Skip to main content

Posts

Showing posts from February, 2015

सरदार पटेल: एकसंध भारताचे शिल्पकार

                                    काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि कांडलापासून किबिथु ( अरुणाचल प्रदेश ) पर्यंत पसरलेला खंडप्राय देश, भारत. प्राचीन काळाच्या सीमा याही पलीकडे जात थेट अफगाणिस्तान, म्यानमार वगैरेना भिडतात. १९४७ साली खंडित भारताला स्वातंत्र्य मिळालं. ३२,८७,२६४ चौ. किमी. चा हा अवाढव्य प्रदेश. ज्याला आपण भारतीय संघराज्य असे म्हणतो. इ. स. १८१८ ते १९४७ पर्यंतच्या गुलामगिरीच्या पाशातून मुक्त झालेला भारत. गुलामगिरीतून हि भारतीय भूमी मुक्त व्हावी यासाठी कित्येक लोकांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. प्रत्येक जण आपापल्या मार्गाने लढत होता. मार्ग कुठले का असेना पण प्रत्येकाचं अंतिम ध्येय मात्र एकच होतं. ते म्हणजे स्वातंत्र्य. प्रदीर्घ काळ चाललेल्या लढ्यातून शेवटी स्वातंत्र्य मिळालं. पण मग पुढे काय? या ३७ कोटी लोकसंख्येचा देश एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र म्हणून उभं करणं तितकाच आवश्यक होतं. कारण इंग्रजांच राज्य संपलं असलं तरी देशात धार्मिक दंगली, फुट...