Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

धर्म: अर्थपूर्ण जीवनासाठी महाकाव्यांचा अन्वयार्थ

भारत! हे हजारो वर्षांचा वारसा असणारा आणि तो समर्थपणे जपून ठेवणारे राष्ट्र आहे. भारतावर अनेक आक्रमणे झाली. ती केवळ लष्करीच नव्हती तर धार्मिक, सांस्कृतिक देखील होती. भारतीय संस्कृतीचा स्वभाव सतत विस्तार करण्याचा आहे. तो विस्तार आक्रमणाद्वारे नाही तर सामावून घेऊन होणारा आहे. म्हणूनच कित्येक आक्रमकांना भारतीय परंपरेने आपल्यात सामावून घेतले आहे. त्याचबरोबर भारतीय परंपरा, भारतीय धर्मविचार हा आत्मोन्नतीवादी आहे. जिथे एकच एक ग्रंथ, प्रेषित आणि त्यांच्या आज्ञा यांच्या चौकटीत भौतिक जीवनातील वाटचाल ही पद्धत नाही. मुळात एक कुठलाही विशिष्ट ग्रंथ नाही. भारतीय परंपरा वेद वाङ्मय, उपनिषदे, आरण्यके, ब्राह्मण ग्रंथ यांच्याबरोबर भौतिक जीवनातील नियमन मांडणाऱ्या स्मृती आणि रामायण-महाभारत या ऐतिहासिक काव्यांना प्रमाण मानते. या सर्वांच्या चौकटीत आपला अध्यात्मिक, अधिभौतिक विकास आपल्या कुवतीनुसार, दृष्टिकोनानुसार करण्यास संपूर्ण वाव देते. त्याचबरोबर या चौकटीचे प्रामाण्य झुगारून देखील आपला विकास साधण्याच्या स्वातंत्र्याचे स्वागत करते. म्हणूनच चार्वाक, बुद्ध आणि जैन भारतीय परंपरेत निर्माण होतात, रुजतात. वेद प...