Skip to main content

Posts

Showing posts from May, 2015

बदल...

                काळ आला कठीण!… काय आहे कठीण? वेग. कसला वेग? आयुष्याचा वेग. बदलाचा वेग. बदल. कोणते बदल? सगळ्या प्रकारचे बदल. स्मार्टफोनच APP, स्मार्टफोन- कंप्युटरचे हार्डवेअर, सोशल नेटवर्किंग, प्रायव्हेट बोलणी , तीही वर्च्युअल. सगळंच कसं बदलत चाललंय. जमाने के साथ कदम मिलाओ, वरना जमाना तुम्हे कुचलकर आगे निकाल जायेगा. हाच आजच्या काळाचा मूलमंत्र आहे. जो ना तुम्ही थांबवू शकत, ना मी. या बदलांच्या प्रवाहात, वेगात वाहत जाणं हे आणि हेच आवश्यक आहे.  बदल. बदल काय फक्त तंत्रज्ञानातच आहे काय? एकंदर आयुष्यच बदलू लागलं आहे. प्रचंड वेगवान होऊ लागलं आहे. नाती-भावना, त्याचं प्रदर्शन करणं-न करणं. त्यांच्यात येऊ लागलेला व्यवहारीपणा, त्यांच्यातली निवळ कर्तव्याची जाणीव. कुठल्याही भावभावनांशिवायची. बदल. बदल नात्यांमधला. रक्ताच्याच नाही तर मनाच्या, इमोशन्सच्या. मैत्रीच्या व्याख्या बदलू लागल्या आहेत. रिलेशनशिप, प्रेम, कमिटमेंट यात ' Use and Throw' वृत्ती वाढायला लागली आहे. वेग. प्रचंड वेग आहे बदलांचा. कधी कधी आणि काही बाबतीत झेपत नाही हा वेग. म्हणून आम्ही वेगळे पड...