Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

भारतीय अर्थव्यवस्थेमागील प्रेरक शक्ती

Pic credit: Internet  कुठलीही व्यवस्था ही दोन प्रमुख घटकांवर आधारित असते. एक म्हणजे व्यवस्था उभारणीमागील प्रेरक शक्ती आणि दोन, मार्गदर्शक शक्ती. हाच निकष अर्थव्यवस्थेस देखील लागू पडतो. जगाच्या पाठीवर अनेक प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत, प्रत्येकाची आपली अशी प्रेरक आणि मार्गदर्शक शक्ती आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था भांडवलशाहीचा पुरस्कार करते, उद्यमी धाडसीपणला प्रोत्साहन देते त्याचे कारण प्रेरणा व्यक्तीस्वातंत्र्याची आहे, Life, Liberty,  and Pursuit of Happiness ची आहे.  जपान देखील चिवटपणा, उद्यमी प्रेरणांच्या आधारे जगात महत्वाच्या स्थानी आहे. ब्रिटिशांना दर्यावर्दी साहसाची प्रेरणा आहे.  चीन हा स्वतःला अभिमानाने Civilisational State म्हणवून घेतो. कम्युनिस्ट विचारधारा आणि हजारो वर्षांचा स्वाभिमानी इतिहास यांची अफलातून सांगड घालत त्यातून प्रेरणा घेत चीन आज जागतिक सत्ता झाला आहे.  याच धर्तीवर भारतीय अर्थव्यवस्थेमागील प्रेरक शक्ती, मार्गदर्शक शक्ती कोणती आणि त्यांचा भारताच्या वाटचालीत काय योगदान काय याचा विस्तृत विचार करण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे.  भारत हे देखील चीनप्रमाणेच हजारो वर्षांची सांस