बदलती आर्थिक वर्तणूक १: २०१४ च्या निवडणुकीकडे वाटचाल जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सणाची घोषणा झाली आहे. ९० कोटी मतदार, हजारोंच्या आकड्यातील उमेदवार आणि निवडले जाणारे ५४३ लोकसभा सदस्य. त्याचबरोबरीने चार विधानसभा देखील निवडल्या जाणार आहेत. १७ व्या लोकसभेसाठी होऊ घातलेली ही निवडणूक पडलेल्या एका नव्या पायंड्यानंतरची पहिली निवडणूक आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील १९७१, १९७७, १९८४, १९९१, २००४ साली झालेल्या निवडणुका नवा पायंडा पडणाऱ्या किंवा असलेली व्यवस्था आमूलाग्र बदलणाऱ्या ठरल्या आहेत. त्याच मालिकेतील पुढली निवडणूक म्हणजे २०१४ ची १६ व्या लोकसभेसाठीची निवडणूक. तिथे १९८४च्या निवडणुकीनंतर एकपक्षीय बहुमताची खंडित झालेली परंपरा पुनःप्रस्थापित झाली. (२०१९ च्या निवडणुकीत तसेच निकाल आले तर त्याला पडलेला पायंडा म्हणता येईल. पण तरीही २०१४ मध्ये हा बदल झाला आहे हे नक्की.) ती निवडणूक बऱ्याच काळानंतर एकाच व्यक्तीभोवती फिरत राहिली. इतकी की आता लोकसभा निवडणूक अध्यक्षीय पद्धतीसारख्या होतील की काय अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली. त्या निवडणुकीत एकाच वेळी अनेक प्रवाह एकमेकांना
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!