Skip to main content

Posts

Showing posts from July, 2014

राजगड

                                                                           पावसाने चांगलीच ओढ दिली होती. जुलैचा दुसरा आठवडा आला तरी म्हणावा तितका पाउस पडलेला नव्हता. सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं. नुसतं घरात स्वस्थ बसून राहवत नव्हतं. दऱ्या-खोऱ्यात फिरण्याचे दिवस हे… " घरात काय बसून राहायचं? " अशा मनस्थितीतून जात असताना अचानक सर्वांच्या मनात आलं. चला राजगडावर. राजगड. १६४७ पासून सुरु झालेल्या  साम्राज्याच्या निर्मितीतील महत्वाचे साक्षीदार असणारे महाराजांचे आवडते किल्ले म्हणजे तोरणा, पुरंदर, रोहीडा, प्रतापगड आणि राजगड. 'गडांचा राजा, राजांचा गड' असं यथार्थ वर्णन राजगडाचं करण्यात येतं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. नजर ठरत नाही अशा उत्तुंग उंचीवर असणारं जणू गरुडाचं घरट. बोलावं, ऐकावं, वाचावं तितकं कमी आहे असा हा राजगड. दुसऱ्या दिवशी सकाळी लवक...