आर्टिकल १५ 'ह म जितनी औकात देते है, उतनी ही उनकी औकात है!' यात हम देते है म्हणजे कोण? आणि हे 'उनकी' म्हणजे कोणाची? इथे 'औकात' देणारे म्हणजे अर्थातच तथाकथित उच्चवर्णीय, उच्च जातीचे लोक. जन्माबरोबर केवळ जात मिळते. त्या जातीसोबत येणारं जळजळीत वास्तव मिळतं. दोन्ही बाजुंनी. तथाकथित उच्च वर्णीय देखील अनेक राज्यात सध्या मागास होण्याची किंवा निदान स्वतःला घोषित करून घेण्याची धडपड करत आहेत. आरक्षण ही संधी होती आणि आहे. वर्षानुवर्षे ज्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या सुविधा, संधी नाकारल्या जात होत्या, त्या नकाराचा आधार जन्माबरोबर चिकटणारी जात, त्यांना उपलब्ध करून दिलेली संधी म्हणजे आरक्षण. हे आरक्षण हे साधन आहे पण जेव्हा तेच 'साध्य' बनायला लागलं तेव्हा मुळातच नसलेली सामाजिक एकता अधिकच बिथरली. वरवर दिसणारे पदर, होणाऱ्या चर्चा खूपच उथळ असतात. बहुतांश वेळा स्वतःच्या संरक्षित कोशात राहून होणाऱ्या चर्चा वाऱ्यानिशी उडून जातात. पण समाजातलं जात आणि त्याभोवती गुंफली गेलेली समाजव्यवस्था हे भयंकर भीषण वास्तव आहे. हे भीषण वास्तव ग्रामीण भागात अधिक टोकदार आहे. आजवर उत...
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!