Skip to main content

Posts

Showing posts from July, 2013

Raigad trip.

                   गडांचा राजा…                      महाराष्ट्र. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेला, विविधतेनं नटलेला, विविध भाषा, विविध प्रकारची माणसं, विविध संस्कृती असणारा वैविध्यपूर्ण प्रदेश. इथे काय नाही? गोदावरी, कृष्णा-भीमेसारख्या नद्या कि ज्यांच्या काठाकाठाने इथली संस्कृती बहरली-फुलली. साक्षात भार्गवरामाने समुद्र मागे हटवून निर्माण केलेली कोकणची नितांतसुंदर भूमी. मायमराठीचा माहेरघर म्हणावा असा मराठवाड्याचा प्रदेश. समृद्ध वनांनी बहरलेली अशी विदर्भाची भूमी. इतकं सगळं असूनही आपल्या नितांतसुंदर आणि रौद्रभीषण अस्तित्व राखून या राष्ट्राभूमिचा खद पहारेकरी म्हणजे सह्याद्री. मराठेशाहीची मुहूर्तमेढ आपल्या अंगाखांद्यावर समर्थपणे रोवून घेणारा आणि अभिमानाने आजतागायत वागवणारा हा सह्याद्री. या महाराष्ट्र देशी चांद्यापासून-बांद्यापर्यंत ४०० हून अधिक गडकोट आहेत. त्यातले निम्म्याहून अधिक ह्या राकट, कणखर सह्याद्रीत आहेत. पुरंदर, राजगड, तोरणा, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, हरिश्चंद्रगड…. कित...