Skip to main content

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

             

                                  'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'. 

हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्तित्वाबाद्द्लच्या मुळ  कल्पना आणि वेदांमध्ये अभिप्रेत असलेली विज्ञाननिष्ठ दृष्टी यांवर विस्तृत भाष्य केलं ते विनायक दामोदर सावरकर यांनी. 

भारतीय इतिहासात क्रांतिकारक म्हणून सर्वपरिचित असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा पैलू तितका प्रकर्षाने समोर आला नाही, विशेषतः आजच्या तरुण पिढीसमोर.  सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध आणि हिंदुत्वाची वेदना अभिप्रेत असलेली व्याख्या असलेला 'हिंदुत्व' हा ग्रंथ अतिशय उत्कृष्ट आहे. 

उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार क्रमाक्रमानं काळाच्या ओघात मानवानं निसर्गाच्या विरोधात जाऊन म्हणा किंवा निसर्गाच्या मदतीनं स्वतःचा सांस्कृतिक, समूहात्मक,  विकास केला. मानवानं हा विकास केला खरा पण उन, वारा, पाऊस, धरणीकंप, हिमयुग, इतर नैसर्गिक आपत्ती यांवर समाज म्हणू किंवा त्यांच्या वर विजय मिळवता आला म्हणूनच ह्या निसर्गाला त्यांनी 'देव' हि संकल्पना बहाल केली. ह्या निसर्गाला आपली कृतज्ञता किंवा नैवेद्य अर्पण करण्याचे मार्ग प्रत्येक संस्कृतीत वेगळे वर्णिले गेले पण हिंदू धर्मात ते 'यज्ञ' या संकल्पनेतून केले जाऊ लागले. या यज्ञ या गोष्टीचं काळात ओघात झालेलं विकृतीकरण म्हणजे मूर्तीपूजा..
                      
हिंदू धर्मात मूर्ती ह्या साक्षात देवाचं रूप मानण्यात येतात. त्या मूर्तीत (स्वयंभू किंवा घडवलेल्या) साक्षात त्या सर्वव्यापी देवाचं अस्तित्व असतं असा गाढ विश्वास हिंदू समाजामध्ये आहे. देव जर चराचरात असेल तर 'पूजनीय' फक्त तो मुर्तीताला मुर्तीतलाच देव कसा होऊ शकेल? भक्तांच्या हाकेला हि मूर्ती कशी धावून येवू शकेल? ह्या मूर्त्यांना अभिषेक करण्यासाठी पाण्यापासून ते रक्तापर्यंत बरेच काही खंडोगणती वाया घातले जाते. देवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरच ह्या सगळ्यांची गरज आहे का? देव जर भावाचा भुकेला असेल तर त्याला हे सर्व कशासाठी? भक्ताच्या हाकेला साक्षात देव येत असेल हे धादांत असत्य आणि थोतांड आहे. हिंदुस्थानात कित्येक देवळात विशेषतः देवी मंदिरात आजही चालणारी बळी देण्याची परंपरा हि माणसातली श्रद्धा नाही तर विकृती दर्शवते. स्वतःच्या स्वार्थासाठी मुक्या प्राण्याचा काही ठिकाणी जिवंत मनुष्यप्राण्याचा बळी देणं यासारखी क्रूर आणि निर्लज्ज गोष्ट दुसरी नाही. हिंदुस्थानात देवपण शेंदूर फासल्याबरोबर दगडालादेखील मिळते. 
                      
हिंदू, इजिप्त आणि बर्याच संस्कृतींमध्ये मृत्युनंतरच्या अस्तित्वावर गाढ विश्वास आहे. याच श्रद्धेमुळे, विश्वासामुळे इजिप्तमध्ये मोठमोठे पिरामिड उभे राहिले तर हिंदुस्थानात श्राद्ध-पक्ष यांसारख्या खुळचट कल्पना जन्मल्या. 

मनुष्यदेह नश्वर आहे. वास्तविक मृत्युनंतर त्या निस्तेज देहात काहीही उरलेलं नसतं, त्या देहाचं अस्तित्व मिटवणं हे आद्य कर्तव्य ठरतं . आत्मा, पाप-पुण्याच्या गणितावर स्वर्ग-नरकाच कोष्टक ह्या केवळ मानवी अवास्तव कल्पना आहेत. हिंदू धर्मात अभक्ष्य मानलं गेलेलं मांस श्राद्धाच्या प्रसंगी भक्षण करावं लागतं. पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मृत व्यक्तिला मुक्ती मिळत नाही. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला भडाग्नी दिला तर आत्मा असंतुष्ट राहतो, पण असंतुष्ट राहायला 'आत्मा' नावाची वस्तू असायला हवी ना! ह्या सर्व कल्पना पटकन कोणाच्याहि पटकन पचनी पडणं अवघड आहे. तात्याराव सावरकरांच्या पत्नी जेव्हा  निवर्तल्या तेव्हा त्याचं दहन कुठल्याही संस्काराविना विद्युतदाहिनीत झालं. वर्षश्राद्ध वगैरे कल्पनांना पूर्णपणे फाटा दिला. 
                     
