनंतर खरी आबाळ सुरु झाली. पतियलाचा आलासिंग जाटदेखील पुरवठा करत होता, पण अब्दालीने तीही रसद तोडली. प्रत्यक्ष युद्ध्याच्या आधी चार दिवसांपासून मराठी लष्कर झाडांचा पाला आणि नदीकाठच्या शाडूच्या मातीवर गुजराण करत होतं. उपाशी लष्कर प्रत्यक्ष युद्ध्त मात्र तीन-साडेतीनपर्यंत विजयी लढाई खेळत होतं. आणि पाचवं ते सरदारांच्यातली बेदिली. होळकर-शिंदे याचं विळ्याभोपळ्याचं सख्य. पवार, गायकवाड, विंचूरकरांची काही निराळीच तर्हा. त्यातून तोफखाना प्रमुख इब्राहिमखान गर्द्यवर सर्वच सरदारांचा राग. आणि लढाईच्या पद्धतीवरून सर्व सरदार आणि भाऊसाहेबांमध्ये तिढा.

  पानिपत हे यमुनेच्या खोर्यातील गाव. शालेय भूगोलाच्या भाषेत सांगायचं तर 'गंगेच्या मैदानाच्या प्रदेशात' गंगा-यमुनेच्या गाळामुळे बनलेला सुपीक पण सपाट प्रदेश. मराठे सह्याद्री पर्वताच्या आणि दक्खनच्या प्रदेशातले. तिथे शिवाजीने निर्माण केलेल्या 'गनिमी कावा' या युध्दपद्धतीत तयार झालेलं हे मराठी लष्कर. त्यात निकराची झुंज देण्याऐवजी शत्रूला बोचकारे काढून हैराण करून नामोहरम करण्याची पद्धत. आणि दक्खनचा, सह्याद्रीचा मुलुख या युद्धप्रकारासाठी अत्यंत अनुकूल. पानिपतावर नेमका उलटा प्रकार. शत्रूवर अचानक झडप घालून डोंगरात पळून जायला दूरदूरपर्यंत डोंगरांचा मागमूस नाही. अशा परीस्थित मैदानावरच्या लढाईचे अचूक आडाखे बांधून लष्कराचा अत्यंत बळकट व्युह रचणारा बहुसहेब अविचारी कसा ठरू शकतो?  वास्तविक इब्राहीम्खानाच्या तोफखान्याच्या जोरावरच मराठी लष्कर दुपारी तीन वाजेपर्यंत विजयी होत आलेलं होतं. इब्राहीमखान गरदी पकडला गेला आणि तोफखाण्याचा मारा बंद पडला.


       
   या लढाईच्या कारणांची चर्चा करत असता, एक मुद्दा महत्वाचा ठरतो. तो म्हणजे रोहीलखंडचा नवाब नजीब. अब्दालीला मराठ्यांविरुद्ध पानिपतावर उभा करणारा कापती नजीब हाच खरा युद्ध घडवून आणणारा मनुष्य ठरतो. मराठ्यांविरुद्धच्या लढाईला धर्मयुद्धाचं स्वरूप दिलं ते नजिबनेच. या धर्मयुद्धाच्या हाकेमुळे अब्दालीचे लष्कर देखील पेटून उठले. नजीबच्या मायावी शब्दांच्या जाळ्यात अडकले. या युद्धात अब्दालीच्या सैन्याचीही वाताहत झाली. अब्दाली भारतात असतानाच अफगाणिस्तानात बंडाळी झाली. त्यामुळे अब्दालीही लवकरात लवकर परत जाण्यास उत्सुक होता. अब्दाली पानिपतावर निसटता विजय मिळवून परत गेला तो पुन्हा परत भारतात येऊ शकला नाही. किंबहुना कोणीच खैबर खिंड मार्गे भारतावर आक्रमण करू शकलं नाही. वास्तविक एक निराळाच आक्रमक समुद्रमार्गे येऊन स्थानापन्न झाला होता. तो म्हणजे इंग्रज-फ्रेंच-पोर्तुगीज ह्या युरोपीय सेना. पानिपतच्या संग्रामाचा पट खूप मोठा आहे. निजामाविरुद्ध झालेली उदगीरची लढाई नंतर देवगिरी  परतूर मुक्कामाहून मोठा लवाजमा, राजकारण, समाजकारण हे सर्व सांभाळत शेवटी अन्नाला मोताद झालेली मराठी  प्राणपणाने लढली. आजवर काहीसा दुर्लक्षित असा हा विषय मोठ्या पडद्यावर येणं गरजेचं होतं. दुसऱ्या बाजूला हेही तितकंच खरं की हे आव्हान खूप मोठे आहे. त्यामुळे आशुतोष गोवारीकरांसारखा दिग्दर्शक या विषयाला हात घालतो तेव्हा उत्सुकता अधिक वाढते. जोधा-अकबर मध्ये इतिहासकालीन काल्पनिक कथा त्यांनी हाताळली आहे. पण इथे सर्व लेखी-टाकी पुराव्यांनी सिद्ध असा इतिहास आहे. हा इतिहास विविध कादंबऱ्या, इतिहास मांडणारी पुस्तके, ग्रंथ यांच्याद्वारे महाराष्ट्रात तरी परिचित आहे. त्यामुळेच जेव्हा पानिपत चित्रपटाचा ट्रेलर बाहेर आला तेव्हा अर्जुन कपूर आणि संजय दत्त हे कलाकार पाहून काही वेगळा विचार आला होता.  कपूरचा प्रत्येक प्रसंगात ताठर चेहरा पाहून लोकांनी निवड चुकली अशा प्रकारची टीका केली होती. पण चित्रपट पाहून आल्यावर बऱ्याच शंका (कलाकृतीबद्दल) दूर होतात.

