Skip to main content

Posts

Showing posts from 2014

राजगड

                                                                           पावसाने चांगलीच ओढ दिली होती. जुलैचा दुसरा आठवडा आला तरी म्हणावा तितका पाउस पडलेला नव्हता. सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं. नुसतं घरात स्वस्थ बसून राहवत नव्हतं. दऱ्या-खोऱ्यात फिरण्याचे दिवस हे… " घरात काय बसून राहायचं? " अशा मनस्थितीतून जात असताना अचानक सर्वांच्या मनात आलं. चला राजगडावर. राजगड. १६४७ पासून सुरु झालेल्या  साम्राज्याच्या निर्मितीतील महत्वाचे साक्षीदार असणारे महाराजांचे आवडते किल्ले म्हणजे तोरणा, पुरंदर, रोहीडा, प्रतापगड आणि राजगड. 'गडांचा राजा, राजांचा गड' असं यथार्थ वर्णन राजगडाचं करण्यात येतं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. नजर ठरत नाही अशा उत्तुंग उंचीवर असणारं जणू गरुडाचं घरट. बोलावं, ऐकावं, वाचावं तितकं कमी आहे असा हा राजगड. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो. देवाच्या दयेनं दिसलाच सूर्योदय  तर तो राजगडच्या पायथ्यालाच  पहायचा अशा निर्धाराने गाड्या  पिटाळत होतो.                  रस्त्याच्या दुतर्फा हिरवा गालीचा पसरलेला होता. ढगाळ वातावरण. तासाभरात नसरापूर मार्गे गुंज

१४ जानेवारी १७६१ पानिपत…!

                                                  इ. स. १५२६, १५५६ आणि १७६१ हि वर्ष मध्ययुगीन भारताचा इतिहास मुळातूनच बदलण्यास कारणीभूत ठरली. इतिहासाचे सर्व संदर्भ, इतिहासाची गणितंच बदलली या वर्षी. समरकंदचा निर्वासित सुलतान बाबर इब्राहीम लोदीचा पराभव करून मोंगल राजवंशाची स्थापना १५२६ या वर्षी करतो. मोंगल वंशाचा निर्वासित वंशज अकबर, बैराम खानच्या मदतीनं हेमूचा पराभव करून मोंगल राज्याची पुनर्स्थापना १५५६ या वर्षी करतो. हिंदुस्थानच्या रक्षणार्थ लाखभर मराठी लष्कर परकीय घुसखोर अहमदशहा अब्दालीविरुद्ध १७६१ साली जीवघेणा लढा देतात. या तिन्ही इतिहास बदलणाऱ्या लढाया झाल्या त्या पानिपतच्या परिसरात. पानिपतच्या त्या भूमीचं महत्व काही ओउरच आहे. दोन राजघराण्यांची स्थापना आणि ते राज्य वाचवण्यासाठी घनघोर लढाया झाल्या त्या याच भूमीवर. Alexander पासून अब्दालीपर्यंत हिंदुस्थानवर आक्रमणं व्हायची ती खैबरखिंड, पानिपत याच मार्गानं. अफगाणीस्तनातून, पंजाब मार्गे दिल्लीकडे सरकणारा हा मार्ग अनादिकालापासून  रुधिरासाठी चटावलेला आहे. महाभारतातल महायुद्ध घडलेली ती कुरुक्षेत्राची भूमी तिथून जवळच आहे. पानिपतच तिसरा