अमिताभ .. अभिनय असावा तर त्याच्यासारखा, सभा - संमेलनात वावर असावा तर त्याच्यासारखा, भाषेवर प्रभुत्व असावं तर त्यांच्यासारखं, व्यावसायिकता असावी तर त्यांच्यासारखी, वय सहसरचंद्र दर्शनाकडे जात असताना तरुणांना लाजावणारी ऊर्जा असावी तर त्यांच्यासारखी, वागण्या - बोलण्यात सुसंस्कृतपणा असावा तर त्याच्यासारखा. आणखी किती आणि काय गुण सांगावेत त्यांच्यातले जे अंगीकारले तर माणूस आपापल्या क्षेत्रात यशस्वी होईल, मानद होईल. भारतीय चित्रपटसृष्टीत ४० वर्षांपेक्षा जास्त काळ विविध धाटणीचे चित्रपट, जाहिरात, दूरचित्रवाणी कार्यक्रम अशा क्षेत्रांत उत्तुंग काम केलेल्या, महनीय अशा महानायकला यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. गोवा मुक्तिंग्राम ही पार्श्वभूमी असणाऱ्या सात हिंदुस्तानी या चित्रपटातील अन्वर पासून ते अलीकडेच गाजलेल्या पिंक पर्यंत आपल्या अभिनयाने, भरदार आवाजाने महानायक झालेल्या अमिताभ बच्चन यांच्याविषयी अनेक माध्यमात अनेक वेळा बोललं गेलं आहे. त्यांच्या कारकीर्दीचा उहापोह अनेक वेळा करण्यात आलेला आहे. आता पुन्हा करण्यात काय हशील असा प्रश्न पडू शकतो. पण कितीही वेळा चर्चा केली तरी क
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!