चित्रपटाची सुरुवात उदगिरीच्या लढाई पासून होते. उदगिरीचा विजय संपादून सदाशिवराव भाऊ आणि सेना पुण्यात येते. (इथे क्रिएटिव्ह लिबर्टी की घोडचूक? कारण उदगिरी नंतर मराठी फौज थेट देवगिरी म्हणजेच दौलताबादला गेली. तिथून परतूर आणि तिथूनच पानिपत मोहिमेवर.) मराठी संस्कृती, एकंदर वातावरण उत्कृष्ट कलादिग्दर्शनातून योग्य रीतीने दाखवणात आलं आहे. पुण्यातील तसेच कंदहार, कुंजपुरा, पानिपत, दिल्ली असे किल्ले तसेच विविध शामियाने वगैरे भव्यतेने साकारले आहेत. चित्रपटाचा एकंदर आवाका पाहता काही गोष्टी ज्या आवर्जून येणे अपेक्षित होते किंवा अधिक उठावदारपणे येणे अपेक्षित होते त्या आल्या नाहीत. म्हणजे पानिपत मोहिमेसाठी प्रमुख कारणीभूत ठरलेली घटना म्हणजे बुराडी घाट लढाई, जेथे दत्ताजी शिंदे मारले गेले. ती लढाई अधिक उठावदारपणे आणि अधिक विस्तृत दाखवली असती तर मोहिमेचं प्रमुख कारण पुढे आलं असतं. पेशवे कुटुंबात किंवा एकंदरच समाजात अतिशय कमी वयात लग्ने होत असत. सदाशिवराव भाऊंचे पार्वतीबाईंशी लहान वयातच लग्न झाले होते. केवळ प्रेमकहाणी दाखवण्याच्या अट्टाहासापायी निष्कारण वेळ घालवला नसता तर अधिक महत्वपूर्ण गोष्टी दाखवता आल्या असत्या किंवा लांबी कमी करता आली असती. उत्तर भारतात सुरू असलेले राजकारण, अहमदिया करार, गलितगात्र मुघल गादी, वजीरपदासाठी चाललेल्या खेळी हा सर्व पट योग्य रित्या मांडण्यात आला आहे. त्यातही काही ढोबळ तर काही किरकोळ चुका आहेत. त्या चुका काय आहेत त्यासाठी इतिहास संशोधक आणि लेखक कौस्तुभ कस्तुरे यांचा फेसबुकवरील लेख आवर्जून वाचावा. सामाजिक उद्रेक किंवा आजच्या भाषेत कॉंट्रोव्हर्सी टाळण्यासाठी अनेक गोष्टी एक तर वगळण्यात आल्या  आहेत किंवा सोयींसकररीत्या बदलण्यात आल्या आहेत. तरीही सुरजमल जाट यांचं पात्र अवमानकारक आहे असं म्हणत राजस्थानमध्ये काही लोकांनी ओरड सुरू केलीच आहे. शिवाय अफगाणिस्तानातून काही निषेधाचे सूर येत आहेत. कारण त्यांचा उत्कृष्ट वीर अहमदशाह अब्दाली इथे खलनायक आणि क्रूर दाखवण्यात आला आहे.  सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेत अर्जुन कपूर आपल्या आवडी-निवडीनुसार आवडेल किंवा अगदी सहन होणार नाही. पण बाकी कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखांत चपखल बसले आहेत. नानासाहेब पेशव्यांच्या भूमिकेत मोहनीश बहल, गोपिकाबाई पद्मिनी कोल्हापुरे, मल्हारराव होळकर रविंद्र महाजनी, जनकोजी शिंदे गश्मीर महाजनी, अहमदशाह अब्दाली संजय दत्त आणि सर्वात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा नजीब मंत्रा या अभिनेत्याने साकारली आहे. सर्वात जास्त लक्षपूर्वक केला गेला आहे तो प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग. पुरेसा वेळ, डावपेचांनी आखणी आणि प्रत्यक्षातील लढाई हे सर्व भव्यपणे मांडलं आहे. भारताच्या इतिहासातील ही अतिशय महत्वाची गाथा काही चुका आहेत म्हणून अगदीच टाकाऊ म्हणून बाजूला करण्यात अर्थ नाही. एकदा आवर्जून पाहावी.

पानिपतची आशुतोष गोवारीकर कृत गाथा मोठ्या पडद्यावरच का पाहावी? उत्कृष्ट कलादिग्दर्शनाद्वारे उभ्या राहणाऱ्या काळासाठी. यासाठी नितीन देसाई यांचे अभिनंदन. दुष्मनची वाट लावली वगैरे छछोर नाही तर खरंच मराठमोळी गाणी आणि चपखल पार्श्वसंगीतासाठी. त्यासाठी अजय-अतुल यांचे अभिनंदन. मराठी कलाकारांची मांदियाळी आहेच शिवाय मराठी भाषेचा लहेजा पकडत आपापल्या भूमिका चोख बजावणाऱ्या अभिनेत्यांसाठी. पानिपत सारखा मर्मबंधातला विषय इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहता येण्यासाठी. यासाठी आशुतोष गोवारीकर यांचे अभिनंदन. अनेक तपशिलांच्या त्रुटींनी भरलेली असली तरी एकदा आवर्जून पाहावी अशी कलाकृती पानिपत.. The Great Betrayal. 

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...