Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

संगीत मार्तंड

धुंवाधार पाऊस कोसळत होता. आजी-आजोबा, मामा-भाचे वगैरे गोतावळा गाडीने तुळजापूरच्या वाटेवर होतो. अशा प्रवासात कायम असतात तशी गाणी तत्कालीन टेपवर वाजत होती. माझ्या मामाने प्रस्ताव मांडला, की एक भजनाची कॅसेट आहे माझ्याकडे. ऐकू. छान वाटेल. भजन म्हटल्यावर आम्ही मुलं काहीसे नाखूष झालो. पण एक समजूतदार तोडगा निघाला, की इतका वेळ इतर सर्व सुरूच होतं, आता हे ऐकायला काय हरकत आहे? संध्याकाळी साडेसातची वेळ असावी. अंधार पडला होता. पाऊस होताच, मृदंगाचा भजनी ठेका ऐकायला आला आणि,  ओम नमो भगवते, वासुदेवाय... मृदंगाच्या तालाच्या पार्श्वभूमीवर हळूहळू वाढत जाणाऱ्या आवाजात हे बोल ऐकायला आले. एका विलक्षण अनुभूतीला सुरुवात झाली. त्या वासुदेवाची आराधना मृदंग, टाळाच्या साथीने सुरु झाली. प्रत्येक कडव्यात एका अक्षरापासून त्या श्रीविष्णूची कौतुके गायली जातात. वामनम विश्वरुपंच वासुदेवम च विठ्ठलम... असं म्हणत त्वं वंदे वेदवल्लभम असं समेवर येताच आपणही आपसूक गायला लागतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.. पंडित जसराज या संगीत मार्तंडाशी माझी ओळख ही अशी झाली. वास्तविक ते वय, "शास्त्रीय संगीत म्हणजे काय? दळण दळल्यासारखं एकच शब्