हिंदू धर्मात फक्त मूर्तीच नाही तर प्रण्यानादेखील अलौकिक देवत्व प्राप्त झालेलं आहे. सर्व देवांची वाहनं हि प्राणी मानली गेली आहेत. विष्णू-गरुड, महादेव-नंदी, गणपती-उंदीर. याच देवांचे पृथ्वीवरील अवतार विमानतून फिरत असताना हे सर्वशक्तिमान देव मात्र प्राण्यांना वाहन करून फिरत होते.( पहा रामायण) असेच देवाचं सानिध्य मिळाल्यामुळे वराह, श्वान, बैल इ. पाळीव प्राणी यापलीकडे काहीही उपयुक्त नसलेले प्राणीदेखील पूजनीय झालेले आहेत. पण या सर्वात गाय हा प्राणी अशा काही अलौकिक देवत्वाला पोचला आहे की त्याला तोड नाही. 

पुराणामध्ये गायीला 'कामधेनु' म्हणून संबोधले आहे. वास्तविक गायीपासून मिळालेलं 'दूध' आयुर्वेदानुसार आणि पाश्चात्त्य औषधशास्त्रानुसार संपूर्ण अन्न मानलं गेलेलं आहे. इंधनासाठी उपयुक्त असणार्या गोवऱ्या आणि जैविक इंधन म्हणून वापरली जाणारी विष्ठा, या मनुष्य्प्रण्यासाठी उपयुक्त असणार्या गोष्टी. विज्ञाननिष्ठ निबंधापैकी 'गोपालन हवे- गोपूजन नव्हे' ह्या निबंधात ह्या संबंधी विस्तृत विवेचन केलेलं आहे. 

हिंदुस्थानावर झालेल्या मुस्लिमांच्या आद्य स्वाऱ्यांपासून ते हल्लीपर्यंत मुस्लीम सैन्ये स्वतःच्या सैन्याच्या फालीपुढे गायींचे कळप असत. हिंदू सैन्ये गोहत्येच्या पापाच्या भीतीने शास्त्रच उगारणार नाहीत. ह्या कृत्यांमुळे सैन्येच्या सैन्ये-गावेच्या गावे उध्वस्त केली जात. ह्या गोहत्या पापाच्या भीतीनं कित्येक वेळा हिंदू सैन्यांनी सर्वनाश ओढवून घेतला आहे. वास्तविक वेदांमध्ये गाय हा केवळ एक उपयुक्त पशू हे अशी विवेचने आहेत. हिंदूंनी ह्या पाप-पुण्याचा विचार न करता सैनिकाकडून अभिप्रेत असणारी कर्तव्य केली असती तर सांस्कृतिक, सामाजिक ह्रास बराच टळला असता. सावरकरांनी अखिल आर्यावर्तात समस्त हिंदुनी गाय हा केवळ उपयुक्त पशु आहे ह्या विचारांचा जोरदार प्रचार केला. 

ह्या पाप-पुण्याच्या कल्पनेतून बाहेर काढून सैन्याला कर्तव्याशी तत्पर राहण्याची प्रेरणा आणि शिकवण शिवाजी महाराजांनी दिली. धर्माभिमानी पण कर्तव्यनिष्ठ आदर्श राजा शिवाजी हा चाणक्याच्या 'अर्थशास्त्र' च्या व्याख्येत चपखल बसणारा राजा होता. म्हणूनच धर्माकडे एका वेगळ्या आणि कर्तव्यनिष्ठ दृष्टीने पाहणाऱ्या समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचं वर्णन 

                 निश्चयाचा महामेरू। बहुतजनासी आधारू।।

                 अखंड स्थितीचा निर्धारु। श्रीमंत योगी।।

 असं केलेलं आहे. 
                    
आजच्या या स्पर्धेच्या युगात, सुशिक्षित जगात वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ समाजाच्या अस्तित्वाची अपेक्षा होती. पण कित्येक बाबा आणि बुवांचा भक्तवर्ग हा आजचा सुशिक्षित अभियंते, डॉक्टर, नी इतर उच्चविद्याविभूषित स्त्री-पुरुषांचा आहे. आजच्या या जगात सावर्कारंचे धर्माभिमानी, विज्ञाननिष्ठ विचार हे समाजाच्या शाश्वत मानसिक विकासासाठी किती उपयुक्त आहेत हे काळानं सिद्ध केलं  आहे.               

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राम मंदिर: राम विचार, राम विधान

उदंड जाहले पाणी  स्नानसंध्या करावया  जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे हिंदुस्थान बळावले  अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।। साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते"  आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील.  आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.   हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,

वार्षिक अर्थसंकल्प: Part 1

  अर्थमंत्री २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी.  १ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे वेध लागतात . पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली . ती का केली , त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत . गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले आहेत . तरीही उजळणी स्वरूपात चर्चा केली जाणार आहे . अर्थसंकल्प येण्यापूर्वी या देशाचा अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित विविध घटकांची चर्चा करण्याचा इथे प्रयत्न आहे . प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे . घटनात्मक तरतुदी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात समस्त भारत अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला असतो . अर्थसंकल्पात काय मांडणी आहे यावर देश वर्षभरात कसा वाटचाल करणार आहे हे निश्चित होत असते , तसेच गेल्या वर्षभराचा आढावा देखील त्यात असतो . भारतीय संविधानाच्या भाग ५ मध्ये केंद्र सरकार , सं