वर्ष १९५६. सुवेझ कालव्याने ऊर्जा भू-राजकारणाचा समतोल पूर्णपणे बदलून टाकला. ब्रिटन आणि फ्रान्सने सुवेझ कालवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. इस्राएलने युद्धात विजय मिळवला खरा पण या सगळ्यात ब्रिटन-फ्रान्सचे हकनाक नाक कापले गेले. भुराजकारणाचा ध्रुव अमेरिकेकडे सरकला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहॉवर म्हणाले होते, "अँथनी ईडन (ब्रिटनचे पंतप्रधान) इतके मूर्खपणाचे कृत्य करतील, यावर विश्वास बसत नाही." या एका वाक्यात पश्चिम आशियात युरोप नाही तर अमेरिका-इस्राएलचे वर्चस्व स्थापित झाल्याचे जणू घोषित झाले होते. आता जवळजवळ सात दशकानंतर हा प्रदेश पुन्हा एकदा धुमसतो आहे. इस्राएल-अमेरिकेने इराणवर हल्ले सुरु केले. प्रत्युत्तर म्हणून इराणने पश्चिम आशियातील अरब देशांवर हल्ले केले. होर्मूझच्या सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाच्या जागतिक वाहतुकीपैकी एक पंचमांश वाहतूक होते. त्या सामुद्रधुनीवर आणि त्यातील व्यापारी मार्गावर नियंत्रण राखण्याची क्षमता इराणकडे आहे, आणि तोच सगळ्यात मोठा हुकुमाचा पत्ता खेळला. होर्मूझची सामुद्रधुनी बंद करुन जगाच्या नाकी नऊ आणले आहेत. यामुळे जागतिक ऊर...
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!