Skip to main content

Yojana: Budget Special

योजना
शौनक कुलकर्णी

- इझ ऑफ लिव्हिंग हे २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाचे प्रमुख लक्ष्य.
- २०१९-२० च्या आर्थिक पाहणी अहवालात १३० कोटी लोकांच्या, लोकांसाठीच्या संपत्ती निर्माण क्षमतेवर भर.
- अर्थसंकल्प तीन प्रमुख मुद्द्याभोवती-
ऍस्पिरेशनल इंडिया : कृषी, सिंचन, ग्रामीण विकास, आरोग्य, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, शिक्षण आणि कौशल्य विकास
इकॉनॉमिक डेव्हलपमेंट : सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, उद्योग, व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा यातून लक्ष्य 'न्यू इकॉनॉमी'
केरींग सोसायटी : अंत्योदय या आधारावर तीन प्रमुख घटकांचा विचार, महिला व बालविकास, सामाजिक कल्याण, पर्यटन व सांस्कृतिक, पर्यावरण
- सरकारचे लक्ष्य : डिजिटल गव्हर्नन्स, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन द्वारे पायाभूत सुविधा उभारणी, पेन्शन आणि विमा क्षेत्राच्या वाढीद्वारे सामाजिक सुरक्षा


डॉ राजीव कुमार, उपाध्यक्ष नीती आयोग

- २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध.
- कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी १६ पॉईंट ऍक्शन प्लॅन; जो सर्व घटकांना स्पर्श करतो.
- कृषी उत्पादन आणि प्रत्यक्ष उत्पन्न यात नसलेल्या उत्कृष्ट 'व्हॅल्यू चेन' चा मोठा अडथळा
- या अर्थसंकल्पात ही व्हॅल्यू चेन निर्माण करण्यावर भर
- ब्लु इकॉनॉमी आणि त्याद्वारे किनारी प्रदेशाच्या विकासावर भर
- किसान रेल आणि नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी उडान योजनेंतर्गत योजना
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता स्पष्ट; खासगी क्षेत्रातील कंपन्यांना डाटा सेंटर पार्क्स उभारणी धोरण भविष्यातील औद्योगिक क्रांतीसाठी भारताला सक्षम बनवणार
- येणाऱ्या दशकात भारतात सर्वाधिक वर्किंग एज लोकांची संख्या असणार आहे
- या डेमोग्राफिक डिव्हिडंड चा योग्य वापर करण्यासाठी कौशल्य विकास आवश्यक
- स्टार्ट अप, एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लॅन, स्टार्टअप साठी भांडवल योजना योग्य मार्गावरील तरतुदी
- परकीय गुंतवणूकदारांसाठी भारतातील कर्जरोखे बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय योग्य; भारत बॉण्ड एक्शचेंज ट्रेडेड फंडच्या यशानंतर डेट एक्स्चेंज ट्रेडेड फंड आणणार, त्यात प्रामुख्याने सरकारी कर्जरोख्यांचा समावेश
- सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राचा भारताच्या जीडीपीमध्ये २९% वाटा
- बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना TReD अंतर्गत खेळत्या भांडवलासाठी मदत; सरफॅसी कायद्यांतर्गत मान्यता मर्यादा मालमत्ता आकार १०० कोटी रुपये तर कर्ज आकार ५० लाखावर
- सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवर भर, एलआयसीच्या आयपीओ द्वारे सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल त्याचबरोबर एलआयसीच्या कामकाजात पारदर्शकता
- या अर्थसंकल्पात प्रथमच अर्थसंकलप बाह्य घटकांना स्थान; कर्जरोखे, कर्ज उभारणी हे ते घटक
- आजचे जग जागतिकीकरणामुळे एकमेकांत गुंफलेले आहे, प्रोटेक्शनिस्ट धोरणे एका पातळीपलीकडे उपयुक्त नाहीत
- अर्थव्यस्थेतील अनेक धोरणात्मक बदलांबरोबरच प्रथमच संपत्ती निर्माण प्रोत्साहन
- शेअर बाजाराला अपेक्षा होती बाजारात मागणी वाढेल अशा तरतुदी आणि करात कपात होण्याची, त्या अर्थसंकल्पात नव्हत्या त्यामुळे शेअर बाजाराची तात्काळ प्रतिक्रिया नकारात्मक होती परंतु भविष्यकालीन विकासासाठी आवश्यक तरतुदी आहे ही खात्री पटल्यावर बाजार सावरले
- आर्थिक विकास साधणे, एकंदर अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट मधील 'एस्केप क्लॉज' चा अवलंब करत एक योग्य समतोल राखण्यात आला आहे
- एस्केप क्लॉज अंतर्गत वित्तीय तूट लक्ष्य ०.५ टक्के वाढवण्याची मुभा आहे.

पूर्वप्रसिद्धी: चाणक्य मंडल परिवार स्पर्धा परीक्षा मासिक 

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...