Skip to main content

Posts

Showing posts from 2012
           मल्टीब्रान्ड रिटेल एफडीआय- हितकारक कि अहितकारक                                             १९९१!  अर्थव्यवस्थेसाठी थोडसं अपमानकारक आणि म्हणूनच क्रांतिकारी बदलांची जननी ठरलेलं वर्ष.  तेलाची आयात करण्यासाठी करण्यासाठी थेट सोन्याचा साठा  टाकण्याची परिस्थती आली होती. १९९१ च्या आर्थिक उदारीकरण-जागतिकीकरण  ह्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था   महत्वाची भूमिका बजावली. १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर  आणि परदेशी गुंतवणूक भारतात आल्यानंतर आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था निश्चितपणे प्रगतीपथावर आली. १९४८ ते १९९० पर्यंत केवळ ४%-५% एवादीच वाढणारी  अर्थव्यवस्था ५%-८% नि वाढू लागली. परकीय गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत केवळ २१% वाटा असणारं तृतीयक क्षेत्र (बँकिंग,  विमा, सेवा, इ.) आज अर्थव्यवस्थेतला ५८% वाटा उचलत आहे. कोकणातला आंबा अमेरिकेत जातो आहे, टाटा-रिलायंस-इन्फोसिस सारखे उद्योगसमूह दिमाखा...
                               माधवराव बल्लाळ पंतप्रधान                      १४ जानेवारी, १७६१ चा पानिपतावरचा पराभव, उत्तरेत माजलेली अंदाधुंदी, दक्षिणेत पुन्हा प्रबळ झालेले निजाम आणि हैदर, बंगाल मधून वाढत असलेला ब्रिटीशांचा प्रभाव या सर्वांवर खंबीरपणे मत करून मराठी साम्राज्याचं सामर्थ्य वाढवलं ते नानासाहेब पेशव्यांचे द्वितीय चिरंजीव माधवराव यांनी . एकवेळ शून्यातून साम्राज्य उभारणं सोपं वाटेल, पण जम बसलेली, बलाढ्य झालेली राज्यसत्ता पानिपातासारख्या आघातानंतर पुन्हा वैभवशाली करणं हे काही सोपं नाही .                    पानिपतचा आघात, सदाशिवरावभाऊ, विश्वासराव आणि कित्येक सरदार आणि त्यांच्या सैन्याचा मृत्यू झालेला . सदाशिवरावभाऊच्या आणि एकूणच पानिपातामुळे निराशेच्या गर्तेत झालेला नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू यामुळे अवघ्या सोळाव्या वर्षी मा...

१५ ऑगस्ट : स्वातंत्र्यदिन .

                                                          १५ ऑगस्ट! हिंदुस्थानासाठी एक अभिमानास्पद त्याचप्रमाणे दुःखद दिवस . इंग्रजांचं जुलमी शासन संपलं पण अखंड हिंदुस्थानाची दोन शकलं झाली . हिंदू-मुस्लीम दंगे झाले . दहा लाखांपेक्षा जास्त लोक मारले गेले, लाखो लोक निर्वासित झाले . राजकीय पुढार्यांचे त्या काळातले निर्णय आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा करण्याची इच्छा नाही . स्वातंत्र्यप्राप्तीच ६५वं वर्ष सुरु होत असताना हिंदुस्थान १९४७ च्या परिस्थितीपेक्षा वेगळा  का? या काळात जगात 'सामर्थ्य' दाखवू शकेन अशा गोष्टी हिंदुस्थानाकडून झाल्या का? आर्थिक- सामाजिक-सांस्कृतिक भरभराट झाली का? राजकारण आणि राजकारणी यांची स्थिती काय आहे? या आणि अशा प्रश्नांचा मागोवा  प्रयत्न घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे .                 १९५२ साली पहिली सर्वात्रिक निवडणूक झाली आणि नेहरुंच मंत्रिमंडळ अस्तित्...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...