आर्य चाणक्य म्हणतात, "सुखस्य मुलं धर्म:। धर्मस्य मुलं अर्थ:। अर्थस्य मुलं राज्यम्। राज्यस्य मुलं इंद्रियजय:। हा श्लोक अतिशय स्वयंस्पष्ट आहे. भारतीय राज्य, समाजाची रचना, अर्थव्यवस्थेचा आधार, आर्थिक उन्नतीबाबत समाजाची धारणा भारतीय विचारात खूप स्पष्ट आहे. वेदकालापासून भारतीय विचार संपत्ती निर्माण यावर भर देतो. भारतीय विचारात गरिबीचे उदात्तीकरण नाही. भारतीय विचारात चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे पुरुषार्थ सांगतानाही भारतीय विचार 'नाती चरामि' असे बंधनही घालतो. वेदांचा तो अर्थ आम्हासची ठावा म्हणणारे संत तुकाराम म्हणतात, "जोडोनियां धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी।। या उदास विचारे वेच करी मध्ये आपल्या धनाचा, संपत्तीचा गर्व असू नये. संपत्ती निर्माण, धनसंचय हा कोणाला लुबाडून, फसवून करू नये, हाच विचार आहे. भारतीय संस्कृती-सभ्यतेचा पाया हे वेद वाङ्मय आहे. अभ्यासक श्री प्रसाद जोशी यांनी 'Concept of Wealth in Vedic Culture' या प्रदीर्घ लेखात वेदातील संपत्तीची कल्पना उलगडून सांगितली आहे. वेदात अभ्युदय आणि पुरुषार्थ अशा प्रमुख कल्पना मा...
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!