सवाई एकांकीकोत्सव महाराष्ट्रातील नाट्य क्षेत्रात एकांकिका स्पर्धांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातही पुणे, मुंबईत आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा या नाट्य-चित्रपट सृष्टीसाठी कलाकारांची, तंत्रज्ञांची खाण ठरतात. ही कलाकारांची खाण आता मुंबई-पुण्याच्या पट्ट्याबाहेर वाढू लागली आहे. राज्य नाट्य स्पर्धा, अहमदनगर महाकरंडक, कोकणात पेण, बार्शी, औरंगाबाद, मध्यंतरीच्या काळात सकाळ करंडक आणि आता लोकसत्ता लोकांकिका ही विविध व्यासपीठे उपलब्ध आहेत. पण या सर्व चुरशीच्या स्पर्धा प्राथमिक ठराव्यात अशी एकांकिका स्पर्धा आहे ती 'चतुरंग सवाई' एकांकिका स्पर्धा. या स्पर्धेचे स्वरूपच आहे ते 'उत्तमातील सर्वोत्तम निवडण्याची स्पर्धा' असे. राज्यभरातील विविध एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सर्वोत्तम प्रायोगिक एकांकिका साठी असणारा 'जयराम हर्डीकर करंडक' विजेती एकांकिका इत्यादी संघाना सवाई एकांकिका स्पर्धेत प्रवेश मिळतो. त्यानुसार चालू वर्षात सवाई एकांकिका स्पर्धेत राज्यभरातील उत्तम अशा एकांकिका त्यातील सात 'सवाई' च्या अंतिम फेरीत होत्या...
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!