Skip to main content

Posts

Showing posts from April, 2018

संक्रमणाचे काळ आणि भारतीय अर्थव्यवस्था भाग १

            कुठलीही 'व्यवस्था' निर्माण होते, कायम होते ती कालांतराने एकतर मोडीत निघण्यासाठी किंवा मूलभूत बदल होत राहण्यासाठीच! ती राजकीय व्यवस्था असो, सामाजिक असो अथवा आर्थिक व्यवस्था असो. बसलेली घडी विशिष्ट काळानंतर बदलणारच. ती बदलायलाच हवी. कारण कुठलीच व्यवस्था कधीच 'पर्फेकट' नसते. त्या त्या काळाच्या संदर्भात ती योग्य, पर्फेकट वाटू शकते. किंबहुना असतेही. पण समाज, विज्ञान, काळ जसजसा पुढे जातो तसे बदल अपरिहार्य ठरतात. हे बदल घडण्याचा, संक्रमणाचा जो काळ असतो तो या सर्व घडामोडीत खूप महत्वाचा ठरतो. हे संक्रमण कोणत्या पद्धतीने होत आहे ह्यालाही अनन्यसाधारण महत्व आहे. फ्रेंच राज्यक्रांती हे झपाट्याने झालेले राजकीय संक्रमण होते, क्रांती होती. अत्यंत कमी काळात असलेली व्यवस्थाच उध्वस्त करून नवी कायम करण्याचा तो फसलेला प्रयत्न होता. याच न्यायाने औद्योगिक क्रांती आणि रशियन राज्यक्रांतीकडे पाहिले तर घटनाक्रम, कारणे, पार्श्वभूमी आणि संक्रमणाचे काळ पूर्णपणे भिन्न असले तरी परिणाम मात्र प्रचंड उलथापालथ करणारेच ठरले आहेत. ह्या सर्व जागतिक उलथापालथीत भारत कुठे होता? आणि भविष्यात कुठे