Skip to main content

Posts

Showing posts from May, 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

                 ''Some are born great, some achieve greatness and some are those greatness is thrust on them..''           जगातली सर्व क्षेत्रातली थोर माणसं मुख्यतः पहिल्या दोन निकषात चपखल बसतात. तिसऱ्याचा विचार सध्या करण्यात अर्थ नाही. 'बॉर्न ग्रेट' मध्ये भारतीय इतिहासात आणि त्यातही आधुनिक भारताच्या इतिहसात अनेक लोक आहेत. त्यात बळवंतराव टिळक ते…. अशी खूप मोठी यादी सांगता येईल. 'अचिव्ह ग्रेटनेस' म्हणजे नक्की काय? तर या लोकांनी त्यांच्या वर्तमानाची अशी काही मांडामांड केली की, इतिहासाचे पाटच बदलले. त्या वर्तमानाच्या मांडणीमुळे इतिहास घडला आणि त्या मांडणीवरच वर्तमान भारत आपलं वर्तमान आणि भविष्य सुदृढ आणि संपन्न करू शकणार आहे. या 'बोर्न आणि अचिव्ह ग्रेटनेस यांच्या यादीत एक नाव मात्र असा आहे की, अलौकिक बुद्धिमत्ता घेऊन जन्म घेतला, त्यांच्या ग्रेटनेस अचिव्ह करण्याच्या मार्गातली खडतरता यातूनच इतिहास घडला आणि त्याच्या आधारे भारत देशाचं वर्तमान आणि भविष्य उज्वलतेच्या दिशेनं जाणार आहे, ते नाव म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर...