एक इराणच्या राजकारणातला खेळाडू. ज्याने ब्रिटीश कंपन्या ज्या इराणमधल्या तेलक्षेत्रावर प्रभुत्व मिळवून होत्या, ज्या एतद्देशीयांची पिळवणूक करत होत्या, त्याविरोधात पेटून उठून इराणी राष्ट्रवादाची पायाभरणी त्याने केली. जो नफेखोर, तेलपिपासू ब्रिटन, अमेरिकेच्या विरोधात पाय गाडून उभा राहिला. अमेरिकन, ब्रिटीश कंपन्यांनी त्याच्याविरोधात त्या त्या सरकारांकडे आगपाखड केली.
अमेरिकेची CIA, ब्रिटनची MI 5 आणि इतर इराणच्या शहांसह त्याच्याविरुद्ध कारवाईसाठी तयार झाले. ज्याने इराणमधल्या ब्रिटीश कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण केलं, इराणला श्रीमंतीच्या, संपन्नतेच्या आणि आधुनिकीकरणाच्या वाटेवर नेलं, पण हे करत असताना तेलकंपन्या आणि बड्या राष्ट्रांची नाराजी ओढवून घेतली. आणि इराणमध्ये त्याच्याविरोधात प्रचार सुरु झाला. त्याला Communist धार्जिणा, धर्मविरोधी असा ठरवणारा प्रचार सुरु झाला. ज्या इराणच्या जनातेच्या पाठींब्यावर तो अध्यक्षपदावर पोचला होता त्याच जनतेला त्याच्याविरोधात चिथवल गेलं. वातावरण टिपेला गेल्यावर, इराणच्या शहाला त्या अध्यक्षाला हटवण्यास भाग पाडण्यात आलं. स्वतःच्या राष्ट्रासाठी उभ्या ठाकलेल्या या खंबीर, राष्ट्रवादी नेत्याची राजवट उलथवून टाकण्यातआली. तो इराणचा नेता एका वर्षीचा TIME मासिकाचा 'Person of the Year' होता.
आता काळ पुढे सरकला आहे. काळाच्या ओघात जगभरच्या विविध नद्यांवरील पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं. आता काही संदर्भ आणि खेळाडू बदलले आहेत.
१९४७ आणि १९९१. ही दोन वर्ष भारताच्या संदर्भात कायम संस्मरणीय असणार आहेत. त्यातही आता १९९१चं महत्व वाढलं आहे वाढणार आहे. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण स्वीकारून भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली आणि झपाट्याने वाढायला लागली. भारतीय अर्थव्यवस्थेने स्थिर आश्वासक अशी प्रतिमा निर्माण केली आहे. राष्ट्रीय ऐक्य आणि सार्वभौमत्व यासाठी आवश्यक असणाऱ्या परराष्ट्र धोरणातील आश्वासक बदल आणि त्यानंतरची वाटचाल ते बरयाच अर्थानी बदल घडवणारं २०१४ हे वर्ष,बर्याच घटनांना चलन देणारं ठरणार आहे.
२०१४, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आले. बदल आणि आक्रमकता दिसून आली ती परराष्ट्र धोरणात. शपथविधी समारंभास SAARC देशांच्या प्रमुखांना आमंत्रण, भूतान आणि पाठोपाठचे शेजारी राष्ट्रांचे दौरे. द्विपक्षीय करार आणि त्या त्या देशात असणार्या अनिवासी भारतीयांबरोबर संवाद, SOFT POWER उभारणी, चीनच्या विरोधात ( अप्रत्यक्षपणे ) उघडलेली 'Anti Encirclement policy' किंवा 'String of Diamonds', विविध युद्धग्रस्त राष्ट्रांमधून केलेला बचावकार्य, आपत्तीत केलेल मदतकार्य यामुळे भारताची प्रतिमा उंचावली आहे. आर्थिक आघाडीवर जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीच्या पार्श्वभूमीवर ७.४% या गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बहुमतातल स्थिर सरकार.
गृह, अर्थ, परराष्ट्र आणि संरक्षण या चार महत्वपूर्ण आघाड्यांवर सक्षम नेतृत्व आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या 'Ceasefire' उल्लंघनाविरुध्द सुरु असणारा सक्षम प्रतिकार जो पाकिस्तानचं कंबरड मोडत आहे. आणि सीमेवरील आगळीक बंद झाल्याशिवाय चर्चा होणार नाही असा भारताचा पवित्रा त्याचबरोबर पाकिस्तानची आर्थिक, राजकीय कोंडी करण्याचे आक्रमक पाउल. ह्या काही प्रातिनिधिक घडामोडी.शेती, उद्योग, उर्जा इत्यादी क्षेत्रात होत असलेले उल्लेखनीय काम या पार्श्वभूमीवर राष्ट्रांतर्गत घेण्यात आलेले 'काही लोकांची' कोंडी करणारे निर्णय देशात वातावरण ढवळण्यासाठी कारणीभूत ठरल्यासारखे झाले आहेत.
