Skip to main content

Posts

Showing posts from May, 2013

कर्नाटकचा निवडणुकीचा धुरळा…

                                                               लोकसभा निवडणुकीच्या रंगीत तालमी म्हणता येतील अशा कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्ली निवडणुका. त्यातही कर्नाटक आणि दिल्ली निवडणुका दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांसाठी महत्वाच्या आहेत. सलग तिसरी टर्म दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भोगणाऱ्या शीला दिक्षितांवर दिल्लीची जनता आणि त्यांच्याच पक्षातील लोक नाराज आहेत. दिल्ली महापलिका निवडणुकांमध्ये यश मिळवलेल्या भाजपसाठी दिल्लीत सत्ता स्थापणे हा कळीचा मुद्दा आहे. याउलट कर्नाटकात. भाजपला दक्षिणेतील राज्यात पहिल्यांदाच मिळालेली सत्ता टिकवण्याची धडपड करावी लागणार आहे. केंद्रात प्रचंड घोटाळ्यांची मालिका उभी करणाऱ्या सरकार विरोधात रान उठवणार्या भाजपच्या तोंडाला कर्नाटकातील खाण घोटाळ्यामुळे फेस आलेला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये भाजपची प्रस्थापित सत्ता आहे. त्या निवडणुका स्थानिक प्रश्नांवरच लढल्या जातील. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी विकासाचा ढोल पिटण्यास सुरवात केली आहे. छत्तीसगड राज्यात निवडणुकीवर नक्षलवादाचा प्रभाव असणारच आहे. राजस्थानात निवडणुकांची आणि प्र