Skip to main content

Posts

Showing posts from 2017

भारतीय संविधान आणि डॉ. आंबेडकर

       "भारतीय संविधानाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध काय? भारत संघराज्य असावे, भारतात संसदीय लोकशाही असावी, मतदान प्रौढ़, सार्वत्रिक असावे इत्यादि भूमिका कोंग्रेसच्या इतिहासातून क्रमाक्रमाने चालत आलेल्या आहेत. भारतीय संविधान हा या भूमिकांना मिळताजुळता करून घेतलेला 1935 चा कायदा आहे, व कायदेशीर भाषेत या संविधानाची रचना करण्यात बेनेगल नरसिंह राव यांचा हात सर्वात मोठा आहे. सर्व महत्वाचे निर्णय कोंग्रेस पक्षाने घेतले आहेत. कारण संविधान सभेत याच पक्षाचे बहुमत होते. या सर्व बाबी विचारात घेऊन डॉ. आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले पाहिजे." माझ्या आवडत्या विचारवंत लेखकांपैकी एक नरहर कुरुंदकर यांच्या जागर ह्या पुस्तकातील हा उतारा. विचारपूर्ण आणि विचार करायला लावणारे वाक्य आहे. विचार अशासाठी करायचा की भारतीय इतिहासात आणि वर्तमानात व्यक्तिस्तोम किंवा अधिक चांगला शब्द म्हणजे पूजा केली जाते. त्या नादात इतर महत्वपूर्ण व्यक्ती, संस्था यांचे कार्य झाकोळले जाते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बाबतीत हेच स्तोम एका संघटनेचे, पक्षाचे माजवले गेले. म्हणूनच गांधीजींचं "Freedo...

भारतीय शेती: निर्यातक्षम! तरीही मागे का?

       Is Indian agriculture victim of its past? भारतीय शेती आपल्याच भुतकाळाची बळी आहे काय? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. त्याला इंग्रजांचा काळ, तेव्हाची शेती आणि शेतकर्यांचं कंबरडं मोडणारी धोरणे यांचा दाखला दिला जातो. जो 100% खरा आहे. त्या काळात शेतीचं आणि एकंदरच भारताच्या अर्थव्यवस्थेचं अपरिमित नुकसान झालं. अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. स्वयंपूर्णतेकडून अन्नधान्य आयात करावी लागणारी शेती आणि अर्थव्यवस्था ही वाटचाल झाली. होणारच होती. कारण सम्पूर्ण व्यवस्थाच शोषणासाठी आखली गेल्यासारखी होती. पण स्वातंत्र्यानंतर काय? अर्थात स्वातंत्र्यानंतरही बराच काळ भारत अन्नधान्य आयात करणाराच देश होता. 80 टक्के जनता शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांवरच अवलंबून होती. भांडवल जवळ जवळ नाहीच. आधुनिक तंत्रज्ञान तर नाहीच नाही. तेव्हा पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीक्षेत्राला केंद्रस्थानी राखून धोरणे आखली गेली. भाक्रा- नांगल सारखी योजना कार्यान्वित झाली. त्या काळापुरती त्या क्षेत्रात धुगधुगी निर्माण झाली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून मात्र अवजड उद्योग, त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल...

आम्ही काय करणार आहोत??

"साहेब उद्या मी एक प्रेस कॉन्फ़रन्स बोलावणार आहे. त्यात मी ह्या शहरातल्या 10 सर्वात मोठ्या स्मगलर्सची नावं जाहीर करणार आहे. त्याचबरोबर राजकारणातील त्यांच्या गॉडफादर्सची नावंही मी जाहीर करणार आहे.." मुंबईतील मरीन ड्राइव भागातील एका चकचकीत इमारतीच्या गच्चीवर कम्युनिस्ट कामगार पुढारी डीकास्टा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये खासगी पण गुप्त संवाद सुरु आहे. डीकास्टाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री म्हणतात,    " हे सगळ बोलण खूप सोपं आहे डीकास्टा! अरे मनात आणलं तर आम्ही स्मगलिंग चोवीस तासात बंद करू. पण सध्या ते तितकसं महत्वाचं नाही. राज्यात इतर प्रश्न महत्वाचे आहेत. गरीबी आहे. कित्येक गावात अजून वीज नाही. महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकावं लागतं... मनात आलं की कसं गलबलायला होतं.. त्यांच्यासाठी आम्ही काय करणार आहोत रे???    "स्मगलारांना संरक्षण देणार, असाच याचा अर्थ होतो, साहेब!" डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन चित्रपटातील हा एक सूचक प्रसंग. एकाचवेळी दोन भिन्न विचारसरणीची माणसं, सत्ताकेंद्र काही वाक्यांमधून परिस्थिती मांडतात. प्रसंग 1970 च्या दशकातला असला त...

नमामि ब्रम्हपुत्र.

                                    ब्रम्हपुत्र. मानससरोवर ते बंगालचा उपसागर व्हाया गंगा नदी असा विविधतेनं नटलेला, लांबलचक प्रवास करणारा नद. तिबेटमध्ये त्सांगपो वगैरे नामाभिधान घेत 'द ग्रेट बेंड' ला अक्षरशः तोंड फिरवून अरुणाचल प्रदेशात प्रवेश घेतो. हिमालयातील अनेक प्रवाह आणि लोहित वगैरे नद्यांचा प्रवाह सामावून घेत आसामातल्या सादियाजवळ अक्राळविक्राळ रूप धारण करतो. मग मिडिया ते सध्या बांग्लादेशच्या सीमेजवळ असणाऱ्या धुबरीपर्यंत आसामची मैदानं गाळानं सुपीक, सुजलाम,सुफलाम करत जातो. त्याचबरोबर वर्षातून दोन वेळा अलोट पाण्याचा प्रवाह सामावत जिंव्हा पात्रात न सामावल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशात पसरत हाहाकार माजवून देतो. मालमत्ता, वित्त, आणि जीविताच्या हानीस कारणीभूत ठरतो. ह्या कारणामुळे 'आसामचे अश्रू' वगैरे विशेषणं झेलतो. ते काहीही असलं तरी 'मानवी जीवन,सांस्कृती, सभयता' नद्यांच्या खोऱ्यात वसतात, बहरतात, फळतात, फुलतात. नाशही पावतात. सत्यच आहे. भारताच्या सांस्कृतिक एकटेच भक्कम पुरावा असणाऱ्या महाभारताप...