२००२. गुजरात दंगल. ज्यामुळे मोदींना 'मौत के सौदागर' वगैरे विशेषणे मिळाली. सर्व आरोपातून मोदी बाहेर निघाले. त्या दंगलीत मुस्लिमांवर अन्याय झाला, त्यांच्या पुनर्वसनासाठी म्हणून परदेशातून प्रचंड पैसा गोळा करण्यात आला. जो पूर्णपणे बेकायदेशीर होता. ज्या कारणासाठी तो गोळा केलेला होता त्या कारणासाठी न वापरता 'इतर'अनेक कारणांसाठी वापरण्यात आला. त्याचे हिशेब देण्याचे आणि न दिल्यास कायदेशीर कारवाई संबंधित व्यक्ती पक्षी तिस्ता सेटलवाड यांच्यावर करण्याचे निर्णय झाले. सरकार 'असहिष्णू' होण्यास सुरुवात झाली.
उत्तर प्रदेश. एक छोटंसं गाव, दादरी. गोमांस घरात असल्याच्या संशयावरून मोह्हमद अखलाख या व्यक्तीची हत्या. वास्तविक प्रत्यक्ष घटना घडली उत्तर प्रदेशात. ती घडली त्यामागची प्रत्यक्ष कारणं बाहेर येऊ शकली नाही किंवा येऊ दिली नाहीत. प्रत्यक्ष घटनेसाठी, तपासासाठी स्थानिक राज्य सरकार आणि पोलिस खत जबाबदार आहे आणि असतं. ज्या व्यक्तीचा मुलगा भारतीय वायुसेनेत आहे, अशा व्यक्तीची हत्या नुसत्या संशयावरून होते आणि प्रत्यक्ष सत्य बाहेर येऊ दिल जात नाही हे संशयास्पद नाही काय? यासाठी भाजप आणि परिवार, असहिष्णुता वाढल्याचा साक्षात्कार कित्येकांना होतो आणि 'पुरस्कार वापसी' हे नाटक सुरु होतं.
'पुरस्कार वापसी' मधील आर्थिक गणित लक्षात घेतलं तर बरयाच विचित्र आणि संशाय्स्पद हालचाली सापडतात. बहुतेक लेखक, कलाकार कोणत्या न कोणत्या NGO किंवा इतर संस्था ज्या परदेशी पैशावर चालतात. बहुतेक पैसा अमेरिकेतील काही संस्था ज्या गुप्तहेर संघटना वगैरेंशी संबंधित आहेत इथून येतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत झाडून सर्व माध्यमं मोदीनामाचा गजर करत होती. आता अचानक स्वतःला पुरोगामी(?) म्हणवून घेणाऱ्या लोकांनी आणि बेताल माध्यमांनी देशात असहिष्णुता वाढल्याची बोंबाबोंब सुरु केली आहे. आठवण होत नाही इराणची??
या पार्श्वभूमीवर, जागतिक राजकारणाचे बदललेले संदर्भ, नव्याने उदयाला आलेले दमदार खेळाडू, जे बराच काळ प्यादी होते. शह-काटशह नित्याचे सुरु आहेत. इराणच्या जनतेला भडकवण्यासाठी 'त्या' अध्यक्षाला धर्मविरोधी, सोविएतचा हस्तक वगैरे ठरवलं गेलं. भारतात कट्टर धार्मिक आणि असहिष्णू ठरवलं जात आहे. या तथाकथित पुरोगामी, पाकिस्तान मध्ये जाउन मोदींना हटवण्यासाठी आवाहन करण्याऱ्या तथाकथित निधर्मी नेत्यांचा हा देशद्रोह का समजू नये हा महत्वाचा प्रश्न आहे.
तरुणांचा देश जो जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता बाळगून आहे तिथे असली राष्ट्रविरोधी भूमिका समर्थनीय आहे? हा प्रश्न ज्यानेत्याने आपापल्या बुद्धीने सोडवावा. चीन आणि पाकिस्तान देश जात-पात, धर्म या आधारावर फोडायला टपलेले आहेत. आपण त्यांना आपल्या तथाकथित पुरोगामी(?) आचरणाने आपण बळच देत आहोत, हे समजण्याची त्यांची कुवत नाही. आणि असलीच तर पैसा भल्याभल्यांची नियत फिरवणारा घटक आहे. मग आता बदललेल्या जगाच्या राजकारणात एक समर्थ खेळाडू म्हणून उभं राहायचं की प्यादे बनून रहायचं?
क्षमता आहे पण ती असल्या फुटकळ गोष्टींपायी आपण वाया घालवणार असू तर काहीच शक्य नाही. 'त्या' अध्यक्षानंतर इराणची काय अवस्था झाली हा इतिहास जगजाहीर आहे, मग आपण त्याच वाटेनं जाणं योग्य आहे? प्रश्न अनेक आहेत, उत्तरं समोर दिसत आहेत पण झाकून ठेवण्यातच धन्यता मानली जाते. प्रश्न… सोडवण्याची क्षमता आहे, गरज आहे इच्छाशक्ती आणि सावधपणाची.
Right . ..
ReplyDelete