Skip to main content

Posts

Showing posts from July, 2015

सोबत..!

                                                                "सोबत… काही क्षणी सोबत असावीच. अगदी जवळच्यांची. ती सोबत, क्षणाचा आनंद द्विगुणीत करते तर दुःखात आधार देऊन दुःख दूर करते. अशी सोबत… कायम असावी.. " 'ति'चं हे वाक्य, हे बोलणं भिडलं. काय चुकीचं बोलली ती? Input किंवा Output एकतर्फी असेल तर धोकादायक ठरतो. किंवा हानिकारक ठरतो. स्वगतापेक्षा संवाद अधिक प्रभावी.. अगदी प्रत्येक वेळी असतोच असं नाही. पण ज्या क्षणी शब्द आणि कधी कधी मौनाचं Give and Take सुरु होतं त्या क्षणी संवाद सुरु होतो. बहुतेक वेळा शब्दांशिवाय झालेला संवाद अधिक परिणामकारक ठरतो. तो थेट मनांचा, संवेदनांचा संवाद होतो. शब्दांची गरज संपते.                  सोबत! मला तिची सोबत आहे. भावना, संवेदनांचं एका दिशेनं जाणारं दळणवळण तिच्या सोबतीमुळे दोन दिशांचं होतं. मनाचा, संवे...