आर्य - वसंत पटवर्धन प्रजासुखे सुखं राज्ञ:। प्रजनांच हिते हितम। नात्मप्रियं हितं राज्ञ: प्रजानां तु प्रियं हितम।। तस्मात नित्योतथीतो राजा कुर्यादर्थानुशासनम अर्थस्य मुलमुत्थानम अनर्थस्य विपर्यय: अनुथाने ध्रुवोनाशः या श्लोकात आर्य चाणक्याने राज्यकारभार आणि आदर्श राजाने कोणती तत्वे पाळत राज्यकारभार करावा याचे सार वर्णन केले आहे. राज्यकारभार, दुर्गव्यवहार, अर्थव्यवहार, गुप्तहेर यंत्रणा, युद्ध कल्पना, दंडनीती अशा अनेक राज्यव्यवहार संबंधी प्रश्नांवर अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शनपर ग्रंथ आर्य चाणक्याने सिद्ध केला आहे. तो ग्रंथ, त्यातील सूचना आजही उपयोगात आणल्या जातात. राज्यव्यवहारासोबतच कंपनी व्यवस्थापनासकट अनेक क्षेत्रात चाणक्याचा हा ग्रंथ २५०० वर्षांनंतरही उपयुक्त ठरत आहे. युरोपीय इतिहासात अत्यंत तर्ककठोर, व्यवहारी असा विचार मांडणारा विचारवंत आहे तो मॅकिआव्हेली. पण तुलनाच करायची झाली तर निःसंशय चाणक्य कित्येक योजने पुढे आहे असे जाणवते. तो सर्वसामावेशक ग्रंथ म्हणजेच अर्थशास्त्र आणि त्य...
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!