Skip to main content

Posts

Showing posts from January, 2014

१४ जानेवारी १७६१ पानिपत…!

                                                  इ. स. १५२६, १५५६ आणि १७६१ हि वर्ष मध्ययुगीन भारताचा इतिहास मुळातूनच बदलण्यास कारणीभूत ठरली. इतिहासाचे सर्व संदर्भ, इतिहासाची गणितंच बदलली या वर्षी. समरकंदचा निर्वासित सुलतान बाबर इब्राहीम लोदीचा पराभव करून मोंगल राजवंशाची स्थापना १५२६ या वर्षी करतो. मोंगल वंशाचा निर्वासित वंशज अकबर, बैराम खानच्या मदतीनं हेमूचा पराभव करून मोंगल राज्याची पुनर्स्थापना १५५६ या वर्षी करतो. हिंदुस्थानच्या रक्षणार्थ लाखभर मराठी लष्कर परकीय घुसखोर अहमदशहा अब्दालीविरुद्ध १७६१ साली जीवघेणा लढा देतात. या तिन्ही इतिहास बदलणाऱ्या लढाया झाल्या त्या पानिपतच्या परिसरात. पानिपतच्या त्या भूमीचं महत्व काही ओउरच आहे. दोन राजघराण्यांची स्थापना आणि ते राज्य वाचवण्यासाठी घनघोर लढाया झाल्या त्या याच भूमीवर. Alexander पासून अब्दालीपर्यंत हिंदुस्थानवर आक्रमणं व्हायची ती खैबरखिंड, पानिपत याच मार्गानं. अफगाणीस्तनातून, पंजाब मार्गे दिल्लीकडे सरकणारा ...