Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

मिशन मंगल: मंगळयान मोहिमेची रंजक सफर

    भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इसरो पन्नासाव्या वर्षात आहे. केरळातील कालडी च्या प्रदेशात तुटपुंज्या निधीच्या आधाराने भारतीय अवकाश संशोधन मोहिमेचा प्रारंभ झाला. सुरुवात पेन्सिलीच्या आकाराच्या हवामान अभ्यास करणाऱ्या रॉकेटपासून झाली. त्यानंतर रॉकेटचा आकार, त्या रॉकेटचे उद्देश मोठे होत गेले. पहिले मोठे रॉकेट भारतीय शास्त्रज्ञांनी सायकलवरून, पहिला उपग्रह बैलगाडीतून योग्य त्या स्थळी पोचवला आहे. भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे पितामह डॉ. विक्रम साराभाई आणि इतर शास्त्रज्ञांनी १९६९ साली सुरू केलेल्या रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. १९६९ साली सुरुवात केल्यांनतर पहिला दूरसंचार उपग्रह 'आर्यभट्ट' १९७५ मध्ये सोडण्यात आला. त्या पुढला उपग्रह 'रोहिणी' १९७९ मध्ये सोडण्यात आला. पेन्सिलीच्या आकाराचे रॉकेट ते संपूर्ण उपग्रह हा पहिला पल्ला अवघ्या ६ वर्षात गाठला गेला. भारताची तोळामासा आर्थिक स्थिती हे एकमेव कारण भारताच्या 'लो बजेट' अवकाश कार्यक्रमामागे नव्हते. त्याला शीतयुद्ध, भारताची अलिप्ततावादी परराष्ट्र नीती आणि १९७१ पासून पुढे उघडपणे रशियाकडे झुकलेले धोरण यामु

सिनेमा आणि सॉफ्ट पॉवर

  लष्करी बळ, सिनेमा आणि निर्माण होणारा दबदबा      ए क निर्विवाद सत्य पहिल्या प्रथम मान्य करायलाच हवे ते म्हणजे सिनेमा म्हणजे सिनेमा, चित्रपट ही आजच्या काळातली लोककला आहे. अमिताभ बच्चनचा अँग्री यांग मॅन जितका महाराष्ट्रात गाजतो तितकाच दक्षिण भारतात, पूर्वोत्तर भारतात गाजतो. या चित्रपटकलेत तांत्रिक अंगासोबतच संगीत, नृत्य, नाट्य, शिल्प, चित्र अशा सर्व कलांचा समावेश होतो. चित्रपटाच्या कथानकांनुसार स्थानिक, पारंपरिक लौकिकार्थाने ज्याला लोककला म्हणता येतील अशांचा देखील अंतर्भाव होतो. ५०-६० चे दशक भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळात अप्रतिम संगीताची मेजवानी असणाऱ्या प्रेमकथांपासून सामाजिक विषयावरील असामान्य चित्रपट निर्माण झाले. वास्तववादाची अवास्तव जाहिरात न करताही रूढार्थाने ज्याला व्यावसायिक म्हणता येईल असे सिनेमे निर्माण झाले. वास्तविक याची सुरुवात प्रभातच्या माणूस, कुंकू, शेजारी पासूनच झाली आहे. प्रभातच्या संत तुकारामने तर ३०-४० च्या दशकात जागतिक पातळीवर वाहवा मिळवली. पुढे 'सर पर लाल टोपी रुसी' म्हणणाऱ्या राज कपूरची लोकप्रियता सोव्हिएत काळात प्रचंड होती

भारतीय अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची

 २०२४ पर्यंत गाठण्याचे लक्ष्य; कोविद आणि पुढे काय  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरवर घेऊन जाण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै महिन्यात मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात २०२४ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरचे लक्ष्य गाठण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यासाठी सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रासोबतच खासगी क्षेत्राचे योगदानदेखील महत्वाचे असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केला आहे.  अर्थव्यवस्था, जीडीपी म्हणजे काय?  एखाद्या देशात एका वर्षात झालेली एकूण आर्थिक उलाढाल म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन किंवा जीडीपी होय. हे सकल राष्ट्रीय उत्पादन मोजण्याच्या तीन पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे एका वर्षात (किंवा विशिष्ट निर्धारित काळात ) वस्तू आणि सेवांचे झालेले एकूण उत्पादन. दुसरी पद्धत म्हणजे एकूण खर्च, आणि तिसरी पद्धत म्हणजे एकूण मिळकत किंवा उत्पन्न. सुलभीकरणाच्या दृष्टीने एकूण उत्पादन मोजणे ही सर्वमान्य पद्धत वापरली जाते. त्यात आता बदल करून सकल मूल्यवर्धन मोजले जाते. जागतिक तुलना करण्यासाठी जीडीपी  मांडणी अमेरिकी डॉलर मध
इट टेक्स करेज टू मेक राईट.. राईट  अ फ्यु गुड मेन ते शौर्य..  इट टेक्स करेज टू मेक राईट.. राईट! अशी टॅगलाईन असणारा शौर्य हा चित्रपट २००८ मध्ये येऊन गेला. हा चित्रपट आताच आठवण्याचे कारण केंद्र सरकारचा कलम ३७० अधिक कमकुवत, जवळ जवळ रद्द करण्याचा धाडसी, महत्वपूर्ण निर्णय  हे आहे. राज्यतघटनेतले ३७० हे कलम आणि त्यानुषंगाने आलेले ३५अ हे कलम यावर प्रचंड चर्चा, विवाद, न्यायालयीन खटले आजवर झाले आहेत. राज्यघटनेतील तरतूद, त्याचे बरेवाईट परिणाम यावर खूप चर्चा झाली आहे. ते कलम जम्मू आणि काश्मीर आणि लडाख पूर्णपणे भारतीय गणराज्यात सामील होण्यातला कसा अडथळा आहे यावर विद्यमान सत्ताधारी पक्ष, त्या पक्षाची मूळ विचारधारा आणि पालक संघटना म्हणजेच संघ ठाम होते आणि आहे. केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयानंतर देशभर आनंदाचे, कौतुकाचे वातावरण आहे. इथवर सगळं ठीक आहे. पण मग शौर्य हा सिनेमा आणि त्याप्ररकारचे इतर सिनेमे यांचे प्रयोजन काय? १४ जानेवारी १९८९ हा दिवस काश्मीर खोऱ्यातील हिंदू, जे काश्मिरी पंडित या नावाने ओळखले जातात त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला. खोऱ्यातील मशिदींमधून हिंदूंना काश्मीर त्वरित सोडण्याच्