Skip to main content

१४ जानेवारी १७६१ पानिपत…!

                              



                  इ. स. १५२६, १५५६ आणि १७६१ हि वर्ष मध्ययुगीन भारताचा इतिहास मुळातूनच बदलण्यास कारणीभूत ठरली. इतिहासाचे सर्व संदर्भ, इतिहासाची गणितंच बदलली या वर्षी. समरकंदचा निर्वासित सुलतान बाबर इब्राहीम लोदीचा पराभव करून मोंगल राजवंशाची स्थापना १५२६ या वर्षी करतो. मोंगल वंशाचा निर्वासित वंशज अकबर, बैराम खानच्या मदतीनं हेमूचा पराभव करून मोंगल राज्याची पुनर्स्थापना १५५६ या वर्षी करतो. हिंदुस्थानच्या रक्षणार्थ लाखभर मराठी लष्कर परकीय घुसखोर अहमदशहा अब्दालीविरुद्ध १७६१ साली जीवघेणा लढा देतात. या तिन्ही इतिहास बदलणाऱ्या लढाया झाल्या त्या पानिपतच्या परिसरात. पानिपतच्या त्या भूमीचं महत्व काही ओउरच आहे. दोन राजघराण्यांची स्थापना आणि ते राज्य वाचवण्यासाठी घनघोर लढाया झाल्या त्या याच भूमीवर. Alexander पासून अब्दालीपर्यंत हिंदुस्थानवर आक्रमणं व्हायची ती खैबरखिंड, पानिपत याच मार्गानं. अफगाणीस्तनातून, पंजाब मार्गे दिल्लीकडे सरकणारा हा मार्ग अनादिकालापासून  रुधिरासाठी चटावलेला आहे. महाभारतातल महायुद्ध घडलेली ती कुरुक्षेत्राची भूमी तिथून जवळच आहे. पानिपतच तिसरा युद्ध अफगाण घुसखोर अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्यान बुधवार १४ जानेवारी, १७६१ या दिवशी घडलं. आजवरच्या इतिहासात सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या कालावधीत असं भयंकर, जीवघेणं युद्ध घडल्याचं आणि त्यामध्ये दोन्ही बाजुंची दीड लाख माणसं आणि ऐंशी हजार जनावरं मेल्याचं दुसरं उदाहरण नाही. हिंदुस्थानच्या रक्षणार्थ १७५२ सालच्या 'अहमदिया करारा'नुसार मराठे एका ध्येयाने प्रेरित होऊनच पानिपतावर गेले होते. दुर्दैवानं पानिपत म्हणजे पराभव. पानिपत म्हणजे वाताहत, सपशेल नाश असाच सर्वत्र प्रचार झाला. वास्तविक पंढरीच्या वेशिमध्ये आषाढी-कार्तिकीला मराठी मातीतल्या साऱ्या वैष्णवांचा मेळावा एक व्हावा, तसा पानिपतावर परकीय शत्रूच्या बिमोडासाठी अवघा एक झालेला मराठी मुलुख उभा होता.
