ईशान्य भारत. फक्त बावीस किलोमीटर रुंदीच्या 'सिलीगुडी चानेल' किंवा 'चिकन्स नेक'ने उर्वरित भारताशी जोडलेला आहे. या एका चिंचोळ्या जमिनीच्या पट्ट्यातून रस्ते, रेल्वेमार्ग सर्वकाही जातं. राजकीय, सामाजिक, आर्थिक उलाढाली होतात. आर्थिक उलाढाली होतच राहतात. त्याचं प्रमाण आणि देशाच्या एकंदर सकल उत्पादनातील वाटा अत्यंत कमी आहे. का? सामाजिक आणि राजकीय करणं आहेत. लोकसंख्या कमी आहे. आसाम वगळता इतर सर्व राज्यांतील लोकसंख्येची घनता अत्यंत कमी आहे. संसदेतील प्रतिनिधित्व(संख्यात्मक) कमी, त्यातही विविध राज्यातील स्थानिक समाजकारण आणि राजकारण आजवर केंद्र सरकारचं एकंदर दुर्लक्ष, विघटनवादी गट आणि त्यांच्या कारवाया त्या प्रदेशाला अधिक मागासलेपणाकडे घेऊन गेल्या. पण हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. त्यातल्या सकारात्मक बदलाकडे झपाट्याने वाटचाल करणाऱ्या त्रिपुरा राज्याच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान डॉ. संदीप महात्मे यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन, त्रिपुरा राज्य संग्रहालय( उज्जयंता राजवाडा) काही क्षणाचा उशीर झाल्यामुळे हुकलेला भारत-बांगलादेश सीमेवरील ध्
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!