इराण. जगातला क्रमांक चारचा तेल साठे असणारा आणि निर्यातदार देश. कायम धगधगता. तेल आणि त्याभोवतीच्या राजकारणातला महत्वाचा खेळाडू. कधी स्वतः खेळवला जाणारा आणि बर्याच वेळा इतरांना खेळवणारा. एक इराणच्या राजकारणातला खेळाडू. ज्याने ब्रिटीश कंपन्या ज्या इराणमधल्या तेलक्षेत्रावर प्रभुत्व मिळवून होत्या, ज्या एतद्देशीयांची पिळवणूक करत होत्या, त्याविरोधात पेटून उठून इराणी राष्ट्रवादाची पायाभरणी त्याने केली. जो नफेखोर, तेलपिपासू ब्रिटन, अमेरिकेच्या विरोधात पाय गाडून उभा राहिला. अमेरिकन, ब्रिटीश कंपन्यांनी त्याच्याविरोधात त्या त्या सरकारांकडे आगपाखड केली. अमेरिकेची CIA, ब्रिटनची MI 5 आणि इतर इराणच्या शहांसह त्याच्याविरुद्ध कारवाईसाठी तयार झाले. ज्याने इराणमधल्या ब्रिटीश कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण केलं, इराणला श्रीमंतीच्या, संपन्नतेच्या आणि आधुनिकीकरणाच्या वाटेवर नेलं, पण हे करत असताना तेलकंपन्या आणि बड्या राष्ट्रांची नाराजी ओढवून घेतली. आणि इराणमध्ये त्याच्याविरोधात प्रचार सुरु झाला. त्याला Communist धार्जिणा, धर्मविरोधी असा ठरवणारा प्रचार सुरु झाला. ज्या इराणच्या जनातेच्या पाठीं
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!