                  पानिपतच्या परजयाची अनेक करणं सांगता येतील. या एका विषयाच्या अभ्यासासाठी तज्ञांनी हयाती घालवल्या. पानिपतच्या परजायची प्रमुख कारणं म्हणजे या लढ्याविषयी हिंदुस्थानातल्याच राज्यकर्त्यांमध्ये असलेली उदासीनता. भरतपुरचा सुरजमल जाट आणि पतियालाचा आलासिंग जाट हे तेवढे अप्रत्यक्षपणे का होईना पण मराठ्यांच्या बाजूने उभे होते. स्वतःला सुरमा समजणारे राजपूत राणे कोठे होते? त्या मराठ्यांची नांगी परस्पर  ठेचली जात आहे, आपण यात का पडायचं असला स्वार्थी विचार करून स्वतःला राणा प्रतापचे वंशज समजणारे राजपूत वाळवंटात दडून बसले. याच रन प्रतापच्या वंशजाने अब्दालीला हिंदुस्थान लुटण्याच आमंत्रण दिलं होतं. प्रत्यक्ष महाराष्ट्रातूनही रसद पोचली नाही. दुसरं कारण ते लष्करात बायका आणि यात्रेकरूंचा अनावश्यक भरणा.  लष्करी मोहिमेत यात्रेकरूंचा, बाजारबुण्ग्यांचा इतका जमाव मोहिमेचं मातेरं करायला पुरेसा असतो. पनित्च्य संग्रामाने ते सिद्ध केलं आहे. लष्कराचा वेग मंदावतो. हव्या त्या हालचाली वेगाने करता येत नाहीत. 'आठ दिवसात परतुडाहून बऱ्हाणपूर गाठू' हि भौसहेबनचि योजना होती. या यात्रेकरूंच्या आणि बुणगाईताच्या लोंढ्यामुळे वेग मंदावला. ते अंतर कापण्यासाठी महिन्याच्या वर कालावधी लागला. यावरूनच अंदाज येईल. तिसरं कारण ते रसद पुरवठा. मध्य आणि उत्तर प्रांतात दोन वर्ष दुष्काळ पडलेला होता. अब्दालीने यापूर्वी दोन स्वाऱ्या करून यत्थेछ लुट केली होती. या लुटीच्या भयामुळेच तिकडील शेतकऱ्यांनी पेरण्यादेखील केलेली नव्हत्या. पेरण्याच नाहीत तर कसलं उत्पादन? आणि जुन्या साठवनुकीवर तरी कुठवर पुरवठा करणार? युद्धापुर्वीपर्यंत गोविंदपंत खेर अन्तर्वेदितुन रसदेचा पुरवठा करत होते. पण त्यांच्या मृत्युनंतर खरी आबाळ सुरु झाली. पतियलाचा आलासिंग जाटदेखील पुरवठा करत होता, पण अब्दालीने तीही रसद तोडली. प्रत्यक्ष युद्ध्याच्या आधी चार दिवसांपासून मराठी लष्कर झाडांचा पाला आणि नदीकाठच्या शाडूच्या मातीवर गुजराण करत होतं. उपाशी लष्कर प्रत्यक्ष युद्ध्त मात्र तीन-साडेतीनपर्यंत विजयी लढाई खेळत होतं. आणि पाचवं ते सरदारांच्यातली बेदिली. होळकर-धींडे याचं विळ्याभोपळ्याचं सख्य. पवार, गायकवाड, विंचूरकरांची काही निराळीच तर्हा. त्यातून तोफखाना प्रमुख इब्राहिमखान गर्द्यवर सर्वच सरदारांचा राग. आणि लढाईच्या पद्धतीवरून सर्व सरदार आणि भाऊसाहेबांमध्ये तिढा.
            पानिपत हे यमुनेच्या खोर्यातील गाव. शालेय भूगोलाच्या भाषेत सांगायचं तर 'गंगेच्या मैदानाच्या प्रदेशात' गंगा-यमुनेच्या गाळामुळे बनलेला सुपीक पण सपाट प्रदेश. मराठे सह्याद्री पर्वताच्या आणि दक्खनच्या प्रदेशातले. तिथे शिवाजीने निर्माण केलेल्या 'गनिमी कावा' या युध्दपद्धतीत तयार झालेलं हे मराठी लष्कर. त्यात निकराची झुंज देण्याऐवजी शत्रूला बोचकारे काढून हैराण करून नामोहरम करण्याची पद्धत. आणि दक्खनचा, सह्याद्रीचा मुलुख या युद्धप्रकारासाठी अत्यंत अनुकूल. पानिपतावर नेमका उलटा प्रकार. शत्रूवर अचानक झडप घालून डोंगरात पळून जायला दूरदूरपर्यंत डोंगरांचा मागमूस नाही. अशा परीस्थित मैदानावरच्या लढाईचे अचूक आडाखे बांधून लष्कराचा अत्यंत बळकट व्युह रचणारा बहुसहेब अविचारी कसा ठरू शकतो? लष्कराची बळकट योजना तोडून घिसाडघाईने अंदाधुंदी माजवण्यात विंचूरकर आणि पाठोपाठ इतर सरदारांचा वाट होता. आणि ऐन लढाईतून होळकर-विंचूरकर निघून गेले. अशा अंदाधुंदीमुळे प्रबळ तोफखान्याचा मारा फिका पडला. वास्तविक इब्राहीम्खानाच्या तोफखान्याच्या जोरावरच मराठी लष्कर दुपारी तीन वाजेपर्यंत विजयी होत आलेलं होतं. इब्राहीमखान गरदी पकडला गेला आणि तोफखाण्याचा मारा बंद पडला. होळकर-विंचूरकर रान सोडून पळून गेले. तरी भाऊसाहेब शेवटपर्यंत उभे होते.
