महासत्तान्मागच सत्य १९३९ ते १९४५ अशी जवळजवळ सहा वर्ष, युरोप, आशिया, आणि अमेरिका असे तीन खंड, आणि कित्येक देशांमध्ये चाललेल्या भीषण महायुद्धानंतर आणि नाझी जर्मनी, जपान यांच्या पतनानंतर उरलेल्या जागतिक महासत्ता म्हणजे एक भांडवलशाही अमेरिका आणि दुसरी साम्यवादी रशिया. या दोन धृवान्भोवती आणि धृवांमुळे जग विभागालं गेलं. जगाचं राजकारण या दोन धृवांपासून सुरु व्हावयाच आणि त्यांच्यापाशीच येउन संपायचं. त्या दोन देशांच्या आणि एकूणच जगाच्या जीवावर उठलेला तो शीतयुद्ध नामक कुरघोडीचा खेळ सगळ्या जगाचे नकाशे बदलून गेला. अमेरिकेचा पराकोटीचा साम्यवाद विरोध कित्येक राष्ट्रांना बर्बादिकडे घेऊन गेला. यात पोलंड आणि आता अफगाणिस्तानचा क्रमांक सर्वात वरचा आहे. सोव्हिएत युनियन च्या पंजात आलेले कित्येक देश साम्यवादाच्या असंख्य त्रुटींचे शिकार झाले आणि देशोधडीला लागले. कालांतराने स्वतः रशियाच त्या घाईला आला. संपूर्णपणे कोसळलेली अर्थव्यवस्था आणि अंतर्गत बंडाळीमुळे सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. १९९१ ला झालेल्या या घडामोडीनंतर जगात उरलेली एकमेव महासत्ता म्हणजे अमेरिका.
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!