Skip to main content

Posts

Showing posts from July, 2025

Freight Equalization Policy

 एक विस्मृतीत गेलेले धोरण; ज्याने प्रादेशिक आर्थिक विषमतेची बीजे रोवली आणि भविष्यकालीन सामाजिक, राजकीय अस्मितांची पायाभरणी केली! "खनिजसंपदा आणि सुपीक भूमी असूनही बिहार आणि झारखंड अपेक्षित विकास करु शकले नाहीत. Freight Equalization Policy (लिखाणाच्या आणि वाचनाच्या सोयीसाठी हे इंग्रजी नावच वापरले जाणार आहे.) चा यात मोठा वाटा आहे.." दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी २०१७ मध्ये बिहार मधील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं.  पूर्व आणि मध्य भारताच्या संपदेच्या जोरावर पश्चिम आणि दक्षिण भारताची भरभराट झाली. स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील ही वस्तुस्थिती पूर्व भारतातील एका खासदाराने काहीशा अनावश्यक आक्रमक भाषेत मांडली आणि वादाला तोंड फुटले. पण हे झाले कसे आणि का हा प्रश्न पडतो. प्राचीन, मध्ययुगीन भारतातील समृद्ध राज्ये, साम्राज्ये या प्रदेशातच होऊन गेली. इतक्या प्राचीन काळाचा धांडोळा घेणे इथे अप्रस्तुत आहे, पण ब्रिटिश राजवटीत पूर्व भारताच्या आर्थिक डबघाईचा पाया रचला गेला आणि Freight Equalization Policy ने कळस चढवला असे म्हणावे लागेल. काँग्रेसने समाजवादी समाजरचनेचा अंग...