गुलाबी थंडी. संध्याकाळची वेळ. वातावरणात वेगळीच धुंदी होती. हजारोंचा जनसमुदाय कानात प्राण आणून बसलेला. एकाच ध्यासासाठी. स्वरांची आतषबाजी कानात साठवण्यासाठी. रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी. चार-पाच दिवस चालणारा हा महोत्सव स्वरांची पर्वणी असते. महोत्सवाला आबालवृद्धांची अलोट गर्दी असते. आमच्यासारख्या तरुणाईचीही संख्या लक्षणीय असते. तिथे संगीतातले जाणकार येतात त्याचप्रमाणे आमच्यासारखे 'अ'जाणकारही येतात. शास्त्रीय संगीतातलं रागाचं नाव रागात अस्ताई, अंतरा वगैरे असतात यापलीकडे काहीही माहिती नसणारे आमच्यासारखे 'अ'जाणकार तिथे येतात ते फक्त गायकीतला गोडवा, ती नजाकत ऐकण्यासाठी. शास्त्रीय घटक कळत नसले तरी ते ऐकायला छान वाटतात आणि डोक्यात काहीतरी स्ट्राईक होतं. बस्स!! एवढ्याचसाठी आम्ही तिथे जातो. यंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पंडित संजीव अभ्यंकर-डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांची 'जसरंगी' मैफल, उस्ताद निशात खान यांची सतार आणि त्याला पंडित आनिन्दो चात्तार्जी यांची तबल्यावर साथ. आणि ...
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!