            या लढाईच्या कारणांची चर्चा करत असता, एक मुद्दा महत्वाचा ठरतो. तो म्हणजे रोहीलखंडचा नवाब नजीब. अब्दालीला मराठ्यांविरुद्ध पानिपतावर उभा करणारा कापती नजीब हाच खरा युद्ध घडवून आणणारा मनुष्य ठरतो. मराठ्यांविरुद्धच्या लढाईला धर्मयुद्धाचं स्वरूप दिलं ते नजिबनेच. या धर्मयुद्धाच्या हाकेमुळे अब्दालीचे लष्कर देखील पेटून उठले. नजीबच्या मायावी शब्दांच्या जाळ्यात अडकले. या युद्धात अब्दालीच्या सैन्याचीही वाताहत झाली. शेवटच्या क्षणी अब्दालीला जो निसटता विजय मिळालेला होता त्याचं निशाण हाती घेताना त्याला धाप लागली होती. उत्तर हिंदुस्थानातल्या तमाम मुसलमानाना धर्मयुद्धाच्या वेडापायी अब्दालीच्या कळपात या नजिबनेच आणला. अयोध्येचा नवाब शुजा उद्दौलाही यातलाच. त्याच्या असण्या-नसण्याने युद्धाचे सर्व संदर्भ बदलणार होते आणि तसे बदलले. भाऊसाहेबांच्या कळकळीच्या विनंतीला मन देऊन शुजा उद्दौला मराठ्यांच्या गोटात आला असता तर इतिहास कदाचित वेगळा असता.
              वास्तविक पानिपतचा पराजय हा पराजय मानायचं काही करणाच नाही. अगदी शेवटच्या क्षणी केवळ अल्लातालाच्या कृपेमुळे अब्दालीला जो विजय मिळालेला होता.  खणाणत्या  जिगरबाज मराठी तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचं त्याला धाडस झालं नाही. त्याचंच काय कोणाचंच राहिलं नाही. रक्ताला चटावलेला हा मार्ग परकीयांसाठी जणू बंद झाला. हा एकप्रकारे मराठ्यांचा विजयच मानायला हवा. आज अडीचशे वर्षांच्या दीर्घ पल्ल्यानंतरही या परिसरातले  जमातीचे शाहीर आजही आम्ही केव्हाच वेड्या ठरवलेल्या भाऊसाहेब पेश्व्यचेच पोवाडे गातात. या युद्धानंतर परकीयांनी हिंदुस्थानवर स्वारी करण्याचा जमिनीवरचा मार्ग बंद झाला आणि समुद्रामार्ग सुरु झाला. इंग्रज ,फ्रेंच, पोर्तुगीज यांचा प्रत्यक्ष राजकारणातला वावर वाढला. इंग्रज तर पुढे हिंदुस्थानचे राज्यकर्ते झाले. मराठी दौलत इंदौर, ग्वाल्हेर, बडोदा इथल्या अनुक्रमे होळकर, शिंदे आणि गायकवाडांनी संपूर्ण हिंदुस्थानभर बळकट केली. माधवराव पेशवे आणि त्यानंतर नाना फडणवीस-महादजी शिंदे या जोडगोळीने मराठी दौलतीचा डंका पिटला. जणू या पानिपतच्या भूमीला मराठी रक्ताचा, महाराष्ट्रातल्या तमाम घरातल्या लक्ष बांगडीचा अभिषेक केल्यानंतरच मराठी दौलतीला हिंदुस्थानच्या राजकारणाच्या किल्ल्यांचा प्रसाद मिळाला. हा मराठी दौलतीनं पानिपतावर अप्रत्यक्ष विजयच मिळवलेला आहे. 

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...