स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे.. शांता शेळकेंच्या शब्दांना स्वरसाज चढवणारी व्यक्ती ही त्यातल्या 'मराठी पाऊल पडते पुढे' चे मूर्तिमंत उदाहरण. यात काहीही अतिशयोक्ती ठरणार नाही. आठ दशकांहून अधिक काळ हिंदी, मराठी सोबत भारतातील जवळ जवळ सर्व भाषांतील हजारांच्या घरातील गाणी, मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन, अशी त्यांची देदीप्यमान कारकीर्द. ते मराठी पाऊल अवघे जग व्यापून दशांगुळे उरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे लता मंगेशकर. सर्वांच्या लाडक्या लता दीदी. त्यांच्या अचाट, अफाट कामगिरीचा यथोचित गौरव झाला. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न, चित्रपट जगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके सन्मान आणि अगणित सन्मान त्यांना मिळाले. कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण प्रत्येक पिढीला त्या 'आपल्या' वाटत आलेल्या आहेत. हे आपलेपण, हा जिव्हाळा, हे प्रेम, एखाद्याच्याच वाट्याला येते. ते आयुष्याचे संचित गाठण्यासाठी कुठली तपश्चर्या करावी लागत नाही. आपण निवडलेले क्षेत्र, त्यातली उत्तमता, उत्कृष्टता हीच तपश्चर्या होते. मुली औक्...
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!