नरेंद्र मोदी- गुजरातच्या विजयाचे शिल्पकार लोकप्रियता, मानसन्मान मिळवणं हि फार कठीण गोष्ट आहे. आयुष्यभरचे कष्ट, जिद्द यांच्या जोरावरच उत्तरायुष्यात लोकप्रियता लाभते. शून्यातून पुढे येउन राजकारणातलं, प्रशासनातलं उच्च पद मिळवणं यासाठी बेसुमार कष्टांची, ध्येयाच्या मागे हात धुवून लागण्याची आवश्यकता असते. Excellence, Brilliance, Honesty, Ethics या चार गोष्टींच्या मागे धावणाऱ्या माणसाच्या मागे लोकप्रियता धावत असते. याचंच एक उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी. विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे मोदी पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार मानले जातात. गुजरात राज्याला प्रादेशिक अस्मितेची आणि सर्वांगीण विकासाची हाक देअन्रे आणि ती बर्यापैकी पूर्ण करणारे मोदी आज सलग तिसर्यांदा गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकले. सुमारे वर्षभरापासून आरोप-प्रत्यारोप आणि प्रचार...
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!