माधवराव बल्लाळ पंतप्रधान १४ जानेवारी, १७६१ चा पानिपतावरचा पराभव, उत्तरेत माजलेली अंदाधुंदी, दक्षिणेत पुन्हा प्रबळ झालेले निजाम आणि हैदर, बंगाल मधून वाढत असलेला ब्रिटीशांचा प्रभाव या सर्वांवर खंबीरपणे मत करून मराठी साम्राज्याचं सामर्थ्य वाढवलं ते नानासाहेब पेशव्यांचे द्वितीय चिरंजीव माधवराव यांनी . एकवेळ शून्यातून साम्राज्य उभारणं सोपं वाटेल, पण जम बसलेली, बलाढ्य झालेली राज्यसत्ता पानिपातासारख्या आघातानंतर पुन्हा वैभवशाली करणं हे काही सोपं नाही . पानिपतचा आघात, सदाशिवरावभाऊ, विश्वासराव आणि कित्येक सरदार आणि त्यांच्या सैन्याचा मृत्यू झालेला . सदाशिवरावभाऊच्या आणि एकूणच पानिपातामुळे निराशेच्या गर्तेत झालेला नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू यामुळे अवघ्या सोळाव्या वर्षी मा...
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!